Goodbye trailer: आईच्या अंत्यसंस्कारावरून वाद; बिग बी-रश्मिकाच्या ‘गुडबाय’चा ट्रेलर पाहिलात का?

'डिअर कॉम्रेड', 'पुष्पा' यांसारख्या चित्रपटांमधून रश्मिकाने आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली. आता पहिल्याच बॉलिवूड चित्रपटात ती बिग बींसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

Goodbye trailer: आईच्या अंत्यसंस्कारावरून वाद; बिग बी-रश्मिकाच्या 'गुडबाय'चा ट्रेलर पाहिलात का?
Goodbye trailer Image Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Sep 06, 2022 | 3:17 PM

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या ‘गुडबाय’ (Goodbye) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ‘डिअर कॉम्रेड’, ‘पुष्पा’ यांसारख्या चित्रपटांमधून रश्मिकाने आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली. आता पहिल्याच बॉलिवूड चित्रपटात ती बिग बींसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटात बिग बी आणि रश्मिकासोबतच नीना गुप्ता, पावैल गुलाटी आणि सुनील ग्रोव्हर यांच्याही भूमिका आहेत.

भल्ला कुटुंबातील मुलांची कथेची झलक या ट्रेलरमध्ये पहायला मिळते. आईच्या (नीना गुप्ता) अंत्यसंस्कारावरून त्यांच्यामध्ये भांडण सुरू असतं. वडिलांना (अमिताभ बच्चन) संपूर्ण विधीवत अंत्यसंस्कार करायचे असतात. मात्र त्यांची मुलगी (रश्मिका) त्या सर्व गोष्टींवर प्रश्न उपस्थित करते. अंत्यविधीतील छोट्या-छोट्या गोष्टी तिला मान्य नसतात. तिची भावंडंसुद्धा अशीच असतात. एक दुबईत अडकलेला असतो, तर दुसरा आईच्या निधनानंतर केशवपन करण्यास नकार देतो. हे सर्व पाहून बिग बी नाराज होतात.

हे सुद्धा वाचा

कंगनाच्या ‘क्वीन’ या चित्रपटाचं दिग्दर्शन करणाऱ्या विकास बहलने ‘गुडबाय’चं दिग्दर्शन केलं आहे. 2018 मध्ये मी टू मोहिमेत विकासचं नाव समोर आलं होतं. एकता कपूरच्या बालाजी मोशन पिक्चर्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. येत्या 7 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

‘गुडबाय’शिवाय रश्मिका सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘मिशन मजनू’ या चित्रपटातही झळकणार आहे. त्याचसोबत ‘ॲनिमल’मध्येही ती रणबीर कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन ‘अर्जुन रेड्डी’ फेम संदीप रेड्डी वांगा करणार आहे.

Non Stop LIVE Update
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.