महेश भट्ट यांनी केले गौप्यस्फोट, अनैतिक अपत्य म्हणून हिणवले, माझी आई मुस्लिम असूनही हिंदूसारखी…
महेश भट्ट हे नुकताच एक शोमध्ये पोहचले होते. यावेळी महेश भट्ट यांनी काही मोठे आणि धक्कादायक खुलासे केले आहेत. महेश भट्ट यांनी केलेल्या विधानांमुळे आता विविध चर्चा रंगताना दिसत आहेत.

मुंबई : प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते महेश भट्ट (Mahesh Bhatt) हे त्यांच्या चित्रपटासोबत पर्सनल लाईफमुळेही कायच चर्चेत असतात. रिया चक्रवर्ती आणि महेश भट्ट यांच्यामधील व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. इतकेच नाहीतर महेश भट्ट आणि रिया चक्रवर्तीचे काही फोटोही (Photo) व्हायरल झाले होते. कायमच वादामध्ये महेश भट्ट अडकतात. नुकताच अरबाज खान याच्या द इन्विंसिबल या शोमध्ये महेश भट्ट पोहचले होते. यावेळी महेश भट्ट यांनी काही मोठे खुलासे केले आहेत. यावेळी महेश भट्ट यांनी त्यांच्या पर्सनल लाईफबद्दलही काही गोष्टी सांगितल्या आहेत. लहानपणी आयुष्यामध्ये काय घडले हे सांगताना महेश भट्ट दिसले.
महेश भट्ट म्हणाले की, माझा जन्म 1948 मध्ये झाला. माझा जन्म ज्यावेळी झाला, त्यावेळी माझ्या आई वडिलांचे लग्न झाले नव्हते. आम्ही शिवाजी पार्क परिसरात राहत होतो. शिवाजी पार्क भागामध्ये त्यावेळी जास्त हिंदू लोक राहत असतं. यामुळे माझ्या आईला त्यावेळी तिचा धर्म लपवावा लागत असतं. माझी आई एक मुस्लीम असूनही तिला साडी आणि कपाळ्यावर टिकली लावावी लागत होती.
महेश भट्ट पुढे म्हणाले की, माझी आई एक शिया मुसलमान होती आणि माझे वडील हे हिंदू होते. शिवाजी पार्क परिसरात आमच्या घराला नाजायज घर म्हटले जायचे. माझी वडील कधी कधी आमच्याकडे यायचे. ज्यावेळी ते घरी यायचे त्यावेळी मला कोणीतरी बाहेरील व्यक्ती आमच्या घरी आल्यासारखे वाटायचे.
माझ्या वडिलांचे दुसरे घर हे अंधेरीला होते, ते आमच्याकडे कधीतरी येत होते. बऱ्याच वेळा लोक मला कोपऱ्यामधून नेऊन म्हणायचे की, तू अनैतिक अपत्य आहेस. महेश भट्ट यांचे वडील नानाभाई भट्ट हे त्यावेळचे चित्रपट निर्माता होते. इतकेच नाहीतर काही लोक मला कायमच विचारायचे की, तुझे वडील कोण आहेत.
पुढे महेश भट्ट म्हणाले की, मला कायमच अनैतिक अपत्य म्हणून हिनवले गेले, यामुळे मला खूप जास्त त्रास झाला. त्यानंतर महेश भट्ट यांनी लोकांना थेट सांगण्यास सुरूवात केली की, माझे वडील आमच्यासोबत राहत नाहीत. त्यानंतर लोकांनी यावर बोलणे बंद केले. या शोमध्ये महेश भट्ट यांनी आपल्या लहानपणीच्या अनेक आठवणी देखील सांगितल्या आहेत. महेश भट्ट यांची मुलगी आलिया भट्ट हिने काही दिवसांपूर्वीच एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. आलियाने तिच्या मुलीचे नाव राहा असे ठेवले आहे.
