वाद सुरू असतानाच रिलीजच्या अगोदर शाहरुख खान याच्यासह पठाण चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठा झटका

शितल मुंडे, Tv9 मराठी

Updated on: Jan 24, 2023 | 7:03 PM

पठाण चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. अनेकांनी थेट चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली.

वाद सुरू असतानाच रिलीजच्या अगोदर शाहरुख खान याच्यासह पठाण चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठा झटका

मुंबई : शाहरुख खान हा त्याच्या पठाण या चित्रपटामुळे सध्या प्रचंड चर्चेत आहे. पठाण हा चित्रपट रिलीज होण्यासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. शाहरुख खान (Shah Rukh Khan) याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी तब्बल चार वर्षे वाट बघितलीये. शाहरुख खान हा चार वर्षे चित्रपटांपासून दूर होता. यामुळे या चित्रपटाकडून चाहत्यांना प्रचंड अपेक्षा नक्कीच आहेत. विशेष म्हणजे अनेकांनी या चित्रपटाचे तिकिटे देखील बुक केली आहेत. शाहरुख खान याच्या पठाण (Pathaan) चित्रपटाची एक हवा बघायला मिळत आहे. २०२३ हे वर्ष शाहरुख खान याच्यासाठी अत्यंत खास आहे. कारण चार वर्षानंतर बिग बजेटच्या चित्रपटासोबत धमाकेदार पध्दतीमध्ये शाहरुख खान पुनरागमन करतोय. इतकेच नाहीतर या चित्रपटानंतर शाहरुख खान याचा डंकी हा चित्रपट लगेचच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या एका वर्षात शाहरुख खान याचे तब्बल तीन चित्रपट प्रेक्षकांच्या (Audience) भेटीला येतील.

पठाण चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. अनेकांनी थेट चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली. इतकेच नाहीतर चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे काढून टाकण्याची मागणी होत होती.

देशातील अनेक भागांमध्ये पठाण चित्रपटाविरोधात आंदोलने देखील करण्यात आली. मात्र, याचा कुठेतरी फायदा हा पठाण चित्रपटाला झाल्याचे बघायला मिळाले. कारण बेशर्म रंग हे गाणे हीट ठरले.

एकीकडे पठाण चित्रपटाविरोधात सोशल मीडियावर मोठी मोहिम सुरू असतानाच दुसरीकडे आता चित्रपट निर्मात्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी पुढे आलीये. विशेष म्हणजे चित्रपट रिलीज होण्यास काही तास शिल्लक असतानाच.

रिपोर्टनुसार काही वेबसाईटने चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदरच पठान चित्रपट लीक केलाय. यामध्ये काही वेबसाईटची नावे देखील पुढे आली आहेत. यापूर्वी अशाच प्रकारे चित्रपट लीक झाल्याने चित्रपटांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.

विशेष म्हणजे या साईटवर एचडी प्रिंट चित्रपटाची उपलब्ध असल्याचे सांगितले जातंय. जर खरोखरच असे घडले असेल तर याचा मोठा परिणाम हा पठाण चित्रपटाच्या बाॅक्स आॅफिसवर होऊ शकतो. मात्र, अजूनही निर्मात्यांनी याची अधिकृत माहिती दिली नाहीये.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI