‘द गर्ल ऑन द ट्रेन’ चित्रपटातील परिणीती चोप्राचा अभिनय पाहाच!

‘द गर्ल ऑन द ट्रेन’ चित्रपटातील परिणीती चोप्राचा अभिनय पाहाच!

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) गेल्या काही वर्षांपासून सतत हिट चित्रपटांमध्ये काम करताना दिसत आहे.

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Feb 27, 2021 | 1:20 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) गेल्या काही वर्षांपासून सतत हिट चित्रपटांमध्ये काम करताना दिसत आहे. परिणीतीचा ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ (The Girl on the Train) चित्रपट आज 27 फेब्रुवारीला नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. या चित्रपटात परिणीती जबरदस्त लूकमध्ये दिसली आहे. (Parineeti Chopra’s stellar performance in The Girl on the Train)

परिणीती हा अंदाज चाहत्यांना खूप आवडला आहे. परिणीती हा चित्रपट ट्रेंड होत आहे. नुकताच परिणीतीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे त्यामध्ये परिणीतीने सर्वांचे आभार मानले आहेत. या चित्रपटात परिणीती गुप्तहेराची भूमिका साकारत आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये परिणीती विदेशात भटकताना दिसली होती.

द गर्ल ऑन द ट्रेन या चित्रपटाचा टीझर परिणीतीने सोशल मिडियावर शेअर केले होते. या चित्रपटात परिणीतीसोबतच, अदिती राव हैदरी, कृती कुल्हारी देखील आहेत. अभिनेता अक्षय कुमार आणि परिणीती चोप्रा याचा ‘केसरी’चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतला होता. 21 शूर शिखांच्या शौर्याची कहाणी सांगणारा

या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याचं दिवशी बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. ‘केसरी’ने पहिल्याच दिवशी 21.06 कोटी रुपयांची विक्रमी कमाई होती. त्यानंतर दुसऱ्या 16.70 कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी 18.75 कोटी रुपये आणि चौथ्या दिवशी 21.51 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

संबंधित बातम्या : 

Photo : हृतिक रोशन क्राईम ब्रँचच्या कार्यालयात, कंगना विरोधात नोंदवणार जबाब!

Video : ‘बिग बॉस 14’ विजेत्या रुबीनाच्या दिलखेचक अदा, सोशल मीडियावर डान्स व्हिडीओची चर्चा!

अनुराग कश्यपच्या लेकीलाही बलात्काराच्या धमक्या; आलियाने इन्स्टावरून केला गौप्यस्फोट

(Parineeti Chopra’s stellar performance in The Girl on the Train)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें