AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dilip Kumar Passes Away : पुण्याच्या कॅन्टीनमध्ये 36 रुपये पगारावर काम, सँडविच विकताना दिल्या स्वातंत्र्याच्या घोषणा, तुरुंगवासही भोगला!

‘ट्रॅजेडी किंग’ या नावाने प्रसिद्ध अभिनेता दिलीप कुमार (Dilip Kumar) यांचे बुधवारी (7 जुलै) सकाळी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात निधन झाले. दिलीपकुमार हे 98 वर्षांचे होते आणि बर्‍याच दिवसांपासून ते आजारीही होते. 65हून अधिक चित्रपटांमध्ये काम करणारे दिलीप कुमार मनोरंजन विश्वात प्रसिद्ध होण्यापूर्वी अत्यंत गरीब कुटुंबातील होते.

Dilip Kumar Passes Away : पुण्याच्या कॅन्टीनमध्ये 36 रुपये पगारावर काम, सँडविच विकताना दिल्या स्वातंत्र्याच्या घोषणा, तुरुंगवासही भोगला!
दिलीप कुमार
| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Jul 07, 2021 | 12:56 PM
Share

मुंबई : ‘ट्रॅजेडी किंग’ या नावाने प्रसिद्ध अभिनेता दिलीप कुमार (Dilip Kumar) यांचे बुधवारी (7 जुलै) सकाळी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात निधन झाले. दिलीपकुमार हे 98 वर्षांचे होते आणि बर्‍याच दिवसांपासून ते आजारीही होते. 65हून अधिक चित्रपटांमध्ये काम करणारे दिलीप कुमार मनोरंजन विश्वात प्रसिद्ध होण्यापूर्वी अत्यंत गरीब कुटुंबातील होते. दिलीपकुमार यांचे बालपण अत्यंत निकृष्ट स्थितीत व्यतीत झाले होते आणि त्यांना कॅन्टीनमध्ये काम करून उदरनिर्वाह करावा लागला होता (Dilip Kumar Passes Away actor Work in Pune canteen on a salary of Rs 36).

दिलीप कुमार यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 रोजी पेशावर येथे झाला होता. त्यावेळी हा प्रदेश भारतात होता. दिलीपकुमार यांची एकूण 12 भावंडे होती आणि त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही अत्यंत वाईट होती. दिलीप कुमार यांचे वडील कामाच्या शोधात पेशावरहून मुंबईला आले होते. मात्र, मुंबईत काम नसल्याने आणि कुटूंबियांशी झालेल्या वादामुळे दिलीपकुमार पुण्यात स्थायिक झाले. पुण्यात ते ब्रिटीश आर्मीच्या कॅन्टीनमध्ये सहाय्यक म्हणून काम करायचे. या नोकरीसाठी त्यांना महिन्याकाठी पगार म्हणून फक्त 36 रुपये मिळायचे.

सँडविच विकण्यास केली सुरुवात

65हून अधिक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या दिलीप कुमार यांनी या कॅन्टीनमध्ये काम करत असताना आपले सँडविच काउंटर उघडले. त्यांचे सँडविच ब्रिटीश सैनिकांमध्ये खूप लोकप्रिय होते. तथापि, या कामादरम्यान त्यांनी ब्रिटीश सैनिकांसमोर भारताच्या स्वातंत्र्याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली होती, त्यानंतर त्यांचे काम थांबले आणि त्यांना तुरुंगात जावे लागले. सुटकेनंतर ते मुंबईत आले आणि आपल्या वडिलांना त्यांच्या कामात मदत करण्यास सुरुवात केली. दिलीपकुमार यांनीही उशी विक्रीचे कामही केले होते, पण तेही यशस्वी झाले नाही.

म्हणून नावच बदलले!

सर्वांना ठाऊक आहे की दिलीप कुमार यांचे खरे नाव मोहम्मद युसूफ खान होते, परंतु हे का बदलण्यात आले याची कथा फारच थोड्या लोकांना माहिती आहे. बॉम्बे टॉकीजची मालक देविका राणी यांनी दिलीपकुमार यांना चित्रपटांमध्ये काम करण्याची ऑफर दिली, पण त्यांच्या वडिलांना हे अजिबात पटले नाही. म्हणूनच वडिलांच्या भीतीमुळे त्यांनी आपले नाव बदलले. देविका राणी यांनी त्यांना नाव बदलण्याचा सल्ला दिला होता.

(Dilip Kumar Passes Away actor Work in Pune canteen on a salary of Rs 36)

हेही वाचा :

Dilip Kumar :चित्रपटांचा बेताब बादशाह, फळांची विक्रीही केली, असा राहिला शेती-मातीशी संबंध

Dilip Kumar Top 5 Films : ‘नया दौर’पासून ‘राम और शाम’पर्यंत, दिलीप कुमारांचे सुपरहिट चित्रपट आजही लोकप्रिय!

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप