दिशा-टायगरचं ब्रेकअप? आता राहिली फक्त मैत्री? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

स्वाती वेमूल, Tv9 मराठी

|

Updated on: Mar 02, 2022 | 12:43 PM

अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आणि अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) हे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा गेल्या काही वर्षांपासून आहेत. आता टायगरच्या वाढदिवसानिमित्त दिशाने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला आहे. मात्र या व्हिडीओच्या कॅप्शनने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

दिशा-टायगरचं ब्रेकअप? आता राहिली फक्त मैत्री? सोशल मीडियावर चर्चेला उधाण
Tiger Shroff and Disha Patani
Image Credit source: Instagram

अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आणि अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) हे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा गेल्या काही वर्षांपासून आहेत. या दोघांना अनेकदा एकमेकांसोबत सुट्टयांचा आनंद घेताना, पार्ट्या करताना पाहिलं गेलंय. अनेकदा दिशा टायगरच्या कुटुंबीयांनाही भेटली आहे. टायगरची आई आयेशा आणि बहीण कृष्णा यांच्यासोबत तिची चांगली मैत्री झाल्याचं पहायला मिळतं. आता टायगरच्या वाढदिवसानिमित्त दिशाने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओद्वारे तिने टायगरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र या व्हिडीओच्या कॅप्शनने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. दिशाने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये टायगरला ‘बेस्ट फ्रेंड’ म्हटलं आहे. त्यावरून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. ‘टायगरला फ्रेंड झोन केलंस’, असंही काहींनी म्हटलं आहे. तर काहींनी या दोघांचं ब्रेकअप झालं की काय, असा अंदाज वर्तवला आहे. (Tiger Shroff Birthday)

दिशाने पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये टायगर हसताना पहायला मिळत आहे. बॅकग्राऊंडमध्ये ‘हॅपी बर्थडे’चं गाणं ऐकायला मिळत आहे. ‘माझ्या सर्वोत्कृष्ट मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा. कठोर मेहनतीने आणि चांगल्या मनाने लाखो लोकांना प्रेरणा देण्यासाठी तुझे आभार. तू खूप सुंदर आहेस’, अशा शब्दांत दिशाने भावना व्यक्त केल्या आहेत. या व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये टायगरची आई आयेशा यांनी हृदयाचे इमोजी पोस्ट केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by disha patani (paatni) 🦋 (@dishapatani)

दिशाने टायगरला ‘बेस्ट फ्रेंड’ म्हटल्याने काही नेटकऱ्यांनी त्यावरून तर्कवितर्क लावण्यास सुरुवात केली आहे. दिशाने टायगरला ‘फ्रेंडझोन’ केलं, असं अनेकांनी म्हटलं आहे. एका युजरने लिहिलं ‘दिशा टायगरला म्हणत असेल की आपणसुद्धा विकी-कतरिनासारखं थेट लग्न करून सर्वांना धक्का देऊयात. तोपर्यंत मात्र आपण मित्रच राहू.’ टायगर-दिशा ही बॉलिवूडमधली सर्वांत चर्चेत असलेली जोडी आहे.

दिशाच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, तिने नुकतंच ‘योद्धा’ या करण जोहरच्या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. यामध्ये ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत भूमिका साकारत आहे. सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. दिशाचा ‘एक व्हिलन २’ हा चित्रपटसुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर दुसरीकडे टायगर हा ‘गणपत’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.

हेही वाचा: 

‘झुंड’मधील बिग बींचं अभिनय पाहून चक्रावला आमिर; म्हणाला…

“20-30 वर्षांत जे आमच्याकडून नाही झालं, ते नागराजने करून दाखवलं”; आमिर खानचे डोळे पाणावले

मराठमोळ्या नागराज मंजुळेंसाठी अमिताभ बच्चन यांचा मोठा निर्णय; बिग बींचं कौतुक करावं तेवढं कमी!

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI