Holi 2021 | बिग बी ते अनन्या पांडे, बॉलिवूडकरांनी चाहत्यांना खास शैलीत दिल्या होळीच्या शुभेच्छा!

बॉलिवूडमध्येही दरवर्षी होळीचा उत्सव मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो. राज कपूरपासून शबाना आझमीपर्यंत… सर्व सेलिब्रिटींच्या घरी होळीची खास पार्टी आयोजित केली जाते. कोरोनामुळे या उत्साहावर काहीशी मर्यादा आली आहे.

Holi 2021 | बिग बी ते अनन्या पांडे, बॉलिवूडकरांनी चाहत्यांना खास शैलीत दिल्या होळीच्या शुभेच्छा!
बिग बी आणि अनन्या पांडे

मुंबई : होळी (Holi 2021) हा आनंदाचा सण आहे. या उत्सवात हेवेदावे विसरून प्रत्येकजण होळीच्या रंगांत मिसळून जातो. आज म्हणजेच 29 मार्च रोजी होळीचा उत्सव देशभर साजरा केला जात आहे. लोक भरपूर रंगांनी हा सण साजरा करत आहेत. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे यावर्षीही होळीचे रंग काहीसे फिकट झाले आहेत. पण, तरीही सेलेब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकाला या खास दिवसाच्या शुभेच्छा देत आहेत (Holi 2021 bollywood celebrities wishes happy holi to fans).

बॉलिवूडमध्येही दरवर्षी होळीचा उत्सव मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो. राज कपूरपासून शबाना आझमीपर्यंत… सर्व सेलिब्रिटींच्या घरी होळीची खास पार्टी आयोजित केली जाते. कोरोनामुळे या उत्साहावर काहीशी मर्यादा आली आहे. अशा परिस्थितीत आता यावर्षी सर्व सेलेब्रिटीज त्यांच्या खास स्टाईलमध्ये चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा देत आहेत.

कंगना रनौत

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

कंगना रनौतने ‘तेजस’ चित्रपटाच्या टीमबरोबर फोटो शेअर करत होळीची शुभेच्छा दिल्या आहेत. कंगनाने  लिहिले की, ‘होली के दिन दिल खिल जाते हैं, रंगों में रंग मिल जाते हैं ….’ या वेळी कंगना जैसलमेरमध्ये शुटिंग करत आहे.

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, ‘हॅपी फेस्टिव्हल डे टू ऑल: लैलाट अल बारा अह… आपल्या मुस्लिम मित्रांची क्षमा करण्याची रात्री, आपल्या ख्रिश्चन मित्रांसाठी पाम रविवार, ज्यू मित्रांसाठी पासओव्हर आणि हिंदू मित्रांसाठी होळी. काय योगायोग आहे. पुढची शंभर वर्षे हे सण असेच एकत्र साजरे करू.’

अनन्या पांडे

(Holi 2021 bollywood celebrities wishes happy holi to fans)

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हिने देखील होळीच्या खास शुभेच्छा देणारे एक कॅप्शन शेअर केले आहे.

प्रीती झिंटा

अभिनेत्री प्रीती झिंटा हिने पतीसोबत होळी खेळतानाचा फोटो शेअर करत होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

(Holi 2021 bollywood celebrities wishes happy holi to fans)

ह्रितिक रोशन

हृतिक रोशनने आपली शुभेच्छा देणारी एक छोटी क्लिप शेअर केली आहे.

रवीना टंडन

रवीना टंडन हिने लिहिले की, ‘होळी प्रेमाच्या रंगांना मूर्त रुप देते. उच्च, निम्न, दुर्बल प्रत्येकाला मिठी मारते. होळी मित्र बनून शत्रूला रंग देते, होळी प्रेमाचा धडा शिकवते – प्री-अब्दुल रहमान अन्सारी. तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा.’

(Holi 2021 bollywood celebrities wishes happy holi to fans)

हेही वाचा :

Holi 2021 | ‘देसी गर्ल’ने परदेशात साजरी केली धमाल होळी, पती निकसह सासू-सासऱ्यांना लावला रंग!

Video | जेव्हा सुशांतने होळीच्या दिवशी जॅकलीन-अंकितासोबत लगावले होते ठुमके, चाहत्यांनी शेअर केल्या आठवणी!

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI