मुंबई : अभिनेते कमल हासन यांची मुलगी आणि अभिनेत्री श्रुती हासन नेहमीच चर्चेत असते. आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये श्रुतीने जबरदस्त भूमिका केल्या आहेत. श्रुती तिच्या बोल्ड लूकसाठी ओळखली जाते. मात्र, नुकताच श्रुतीने तिचे असे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, त्यामुळे ती चर्चेत आलीये. नेटकरी श्रुतीच्या या फोटोंवर फिदा झाले आहेत. विशेष म्हणजे श्रुतीच्या या फोटोंचे काैतुक केले जात आहे. हे फोटो कुठल्याही फोटोशूटचे नसून हे फोटो अगदी साधे फोटो आहेत.
चाहत्यांना आपल्यासोबत जोडून ठेवण्यासाठी सर्वच अभिनेत्री या अत्यंत बोल्ड फोटोशूट करून कायमच सोशल मीडियावर शेअर करतात. मात्र, या सर्वांना कमल हासन यांची लेक अपवाद नक्कीच ठरलीये.
कारण कुठलीच अभिनेत्री रिअल फोटो कधी सोशल मीडियावर शेअर करत नाही. परंतू श्रुती हासन हिने तिचे रिअल काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो पाहून सुरूवातीला तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.
View this post on Instagram
श्रुती हासनने शेअर केलेले फोटो पाहून अगोदर चाहत्यांना धक्का बसला. श्रुतीचे हे फोटो पाहून वाटत आहे की, ती खूप जास्त आजारी वगैरे आहे. त्यानंतर श्रुती हासन हिने या फोटोंमागचे कारण सांगून टाकले आहे.
श्रुतीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा थकलेला चेहरा, विस्कटलेले केस आणि सुजलेले डोळे दिसत आहेत. हे फोटो शेअर करताना तिने कॅप्टशनमध्ये लिहिले की, एकदम परफेक्ट सेल्फी…
केसांचा खराब दिवस, ताप आणि सुजलेले डोळे पीरियड क्रॅम्पचा दिवस आणि बाकीच्या गोष्टी तुम्हालाही आवडतील अशी आशा आहे, म्हणत हे दोन फोटो श्रुती हसन हिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.