पोट सुटलेला सैफ अली खान, तर रंगीबेरंगी अवतारातील राणी मुखर्जी, ‘बंटी और बबली 2’ची पहिली झलक पाहिलीत?

'बंटी और बबली 2' चा टीझर रिलीज करण्यात आला आहे. आता या चित्रपटातून अभिनेत्री राणी मुखर्जी आणि अभिनेता सैफ अली खान यांचा फर्स्ट लूक शेअर करण्यात आला आहे. या चित्रपटाची प्रेक्षक बऱ्याच काळापासून वाट पाहत होते.

पोट सुटलेला सैफ अली खान, तर रंगीबेरंगी अवतारातील राणी मुखर्जी, ‘बंटी और बबली 2’ची पहिली झलक पाहिलीत?
Bunty Aur Babli 2

मुंबई : ‘बंटी और बबली 2’ चा टीझर रिलीज करण्यात आला आहे. आता या चित्रपटातून अभिनेत्री राणी मुखर्जी आणि अभिनेता सैफ अली खान यांचा फर्स्ट लूक शेअर करण्यात आला आहे. या चित्रपटाची प्रेक्षक बऱ्याच काळापासून वाट पाहत होते. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी सैफ आणि राणीचा हा फर्स्ट लूक पोस्ट केला आहे. ही पोस्ट शेअर करत त्यांनी लिहिले, ‘बंटी और बबली फर्स्ट लुक’.

या चित्रपटात राणी मुखर्जी ही ​​‘विम्मी’ आणि सैफ अली खान हा ​‘​राकेश’ हे पात्र साकारताना दिसणार आहे. यातील एका फोटोमध्ये रंगीबेरंगी ड्रेस परिधान करून राणी मुखर्जी फॅशन क्वीन बनली आहे. त्याचवेळी दुसऱ्या फोटोमध्ये सैफ अली खान हातात गॅस सिलिंडर घेऊन उभा आहे आणि राणी त्याचे सुटलेले पोट आणि वजन मोजत आहे. अलीकडेच, राणी मुखर्जीने सांगितले होते की. तिचे पात्र ‘विम्मी’ उर्फ ‘​​बबली’ लोकांना फसवण्याचा मार्ग सोडून फुरस्तागंजमध्ये फॅशन डिझायनर म्हणून काम करताना दिसणार आहे.

पाहा पोस्ट :

तब्बल 12 वर्षांनी एकत्र झळकणार राणी-सैफ जोडी

टीझर राणी मुखर्जी आणि सैफ अली खान यांच्यापासून सुरू होतो. दोघेही त्यांच्या लूकला टचअप देत आहेत. राणी म्हणते सैफू आपण इतक्या वर्षांनी एकत्र काम करत आहोत. सैफ म्हणतो की, आपण 12 वर्षानंतर एकत्र आलो आहेत. मग, राणी म्हणते की, सैफ सोबत काम करणं तिने देखील खूप मिस केलं आहे.

सैफने राणीच्या लूकचे कौतुक केले आहे. मग सैफ-राणी शूट सुरू करायला निघाल्याबरोबर, सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी फ्रेममधून बोलण्यासाठी मागून येतात, तेही शूटसाठी सज्ज झालेले असतात. सिद्धांत आणि शर्वरी सांगतात की, ते सुद्धा बंटी-बबली आहेत. राणी सांगते की, इथे फक्त एक बंटी आणि बबली जोडी आहे. मग दिग्दर्शक सांगतो की, आदित्य चोप्राने स्क्रिप्ट बदलली आहे. आता चित्रपटात दोन बंटी बबली आहेत. यानंतर, रागाने सैफ-राणी त्यांच्या स्वतःच्या मेकअप रूममध्ये जातात आणि पॅकअप करतात.

कोरोनामुळे पुढे ढकलले प्रदर्शन

टीझर खूप मजेदार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन वरुण व्ही शर्मा यांनी केले आहे. या चित्रपटाचे निर्माता आदित्य चोप्रा आहेत. हा चित्रपट 19  नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे चित्रपटाचे रिलीज पुढे ढकलण्यात आले आहे.

सैफ-राणीची सुपरहिट जोडी

अभिनेत सैफ अली खान आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी चाहते देखील उत्साहित आहेत. यापूर्वी या दोघांनी ‘हम तुम’, ‘तारा रम पम’, ‘थोडा प्यार थोडा प्यार थोडा जादू’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. 2005 साली आलेला ‘बंटी और बबली’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. यामध्ये अभिषेक बच्चनने राणी मुखर्जीसोबत काम केले होते. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. चित्रपटातील ऐश्वर्या राय बच्चनचे आयटम साँग ‘कजरारे’ सुपर डुपर हिट ठरले होते. या चित्रपटात राणी आणि अभिषेक धूर्त चोर झाले होते आणि अमिताभ बच्चन पोलिस झाले होते. चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन शानदार होते.

हेही वाचा :

OMG 2 | ‘कर्ता करे न कर सके शिव करे सो होय ..’, अक्षय कुमारचा ‘महादेव’ लूक पाहिलात का?

Aryan Khan Drugs Case | आर्यन खानच्या अडचणीत आणखी वाढ होणार? ड्रग्ज प्रकरणी बँक खात्यांचा तपास केला जाणार!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI