Happy Birthday Parineeti Chopra | इन्वेस्टमेंट मॅनेजर म्हणून काम करायची परिणीती चोप्रा, मंदीमुळे नोकरी गेली अन् सुरु झाला चित्रपट प्रवास!

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आज (22 ऑक्टोबर) आपला 33वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म 22 ऑक्टोबर 1988 रोजी हरियाणाच्या अंबाला येथे झाला. सध्याच्या काळात चित्रपट जगतात एक सुप्रसिद्ध नाव बनलेल्या परिणीतीने लहानपणापासूनच चित्रपट जगतात जाण्याचा विचार केला नव्हता.

Happy Birthday Parineeti Chopra | इन्वेस्टमेंट मॅनेजर म्हणून काम करायची परिणीती चोप्रा, मंदीमुळे नोकरी गेली अन् सुरु झाला चित्रपट प्रवास!
Parineeti Chopra
Follow us
| Updated on: Oct 22, 2021 | 8:29 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आज (22 ऑक्टोबर) आपला 33वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म 22 ऑक्टोबर 1988 रोजी हरियाणाच्या अंबाला येथे झाला. सध्याच्या काळात चित्रपट जगतात एक सुप्रसिद्ध नाव बनलेल्या परिणीतीने लहानपणापासूनच चित्रपट जगतात जाण्याचा विचार केला नव्हता. कारण खरं तर ती एक अतिशय हुशार विद्यार्थिनी होती आणि आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करून, करिअर घडवण्याच्या दिशेने ती काम करत होती. पण कदाचित नशिबाच्या मनात काहीतरी वेगळेच होते, नोकरी मिळाल्यानंतर आणि नंतर ती गमावल्यानंतर परीने चित्रपट जगतात प्रवेश केला.

अभ्यासाकडे पूर्ण लक्ष देऊन हुशार परिणीती चोप्रा 12 वीमध्ये वर्गात आणि देशात अव्वल आली आणि राष्ट्रपतींच्या हस्ते तिचा सन्मान देखील झाला. यानंतर तिने अर्थशास्त्र, व्यवसाय आणि वित्त विषयात पदवी मिळवली. तिचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती नोकारीनिमित्ताने परदेशी गेली. 2009 मध्ये जेव्हा मंदी आली तेव्हा परी गुंतवणूक व्यवस्थापक म्हणून काम करत होती आणि या मंदीमुळे तिला आपली नोकरी गमवावी लागली.

भारतात 2 हजार रुपये महिना इंटर्नशिप केली!

नोकरी गेल्यानंतर परिणीती भारतात परतली आणि इथे अनेक पदव्या असूनही तिला नोकरी मिळू शकली नाही. ती एकदा बहीण प्रियांका चोप्रासोबत एका स्टुडिओमध्ये गेली होती आणि इथे महिन्याला 2,000 रुपये या बोलीवर तिने इंटर्नशिप सुरु केली. आर्थिक स्थिती चांगली नव्हती, म्हणून परिणीतीने काम करण्याचा निर्णय घेतला, नंतर हळूहळू चित्रपटांकडे कल वाढल्यानंतर तिने ‘लेडीज व्हर्सेस रिकी बहल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

चित्रपट प्रवास

परिणीतीचा रणवीर सिंहसोबतचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला नाही. पण तिने पुढे बराच काळ आपली पुढची वाटचाल करण्याची तयारी केली होती. अर्जुन कपूरचा दुसरा चित्रपट ‘इश्कजादे’ यशस्वी झाला आणि त्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिले नाही.

गाण्याचीही आवड

अभ्यासात अव्वल असण्याव्यतिरिक्त आणि अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये स्वत: ला प्रस्थापित करण्याव्यतिरिक्त परिणीती चोप्राला गाण्याचीही आवड आहे. तिने बॉलिवूडमध्ये दोन गाणी देखील गायली आहेत, त्यातील एक ‘केसरी’ चित्रपटातील ‘तेरी मिट्टी’ या ट्रॅकची महिला आवृत्ती होती, तर दुसरे ‘मान की हम यार नहीं’ हे गाणे होते.

परिणीतीच्या कारकिर्दीत अनेक चढ-उतार आले. तिने ‘मेरी प्यारी बिंदू’, ‘गोलमाल अगेन’, ‘नमस्ते लंडन’, ‘केसरी’, ‘जबरिया जोडी’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय काही चित्रपटांचे काम आता सुरु आहे. नुकतेच तिचे ‘संदीप और पिंकी फरार’, ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ आणि ‘सायना’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.

हेही वाचा :

Sara-Janhvi : ‘द बिग पिक्चर’च्या सेटवर सारा आणि जान्हवीची धमाल, सोशल मीडियावर फोटो शेअर करत सारा म्हणाली…

Ananya Panday | प्रसिद्ध अभिनेत्याची लेक अनन्या पांडे, अभिनयामुळे कौतुक तर कधी वक्तव्यांमुळे झालीये ट्रोल!

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.