‘थोडे पैसे, खायला दिले असते तर…’, नॅशनल क्रश रश्मिका मंदाना ट्रोल

'थोडे पैसे, खायला दिले असते तर...', नॅशनल क्रश रश्मिका मंदाना ट्रोल
रश्मिका मंदाना

रश्मिकाचा एक व्हीडिओ चांगलाच व्हायरल होतोय. त्यावरून 'त्या गरीब मुलींना पैसे दिले असते. खायला दिलं असतं तर काय झालं असतं', असं म्हणत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

Jan 25, 2022 | 4:25 PM

मुंबई : नॅशनल क्रश रश्मिका मंदाना (rashmika mandana) नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते. कधी तिचे फोटो तर कधी तिचा चित्रपट सोशल मीडियावर चर्चेत असतो. नुकताच तिचा पुष्पा चित्रपट आला ज्यानं बॉक्स ऑफिसवर धुमाकुळा घातला. या चित्रपटातली गाणी प्रचंड व्हायरल झाली. सध्या रश्मिकाचा एक व्हीडिओ चांगलाच व्हायरल होतोय. त्यावरून ‘त्या गरीब मुलींना पैसे दिले असते. खायला दिलं असतं तर काय झालं असतं’, असं म्हणत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

व्हायरल व्हीडिओ काय आहे रश्मिका एका हॉटेलमधून बाहेर येतानाचा हा व्हीडिओ आहे. यावेळी फोटोग्राफर्स तिचे फोटो काढताना दिसत आहेत. याचवेळी एक लहान मुलगी तिच्या जवळ येते आणि पैसे किंवा काही खायला देण्याची मागणी करते. याचवेळी रश्मिकाच्या टीममधला एकजण म्हणतो की मी तुला खायला देतो. तेव्हा रश्मिका तिचं म्हणणं ऐकते. पण तिला काहीही न देता गाडीत जाऊन बसते. रश्मिकाचं हे वागणं नेटकऱ्यांना पटलेलं दिसत नाही.

नेटकऱ्यांचं मत काय रश्मिकाची दाक्षिणात्य चित्रपटातील टॉप हिरॉइन्समध्ये होते. तिचा मोठा चाहतावर्ग आहे. पण आपल्या लाडक्या अभिनेत्रीचं हे असं वागणं नेटकऱ्यांना पटलेलं दिसत नाही. नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं आहे. ‘त्या मुलीला खायला दिलं असतं तर काय झालं असतं’, असं एकाने विचारलं आहे. तर दुसऱ्याने ‘रश्मिका तू एवढे पैसे कमावतेस पण या गरीब बिचाऱ्या मुलीला तू साधे 100 रूपये पण देऊ शकत नाहीस, तर मग तुझ्या एवढे पैसे कमावण्याचा काय उपयोग’, अशी मकेंट केली आहे.

रश्मिकाचा नुकताच पुष्पा चित्रपट आला. ज्यानं बॉक्स ऑफिसवर धुमाकुळा घातला. या चित्रपटातली गाणी प्रचंड व्हायरल झाली. हा चित्रपट इतर भाषांतही भाषांतरीत झाला. यातलं रश्मिकाचं कामही सिने रसिकांना आवडलं. पण या व्हायरल व्हीडिओवरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

संबंधित बातम्या

हवा सी उडती जाऊ… सई लोकुरचा हटके अंदाज, फोटो एकदा बघाच

“स्वत: ला समजतोस कोण, असे 100 सलमान खान गल्ली झाडायला उभे करेन”

‘लॉ ऑफ लव्ह’ सिनेमा बघायला जा, टिकीट दाखवा आणि बुलेट घेऊन जा!, सिनेरसिकांसाठी अनोखी ऑफर

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें