AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Farhan-Shibani Wedding : महाराष्ट्रीय रिवाजानुसार लगीनगाठ बांधणार फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर

बॉलिवूड रिपोर्टनुसार 19 फेब्रुवारी रोजी फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर फरहानच्या खंडाळ्यातील फार्महाऊसवर सात फेरे घेत साताजन्माची गाठ बांधणार आहेत. या विवाह सोहळ्यात फरहान आणि शिबानी यांचे जवळचे मित्र आणि नातेवाईक सहभागी होणार आहेत.

Farhan-Shibani Wedding : महाराष्ट्रीय रिवाजानुसार लगीनगाठ बांधणार फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर
महाराष्ट्रीय रिवाजानुसार लगीनगाठ बांधणार फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर
| Edited By: | Updated on: Feb 17, 2022 | 11:43 PM
Share

मुंबई : सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचा मौसम सुरु आहे. अनेक प्रसिद्ध जोड्या विवाहबंधनात अडकत आहेत. अशाच एका जोडीची सध्या बॉलिवूडमध्ये जोरदार सुरु आहे. चंदेरी दुनियेतील आणखी जोडी विवाहबंधनात अडकत आहेत. बॉविवूड अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) शनिवारी लगीनगाठ बांधत आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रीय रिती-रिवाजानुसार हा विवाह पार पडणार आहे. बॉलिवूड रिपोर्टनुसार 19 फेब्रुवारी रोजी फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर फरहानच्या खंडाळ्यातील फार्महाऊसवर सात फेरे घेत साताजन्माची गाठ बांधणार आहेत. या विवाह सोहळ्यात फरहान आणि शिबानी यांचे जवळचे मित्र आणि नातेवाईक सहभागी होणार आहेत. फरहान अख्तरची आई हनी ईरानी यांनी ही माहिती दिली आहे. (Farhan Akhtar and Shibani Dandekar will get married in a Maharashtrian tradition)

हनी ईरानींनी दिली महाराष्ट्रीय विवाहाची माहिती

फरहान आणि शिबानी गेल्या चार वर्षापासून रिलेशनशीपमध्ये आहेत. यानंतर त्यांनी आपले नाते अधिकच घट्ट करण्यासाठी लग्नाचा निर्णय घेतला. लग्नाच्या आधीच्या रिती-रिवाजांना सुरुवात झाली असून आज 17 फेब्रुवारी रोजी शिबानीच्या वांद्रे स्थित घरामध्ये मेहंदी सेरेमनी पार पडली. या सेरेमनीमध्ये जवळच्या मित्र परिवाराला आमंत्रित करण्यात आले होते. यासाठी घरीच सर्व तयारी करण्यात आली होती. या विवाहामुळे आपण सर्व जण खूप खूश असल्याचे हनी ईरानी म्हणाल्या. लग्नाची तयारीही जोरदार करण्यात आली असून 19 फेब्रुवारी रोजी बहुचर्चित विवाह संपन्न होईल. हा विवाह खाजगी पद्धतीने पार परडणार आहे. मीडियाने विवाहाला उपस्थित राहून फोटो काढू नये म्हणून हा विवाहाबाबत अधिक माहिती देत नसल्याचे हनी ईरानी यांनी स्पष्ट केले. आज तकने दिलेल्याम माहितीनुसार, लग्नासाठी 18 फेब्रुवारी रोजी फरहान आणि शिबानीचे कुटुंबीय विवाहस्थळी दाखल होतील. 19 फेब्रुवारी रोजी पारंपरिक विवाह पार पडल्यानंतर 21 फेब्रुवारी सिविल सेरेमनीमध्ये लग्न होईल.

एका रिअॅलिटी शोमध्ये झाली होती ओळख

फरहान आणि शिबानीची ओळख एका रिअॅलिटी शो दरम्यान झाली होती. वर्ष 2015 मध्ये ‘I Can Do That’ हा रिअॅलिटी शो टीव्हीवर सुरु होता. या शो मध्ये फरहान होस्ट होता तर शिबानी कंटेस्टंट होती. या शो दरम्यान त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या. त्यानंतर 2018 मध्ये दोघांनी आपल्या रिलेशीपवर शिक्कामोर्तब केला. सोशल मीडियावरही दोघांचे एकत्र फोटो शेअर करु लागले. फरहानचे हे दुसरे लग्न आहे. अधुना भबानीसोबत 16 वर्ष संसार केल्यानंतर दोघांनी 2017 मध्ये आपल्या वैवाहिक आयु्ष्याला पूर्णविराम दिला. त्यानंतर फरहानने मुव्ह ऑन करत शिबानीसोबत नाते जोडले. (Farhan Akhtar and Shibani Dandekar will get married in a Maharashtrian tradition)

इतर बातम्या

Tv9 Public Poll: प्रत्येक वेळेस बाईनच घर का सोडावं? अरूंधती जोगळेकरनं देशमुखांचं घर सोडावं? जनतेचाच कौल वाचा

Video: अब कपडे उतरेंगे तो सबके सामने, लॉक अपमध्ये कोणत्या सेलिब्रेटींचे कपडे उतरवणार कंगना रनावत?

मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गासाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गासाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.