AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Feroz Khan Birth Anniversary | बॉलिवूडचे ‘काऊबॉय’ म्हणून ओळख, ‘अशी’ झाली होती फिरोज खान यांच्या कारकिर्दीची सुरुवात!

हिंदी चित्रपटांचे निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते, फिरोज खान (Feroz Khan) यांची बॉलिवूड दिग्गज अभिनेता म्हणून आठवण काढली जाते. त्यांची स्वॅगर आणि काऊबॉय प्रतिमा आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. त्यांना फिल्म इंडस्ट्रीचे स्टाईल आयकॉन मानले जात होते.

Feroz Khan Birth Anniversary | बॉलिवूडचे ‘काऊबॉय’ म्हणून ओळख, ‘अशी’ झाली होती फिरोज खान यांच्या कारकिर्दीची सुरुवात!
Feroz Khan
| Edited By: | Updated on: Sep 25, 2021 | 8:10 AM
Share

मुंबई : हिंदी चित्रपटांचे निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते, फिरोज खान (Feroz Khan) यांची बॉलिवूड दिग्गज अभिनेता म्हणून आठवण काढली जाते, ज्यांनी स्वतःची विशिष्ट शैली निर्माण केली. जर आपण फिरोज खान निर्मित चित्रपट बघितले, तर त्याचे चित्रपट मोठ्या बजेटचे असायचे ज्यात मोठ्या स्टार्सना आकर्षक आणि भव्य सेट, सुंदर लोकेशन्स, हृदयस्पर्शी गाणी, संगीत आणि उत्तम तंत्र पाहायला मिळायाचे. एक अभिनेता म्हणूनही, फिरोज खान यांनी स्वतःची विशिष्ट शैली तयार केली, जी बॉलिवूडच्या नायकाच्या पारंपारिक प्रतिमेच्या विरूद्ध चमकदार आणि दमदार होती.

त्यांची स्वॅगर आणि काऊबॉय प्रतिमा आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. त्यांना फिल्म इंडस्ट्रीचे स्टाईल आयकॉन मानले जात होते. 25 सप्टेंबर 1939 रोजी बेंगळुरू येथे जन्मलेल्या फिरोज खान यांनी बंगलोरच्या बिशप कॉटनबॉयज स्कूल आणि सेंट जर्मन बॉईज हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि नशीब आजमावण्यासाठी ते मुंबईत आले. 1960मध्ये त्यांना ‘दीदी’ चित्रपटात पहिल्यांदा अभिनयाची संधी मिळाली. या चित्रपटात ते सहकलाकार होता. यानंतर, पुढील पाच वर्षांसाठी, त्यांना बहुतेक चित्रपटांमध्ये सह-कलाकारांच्या भूमिकाच मिळाल्या.

प्रेक्षकांमध्ये पाडली छाप!

मात्र, लवकरच त्यांचे भाग्य बदलले आणि त्यांना 1965मध्ये फणी मजुमदार यांच्या ‘उंचे लोग’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात फिरोज खान यांच्यासोबत अशोक कुमार आणि राजकुमार सारखे मोठे कलाकार होते. पण त्यांच्या भावपूर्ण अभिनयाने ते प्रेक्षकांमध्ये आपली छाप पाडण्यात यशस्वी झाले.

त्याच वर्षी फिरोज खान यांचा आणखी एक चित्रपट ‘आरझू’ प्रदर्शित झाला, ज्यात राजेंद्र कुमार नायक होता आणि साधना नायिका होती. या चित्रपटात त्यांनी आपल्या प्रेमाचा त्याग करणाऱ्या तरुणाची भूमिका केली होती. 1969मध्ये त्यांचा चित्रपट ‘आदमी और इंसान’ आला. या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार मिळाला. फिरोज खान त्याचा भाऊ संजय खानसोबत काही चित्रपटांमध्ये दिसला ज्यात ‘उपासना’, ‘मेला’, ‘नागिन’ यासारख्या हिट चित्रपटांचा समावेश आहे.

दिग्दर्शक म्हणून पदार्पण

1972 साली रिलीज झालेल्या ‘अपराध’ या चित्रपटाद्वारे निर्माता दिग्दर्शक म्हणून फिरोज खानने यशस्वी पदार्पण केले. यानंतर फिरोज खानने ‘धर्मात्मा’, ‘कुर्बानी’, ‘जांबाज’, ‘दयावान’, ‘यल्गार’, ‘प्रेम अगन’ आणि ‘जानशी’ असे काही चित्रपट तयार केले.

चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनाच्या काळात फिरोज खान यांनी हिंदी चित्रपटांमध्ये काही नवीन गोष्टी सुरू केल्या. जर्मनीमध्ये कार रेस दाखवणारा ‘अपराध’ हा भारतातील पहिला चित्रपट होता. ‘धर्मात्मा’च्या शूटिंगसाठी तो अफगाणिस्तानातील सुंदर ठिकाणी गेले होते. यापूर्वी कोणताही भारतीय चित्रपट तेथे चित्रीत झाला नव्हता.

भूमिका नाकारल्या देखील!

पाकिस्तानी पॉप गायिका नाझिया हसनने तिच्या संगीत कारकीर्दीची सुरुवात फिरोज खान यांच्या ‘कुर्बानी’ या चित्रपटाने केली. फिरोज खान हे काही मोजक्या अभिनेत्यांपैकी एक होते, ज्यांनी स्वतःच्या अटींवर चित्रपटांमध्ये काम करणे पसंत केले. यामुळे त्याने अनेक चांगल्या चित्रपटांच्या ऑफर नाकारल्या होत्या. त्यांनी राज कपूर यांच्या ‘संगम’ चित्रपटात राजेंद्र कुमार आणि ‘आम आदमी’ चित्रपटात मनोज कुमार यांची भूमिका नाकारली होती.

वर्ष 2003 मध्ये, फिरोज खानने आपला मुलगा फरदीन खान याला लाँच करण्यासाठी ‘जानशीन’ची निर्मिती केली. बॉलिवूडमध्ये ‘काऊबॉय’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या फिरोज खान यांनी चार दशकांच्या कारकिर्दीत सुमारे 60 चित्रपटांमध्ये काम केले. आपल्या अनोख्या शैलीने प्रेक्षकांमध्ये एक विशेष ओळख असलेले फिरोज खान यांनी 27 एप्रिल 2009 रोजी या जगाचा निरोप घेतला.

हेही वाचा :

‘लगान’मधील ‘केसरीया’ आर्थिक तंगीने बेजार, 11 वर्षांपासून बेरोजगार, औषध पाण्यासाठीही पैसे नाहीत!

तापसी पन्नूसोबत जुळणार गुलशन देवैयाची जोडी, ‘ब्लर’मधील भूमिकेविषयो सांगताना अभिनेता म्हणतो…

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.