Happy Birthday Kareena Kapoor | करिनाला ‘मॅम’ म्हणून हाक मारायचा सैफ अली खान, ‘अशी’ झाली लव्हस्टोरीची सुरुवात!

बॉलिवूडची बेबो अर्थात अभिनेत्री करीना कपूर-खान (Kareena Kapoor-Khan) पुन्हा एकदा पती सैफ अली खान आणि मुलांसोबत सुट्टीवर गेली आहे. करीना कपूर आज अर्थात 21 सप्टेंबर रोजी आपला 41वा वाढदिवस साजरा करण्यासाठी मालदीवमध्ये पोहोचली आहे.

Happy Birthday Kareena Kapoor | करिनाला ‘मॅम’ म्हणून हाक मारायचा सैफ अली खान, ‘अशी’ झाली लव्हस्टोरीची सुरुवात!
Saif Ali Khan And Kareena Kapoor

मुंबई : बॉलिवूडची बेबो अर्थात अभिनेत्री करीना कपूर-खान (Kareena Kapoor-Khan) पुन्हा एकदा पती सैफ अली खान आणि मुलांसोबत सुट्टीवर गेली आहे. करीना कपूर आज अर्थात 21 सप्टेंबर रोजी आपला 41वा वाढदिवस साजरा करण्यासाठी मालदीवमध्ये पोहोचली आहे. याआधी देखील करीना सैफ अली खानचा वाढदिवस कुटुंबासोबत साजरा करण्यासाठी मालदीवमध्ये पोहोचली होती. मालदीवला जाण्याची आवड पाहून असे वाटते की, करीनाला समुद्र खूप आवडतो. करीना तिच्या मालदीव सहलीची बरीच छायाचित्रे चाहत्यांसोबत शेअर करत आहे. करीनाच्या वाढदिवसाच्या खास प्रसंगी आम्ही तुम्हाला बेबो आणि सैफच्या प्रेमकथेविषयी सांगणार आहोत.

अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान यांनी ‘एजंट विनोद’, ‘टशन’ आणि ‘ओंकारा’ सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. दोघांची प्रेमकथा सुरू होण्यापूर्वी या लोकांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. एका मुलाखतीदरम्यान करीनाने खुलासा केला होता की, जेव्हा आम्ही दोघे ‘ओंकारा’ चित्रपटाच्या सेटवर पहिल्यांदा भेटलो होतो, तेव्हा आमच्यात कोणतेही संभाषण झाले नव्हते आणि आम्ही दोघे त्यावेळी दुसऱ्या कोणाशी तरी रिलेशनशिपमध्ये होतो.

बहिणीच्या चित्रपटाच्या सेटवर झाली भेट…

करीनाने आपल्या मुलाखतीत सांगितले होते की, ती सैफला लहानपणापासूनच ओळखत होती. बहीण करिश्मा कपूरच्या ‘हम साथ साथ हैं’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ती सैफला पहिल्यांदा भेटली होती.

करीनाने सांगितले की, ‘ओंकारा’च्या शूटिंग दरम्यान मी सैफला ‘गुड मॉर्निंग’ म्हणत असे. यावर उत्तर देताना तो ‘गुड मॉर्निंग मॅम’ म्हणत असे. करीनाने सांगितले की, तेव्हा सैफ तिला खूप आदर देत होता. सुरुवातीला करीनाला वाटले की, कदाचित सैफ अली खान थोडा खोडकर आहे, म्हणून तो मुद्दाम हे करत आहे, पण नंतर तिला समजले की, सैफचे व्यक्तिमत्वच असे आहे. करीनाने या मुलाखतीत सांगितले होते की, तिने या नात्यातील पहिले पाऊल तिच्या बाजूने उचलले होते.

‘टशन’ चित्रपटात जुळले सूत

सैफ आणि करीना ‘टशन’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एकमेकांच्या जवळ आले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल केली नाही, पण ‘सैफिना’च्या प्रेमाची जाणीव सर्वांना झाली होती. जर, रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला, तर करीनाने स्वतःहून 10 वर्षांनी मोठ्या असलेल्या सैफशी लग्न करण्यासाठी घरातून पळून जाण्याचा प्लॅन बनवला होता. करीना एका मुलाखतीत म्हणाली होती, ‘आम्ही आमच्या प्रायव्हसीबद्दल खूप चिंतित झालो आणि आमच्या कुटुंबाला धमकीही दिली, जर आमचे लग्न मीडिया सर्कस बनले तर आम्ही घरातून पळून जाऊ.’

सैफ-करीनाच्या लग्नाला जेव्हा लव्ह-जिहाद म्हटलं गेलं!

काही धार्मिक संघटनांनी सैफ-करीनाच्या लग्नाला ‘लव्ह जिहाद’ म्हटले होते. यावर करीना म्हणाली होती की, ‘माझा लव्ह जिहादवर नाही तर प्रेमावर विश्वास आहे, मला वाटते की प्रेम ही एक अशी गोष्ट आहे, ज्याचे तुम्ही शब्दांत वर्णन करू शकत नाही. त्यात उत्कटता, भावना आणि इतर अनेक गोष्टी आहेत, पण प्रेमात कोणतीही भिंत नाही. प्रेम कोणालाही विचारून होत नाही.’

हेही वाचा :

Defamation Case : कंगना रनौतने शिवसेनेवर साधला निशाणा, म्हटले- जावेद अख्तर यांनी पक्षाच्या दबावाखाली गुन्हा दाखल केला!

Mahesh Bhatt Net Worth : बॉलिवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक-निर्माते महेश भट्ट, एकूण किती संपत्तीचे मालक?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI