Happy Birthday Imtiaz Ali | ‘जब बी मेट’ ते ‘हायवे’, प्रेक्षकांच्या नेहमीच लक्षात राहतील इम्तियाज अलीचे ‘हे’ चित्रपट!

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: Harshada Bhirvandekar

Updated on: Jun 16, 2021 | 4:48 PM

बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक, लेखक इम्तियाज अली (Imtiaz Ali) आज (16 जून) आपला 50वा वाढदिवस साजरा करत आहेत. इम्तियाज यांचा जन्म 16 जून 1971 रोजी जमशेदपूर येथे झाला होता.

Happy Birthday Imtiaz Ali | ‘जब बी मेट’ ते ‘हायवे’, प्रेक्षकांच्या नेहमीच लक्षात राहतील इम्तियाज अलीचे ‘हे’ चित्रपट!
इम्तियाज अली

मुंबई : बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक, लेखक इम्तियाज अली (Imtiaz Ali) आज (16 जून) आपला 50वा वाढदिवस साजरा करत आहेत. इम्तियाज यांचा जन्म 16 जून 1971 रोजी जमशेदपूर येथे झाला होता. इम्तियाज अलीची कथा सांगण्याची पद्धत इतकी वेगळी आहे की, प्रत्येकजण त्यात गुंतत जातो. त्याची शैली आणि चित्रपट कधीकधी आपल्या चेहऱ्यावर हास्य आणते तर, कधीकधी आपल्या डोळ्यात अश्रू देखील येतात. आज, इम्तियाजच्या वाढदिवशी, आपण त्याच्या खास चित्रपटांबद्दल जाणून घेऊया…(Happy Birthday Imtiaz Ali know the directors most famous movies)

इम्तियाजने आपल्या करिअरची सुरुवात ‘सोचा ना था’पासून केली होती. या चित्रपटात अभिनेत्री आयशा टाकिया आणि अभिनेता अभय देओल मुख्य भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जास्त जादू दाखवू शकला नाही. परंतु, ही प्रेमकथा खूपच सुंदर दाखवण्यात आली होती.

जब वी मेट

करीना कपूर आणि शाहिद कपूरचा हा चित्रपट प्रत्येक वयाच्या व्यक्तीला आवडतोच. चित्रपटाचे दमदार कथानक आणि संगीताने प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटाच्या कथेसह यातील गाण्यांत प्रेम आणि शांतता देखील होती, ज्याने प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू देखील आले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली होती.

कॉकटेल

‘कॉकटेल’ हा इम्तियाज अलीच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. प्रत्येकजण कुठेतरी या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाशी स्वतःला जोडून पाहतो. चित्रपटात प्रेमाचा त्रिकोण दर्शवला होता. कॉकटेलमध्ये दीपिका पादुकोण, सैफ अली खान आणि डायना पेंटी मुख्य भूमिकेत दिसले होते.

तमाशा

या चित्रपटामध्ये ‘बॉर्डरलाइन डिसऑर्डर’ या आजाराने ग्रस्त असलेल्या एका व्यक्तीची कहाणी दाखवली गेली होती. त्याची कहाणी तीन पातळ्यांमध्ये लढताना दाखवली आहे. ‘तमाशा’मध्ये रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसले होते.

लव आज कल

इम्तियाज अलीचे वैशिष्ट्य म्हणजे तो प्रत्येक लव्ह स्टोरीमध्ये काहीतरी वेगळं आणतो, ज्यामुळे त्याच्या नेहमीच चाहत्यांना आश्चर्य वाटतं. दीपिका पदुकोण आणि सैफ अली खान ‘लव आज काल’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाची कथा खऱ्या प्रेमाच्या नात्याभोवती फिरणारी होती.

हायवे

‘हायवे’मधील आलिया भट्टचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला होता. या चित्रपटातूनच आलियाने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. हा चित्रपटात एका अशा मुलीची कहाणी आहे, जिला अपहरणानंतर स्वतःचे स्वातंत्र्य समजते.

(Happy Birthday Imtiaz Ali know the directors most famous movies)

हेही वाचा :

Janvhi Kapoor | श्रीदेवीची लेक पुन्हा एकदा दिसली ‘मिस्ट्री बॉय’सोबत, जान्हवीच्या बिकिनी फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष!

…तर ‘त्या’ हिंदी निर्मात्यांवर कारवाई करण्याची धमक दाखवा, अमेय खोपकरांचं सरकारला चॅलेंज

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI