Happy Birthday Mallika Sherawat | कुटुंबाचा विरोध पत्कारून मनोरंजन विश्वात पदार्पण, बोल्डनेसमुळे नेहमीच चर्चेत राहिलीय मल्लिका शेरावत!

बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतचा (Mallika Sherawat) जन्म 24 ऑक्टोबर 1976 रोजी झाला. मल्लिकाचे खरे नाव रीमा लांबा आहे. चित्रपटांमध्ये झळकल्यानंतर तिने आपले नाव बदलून मल्लिका केले. यावर्षी मल्लिका तिचा 45वा वाढदिवस साजरा करत आहे.

Happy Birthday Mallika Sherawat | कुटुंबाचा विरोध पत्कारून मनोरंजन विश्वात पदार्पण, बोल्डनेसमुळे नेहमीच चर्चेत राहिलीय मल्लिका शेरावत!
Mallika Sherawat

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतचा (Mallika Sherawat) जन्म 24 ऑक्टोबर 1976 रोजी झाला. मल्लिकाचे खरे नाव रीमा लांबा आहे. चित्रपटांमध्ये झळकल्यानंतर तिने आपले नाव बदलून मल्लिका केले. यावर्षी मल्लिका तिचा 45वा वाढदिवस साजरा करत आहे. मल्लिका नेहमीच तिची जीवनशैली, चित्रपटांमधील बोल्ड सीन आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. मल्लिका केवळ बॉलिवूडच नाही, तर आंतरराष्ट्रीय स्टार देखील आहे. मल्लिकाने जॅकी चॅनसोबतही काम केले आहे. मल्लिकाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला तिच्याशी संबंधित काही खास गोष्टी सांगणार आहोत…

मल्लिकाने 2002 मध्ये ‘जीना सिरफ मेरे लिया’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तिने 2003 मध्ये आलेल्या ‘ख्वाहिश’ या चित्रपटातून मुख्य अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात मल्लिकाने बोल्ड सीन्स देऊन खळबळ उडवली होती. मल्लिकाने या चित्रपटात 17 किसिंग सीन दिले होते. मल्लिका आता बॉलिवूडमध्येच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्टार बनली आहे. मल्लिकाने हिंदीशिवाय इंग्रजी आणि चायनीज चित्रपटांमध्येही काम केले आहे.

एअर होस्टेस म्हणून काम करायची!

चित्रपटात येण्यापूर्वी मल्लिका एअर होस्टेस म्हणून काम करायची. मल्लिकाने आपल्या करिअरची सुरुवात ‘ख्वाहिश’ चित्रपटाने केली असेल, पण तिला ‘मर्डर’ चित्रपटातून खरी ओळख मिळाली. या चित्रपटात मल्लिकासोबत इमरान हाश्मी मुख्य अभिनेता होता. लव्ह स्टोरी व्यतिरिक्त मल्लिकाने विनोदी चित्रपटांमध्येही काम केले. ‘प्यार के साइड इफेक्ट्स’ आणि ‘डबल धमाल’ हे तिचे हिट कॉमेडी चित्रपट केले होते.

हॉलिवूडबद्दल बोलायचे झाले तर, मल्लिकाने ‘हिस्स’ आणि ‘पॉलिटिक्स ऑफ लव्ह’मध्ये काम केले होते. हिसारमधील एका छोट्या गावात जन्मलेल्या मल्लिकाने आधी बॉलिवूड आणि नंतर हॉलिवूडचा प्रवास केला. मल्लिकाचे कुटुंब तिच्या चित्रपटांमध्ये काम करण्याच्या विरोधात होते. पण तिने कोणाचेही ऐकले नाही आणि ती बॉलिवूडमध्ये आली.

मोठ्या स्वप्नांसमोर नाही टिकलं लग्न!

चित्रपटांमध्ये दिसण्यापूर्वीच मल्लिकाच्या आयुष्यात असे काही घडले, ज्यावर तिला आयुष्यात कधीही उल्लेख करायचा नाहीय. शिक्षण पूर्ण केल्यानंतर मल्लिकाने एअर होस्टेस म्हणून काम करण्यास सुरुवात केली. येथेच तिची पायलट करण सिंग गिल याच्याशी भेट झाली. कामादरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि नंतर लग्न केले. पण मल्लिकाच्या मोठ्या स्वप्नांसमोर हे लग्न फारकाळ टिकू शकले नाही. करण आणि मल्लिकाचे लग्न एक वर्ष टिकले. यानंतर मल्लिकाने करणपासून घटस्फोट घेतला. काही रिपोर्ट्सनुसार, मल्लिकाला एक मुलगा देखील आहे, पण मल्लिकाने तिच्या लग्नाबद्दल आणि मुलाबद्दल कधीच काहीही खुलासा केलेला नाही.

हेही वाचा :

पोट सुटलेला सैफ अली खान, तर रंगीबेरंगी अवतारातील राणी मुखर्जी, ‘बंटी और बबली 2’ची पहिली झलक पाहिलीत?

OMG 2 | ‘कर्ता करे न कर सके शिव करे सो होय ..’, अक्षय कुमारचा ‘महादेव’ लूक पाहिलात का?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI