तापसी पन्नूसोबत जुळणार गुलशन देवैयाची जोडी, ‘ब्लर’मधील भूमिकेविषयो सांगताना अभिनेता म्हणतो…

अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) झी स्टूडियोच्या सहयोगाने आपल्या प्रोडक्शन बॅनर, आउटसाइडर फिल्म्स अंतर्गत आपला पहिला चित्रपट 'ब्लर' (Blur) सादर करण्यास पूर्णपणे सज्ज आहे. अजय बहल यांच्याद्वारे दिग्दर्शित या चित्रपटात तापसी पन्नू आणि गुलशन देवैया (Gulshan Devaiya) मुख्य भूमिकेत असणार आहेत.

तापसी पन्नूसोबत जुळणार गुलशन देवैयाची जोडी, 'ब्लर'मधील भूमिकेविषयो सांगताना अभिनेता म्हणतो...
Taapasee-Gulshan
Follow us
| Updated on: Sep 24, 2021 | 2:32 PM

मुंबई : अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) झी स्टूडियोच्या सहयोगाने आपल्या प्रोडक्शन बॅनर, आउटसाइडर फिल्म्स अंतर्गत आपला पहिला चित्रपट ‘ब्लर’ (Blur) सादर करण्यास पूर्णपणे सज्ज आहे. अजय बहल यांच्याद्वारे दिग्दर्शित या चित्रपटात तापसी पन्नू आणि गुलशन देवैया (Gulshan Devaiya) मुख्य भूमिकेत असणार आहेत. एक प्रतिभाशाली अभिनेता, गुलशन देवैयाने आपल्या अभिनयातील उत्तम प्रदर्शनाने दर्शकांची मने जिंकली आहेत. तो या साइकोलॉजिकल थ्रिलरमध्ये तापसीच्या नवऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

आपली व्यक्तिरेखा नीलबाबत बोलताना गुलशन म्हणाला कि,“मी गायत्रीचा नवरा नीलची व्यक्तिरेखा साकारतो आहे, जो खूप चांगला, समजूतदार व्यक्ती आहे, मात्र आतून दु:खी आणि अपूर्ण आहे. त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे. मात्र, त्यांच्या नात्यातील तणाव उघडपणे दिसून येतो.”

कशी आहे ही नवी व्यक्तिरेखा

व्यक्तिरेखेच्या विशेषतांविषयी बोलताना, तो म्हणतो की, “नील एका चांगल्या समृद्ध कुटुंबातून आहे आणि खरं पाहिल्यास त्याला जगण्यासाठी काम करण्याची आवश्यकता नाही आहे आणि त्याने आपल्या पॅशनेट पत्नी गायत्रीसाठी सहायक स्थितीत आहे, जी मानववंश शास्त्रज्ञ आहे आणि आपल्या कामासाठी पूर्णपणे समर्पित आहे.”

तापसीसोबत सेटवरच्या अनुभवांविषयी बोलताना, गुलशनने सांगितले की, “माझ्या अविस्मरणीय अनुभवांपैकी ब्लरच्या सेटवरचे अनुभव आहेत. तापसीसोबत काम करताना खूप मजा येते, मी तिच्यासोबत मिळून प्रँक्स करत होतो आणि टीममध्ये खूप मजेदार गोष्टी घडत होत्या. सेट तेव्हा एक अशी उत्तम जागा आहे, जेव्हा तुम्ही एक अशा प्रेमळ टीमसोबत काम करत असता.”

तापसीच्या ‘आउटसाइडर फिल्म्स’ अंतर्गत बनणार चित्रपट

चित्रपटाला मोठ्या प्रमाणात सुंदर अशा नैनीतालमध्ये चित्रित करण्यात आले आहे. ज्याची कथा पवन सोनी आणि अजय बहल यांच्याद्वारे लिहिण्यात आली आहे. ही एका अपरिहार्य परिस्थितित अडकलेल्या मुलीची कहाणी आहे जी रोमांच आणि नाट्याने भरपूर आहे. झी स्टूडियोज, तापसी पन्नूची ‘आउटसाइडर फिल्म्स’ आणि इकोलोन प्रोडक्शंसची ‘ब्लर’ आपल्या अंगावर काटा आणेल. चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

तापसी ‘रश्मी रॉकेट’मध्ये व्यस्त

‘रश्मी रॉकेट’ ही एका छोट्या गावातल्या तरुण मुलीची कथा आहे. मात्र, तिच्याकडे एक अविश्वसनीय अशी शक्ती आहे. आकर्ष खुराना यांच्याद्वारे दिग्दर्शित ‘रश्मी रॉकेट’, नंदा पेरियासामी यांच्या मूळ कथेवर आधारित आहे. यामध्ये ‘रश्मी रॉकेट’ला आपले स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची आणि स्पर्धेत व्यावसायिक रूपाने सहभागी होण्याची संधी मिळते. मात्र, तिला हेही जाणवते की, फिनिश लाईन आणि धावणे यामध्ये अनेक संकटे आहेत. अखेरीस ही एथलेटिक स्पर्धा सम्मान आणि तिच्या व्यक्तिगत लढाईत रूपांतरित होते.

हा चित्रपट माझ्यासाठी खास!

तापसी पन्नू म्हणते की, “हा चित्रपट एका वेगळ्या तऱ्हेने खास आहे. बऱ्याचदा माझ्याशी तेव्हा संपर्क केला जातो जेव्हा स्क्रिप्ट किंवा दिग्दर्शक चित्रपट बनवण्यासाठी तयार असतात. मात्र, या चित्रपटाच्या कथेची वन लाईन चेन्नईमध्ये माझ्याकडे आली आणि तिथून एक पूर्ण चित्रपट बनण्याची तयारी सुरू झाली. असे आधी कोणत्या चित्रपटांविषयी झाले नव्हते. पहिल्या दिवसापासूनच प्रत्येक जण या कथेवर इतका ठाम होता की, कोणा स्टॅक होल्डरसोबत जाण्यासाठी आणि यासाठी आपले सर्वश्रेष्ठ देण्यासाठी तयार करणे कठीण गेले नाही. यासाठी या चित्रपटाचा परिणाम मला माझ्या अन्य चित्रपटांच्या तुलनेत अधिक प्रभावित करेल आणि मला याचा खूप अभिमान आहे.”

हेही वाचा :

Rani Chatterjee : 7 वर्षात पूर्णपणे बदलली राणी चॅटर्जी, अभिनेत्रीचा ट्रान्सफॉर्मेशन लूक पाहून तु्म्हीही थक्क व्हाल

Kapil Sharma | कपिल शर्मा शोमधील ‘तो’ सीन वादग्रस्त, निर्मात्यांविरोधात FIR दाखल, वाचा नेमकं काय घडलं…

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.