The Girl On The Train | नेटफ्लिक्सवर लोकांचा संताप, चित्रपट पाहताच चाहते भडकले…!

The Girl On The Train | नेटफ्लिक्सवर लोकांचा संताप, चित्रपट पाहताच चाहते भडकले...!

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) गेल्या काही वर्षांपासून सतत हिट चित्रपटांमध्ये काम करताना दिसत आहे.

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jan 26, 2021 | 9:22 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) गेल्या काही वर्षांपासून सतत हिट चित्रपटांमध्ये काम करताना दिसत आहे. परिणीतीचा आगामी चित्रपट ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ (The Girl on the Train) या चित्रपटाचा पहिला टीझर काही दिवसांपासून रिलीज झाला होता. परिणीतीचा ‘द गर्ल ऑन द ट्रेन’या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर 26 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच नेटफ्लिक्सवर या नावाचा एक चित्रपट उपलब्ध आहे. (Fans rage over another movie called ‘The Girl on the Train’ on Netflix)

यामुळे अनेकांनी परिणीतीचा हा चित्रपट समजून पाहण्यास सुरवात केली, मग चित्रपट पाहिल्यावर कळले की परिणीती चोप्राचा हा चित्रपट नाही. मात्र, यासर्व प्रकरणानंतर लोक नेटफ्लिक्सवर नाराज झाले आहेत. 2016 मध्ये हॉलिवूडमध्ये ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ नावाचा एक चित्रपट बनला होता. अ‍ॅमेझॉन प्राइमवरही हा चित्रपट उपलब्ध आहे. परिणीती चोप्राचा हा चित्रपट या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक असल्याचे समजताच लोकांनी नेहमीप्रमाणे मूळ चित्रपटाचा शोध सुरू केला. परिणीतीचा चित्रपट समजून लोकांनी हा चित्रपट अर्धा-एक तास बघितला आणि मग त्यांच्या लक्षात आले की, हा परिणीतीचा चित्रपट नसून हा दुसराच चित्रपट आहे.

या चित्रपटात परिणीती चोप्रा चित्रपटात गुप्तहेराची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये परिणीती विदेशात भटकताना दिसत आहे. नेमकी या चित्रपटाची स्टोरी काय आहे हे अद्याप समजू शकले नाही. द गर्ल ऑन द ट्रेन या चित्रपटाचा टीझर परिणीतीने सोशल मिडियावर शेअर केले होते. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात परिणीतीसोबतच, अदिती राव हैदरी, कृती कुल्हारी मुख्य भुमिकेत दिसण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या : 

करिनाचे हे दोन फोटो पाहा, आई आणि बाळाचं आयुष्य सुरक्षित करा!

Posco Act Case : लैंगिक अत्याचारासंबंधी न्यायालयाच्या त्या निर्णयावर रितेशची उघड-उघड नाराजी, म्हणतो….

RRR Poster Out | वर्षातल्या सगळ्यात मोठ्या चित्रपटाचं पोस्टर रिलीज, या दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार!

(Fans rage over another movie called ‘The Girl on the Train’ on Netflix)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें