Happy Birthday Uday Chopra | ‘मोहब्बतें’मधून दमदार पदार्पण, पण केवळ वडिलांच्याच चित्रपटात अभिनयाची जादू दाखवू शकला उदय चोप्रा!

Happy Birthday Uday Chopra | ‘मोहब्बतें’मधून दमदार पदार्पण, पण केवळ वडिलांच्याच चित्रपटात अभिनयाची जादू दाखवू शकला उदय चोप्रा!
Uday Chopra

अभिनेता उदय चोप्राची (Uday Chopra) मनोरंजन विश्वातील सुरुवात चांगली झाली होती. हा अभिनेता हिंदी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवेल असे प्रेक्षकांना वाटत होते, पण उदय चोप्रा आपले वडील, निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांच्याच चित्रपटांतच आपली क्षमता दाखवू शकला.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Jan 05, 2022 | 8:00 AM

मुंबई : अभिनेता उदय चोप्राची (Uday Chopra) मनोरंजन विश्वातील सुरुवात चांगली झाली होती. हा अभिनेता हिंदी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवेल असे प्रेक्षकांना वाटत होते, पण उदय चोप्रा आपले वडील, निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांच्याच चित्रपटांतच आपली क्षमता दाखवू शकला. यश चोप्रांशिवाय त्याने काही चित्रपटांमध्ये काम केले, पण तो यशस्वी होऊ शकला नाही.

उदय चोप्रा हा इंडस्ट्रीचा असाच एक स्टार आहे, जो काही काळ चमकला आणि नंतर गायब झाला. उदय आता चित्रपट जगतापासून दूर विस्मृतीचे जीवन जगत आहे. काही काळापूर्वीही तो मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झाला होता, ज्यामध्ये त्याला ओळखणे देखील कठीण होत होते. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया कसा होता त्याचा चित्रपट प्रवास…

‘यशराज’मधून करिअरची सुरुवात

उदय चोप्रा याचा जन्म 5 जानेवारी 1973 रोजी झाला. तो प्रसिद्ध दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते दिवंगत यश चोप्रा यांचा मुलगा आणि दिग्दर्शक-निर्माता आदित्य चोप्रा यांचा भाऊ आहे. यशराज बॅनरखाली बनत असलेल्या वडील आणि भावाच्या अनेक चित्रपटांमध्ये त्याने सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका निभावली होती. उदय चोप्राने मुंबईतूनच शिक्षण पूर्ण केले. घरातील फिल्मी वातावरणामुळे उदयचे मन अभिनयाकडेच वळले होते. निर्माता-दिग्दर्शक यश चोप्रा यांनीच त्याला हिंदी चित्रपटसृष्टीत लॉन्च केले.

‘मोहब्बतें’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण

उदय चोप्राने 2000 साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘मोहब्बतें’ या चित्रपटातून त्याने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. हा मल्टीस्टारर चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटातून उदय चोप्राला बॉलिवूडमध्ये जबरदस्त ओळख मिळाली. ‘मोहब्बतें’ चित्रपटातील त्याची रोमँटिक हिरोची भूमिका आजही प्रेक्षकांना आवडते.

‘धूम’ या हिट चित्रपटाच्या तिन्ही सीरीजमध्ये दिसलेला उदय चोप्रा या चित्रपटात इतर स्टार्सपेक्षा वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाला होता. याशिवाय त्याने आणखी काही चित्रपटातही काम केले पण ते तितके चालले नाही. त्यानंतर उदय चोप्राने ‘नील अँड निक्की’, ‘मेरे यार की शादी है’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. पण उदय चोप्राला या दोन्ही चित्रपटांचा फारसा फायदा झाला नाही.

अचानक बॉलिवूडपासून दूरावला

मोहब्बतें आणि धूम हे सिनेमे सुपरहिट असून, अभिनेता उदय चोप्रा अचानक चित्रपटांपासून दूर गेला. उदय जवळपास 7 वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून गायब आहे. 2013 मध्ये धूम या चित्रपटात शेवटचा दिसला होता. या चित्रपटात उदय चोप्राने त्याची बॉडी आणि अॅब्स डकवले होते. पण यापूर्वी त्याचे काही फोटो समोर आले आहेत, जे पाहून तुमचा विश्वास बसणार नाही की हा धूम स्टार उदय चोप्रा आहे. मात्र, आता प्रेक्षकही त्याला ओळखू शकणार नाहीत. आता त्याचे वजनही खूप वाढले आहे. त्याची दाढी आणि केसही पांढरे दिसत आहेत.

नर्गिस फाखरीसोबतच्या नात्यामुळे चर्चेत!

बरेच दिवस बॉलिवूडपासून दूर असलेला उदय चोप्रा गेल्या वेळी रॉकस्टार फेम अभिनेत्री नर्गिस फाखरीसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आला होता. दोन्ही कलाकार हँग आउट करतानाही दिसले. उदय आणि नर्गिस दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये होते. काही काळापूर्वी दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा होती. मात्र, ती केवळ चर्चाच ठरली. काही काळाने दोघांचे ब्रेकअप झाले.

हेही वाचा :

स्वप्नील जोशीने नवीन वर्षातील नवीन चित्रपटाची केली घोषणा, ‘अश्वत्थ’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला!

जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रियादेखील कोरोना पॉझिटिव्ह, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती!

Khatija | वाढदिवशीच खातिजा अडकली खास नात्यात!, पाहा कोण आहे ए आर रहमानचा होणारा जावई Riyasdeen?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें