AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Holi 2021 | ‘देसी गर्ल’ने परदेशात साजरी केली धमाल होळी, पती निकसह सासू-सासऱ्यांना लावला रंग!

प्रियंका चोप्रा (प्रियंका चोप्रा) लग्नानंतर पती निकसह परदेशात स्थायिक झाली आहे. देशापासून दूर असूनही, अभिनेत्री प्रियंका चोप्रा सण साजरा करण्यास विसरलेली नाही. नुकतीच प्रियंका चोप्राने परदेशातील घरी होळी साजरी केली आहे.

Holi 2021 | ‘देसी गर्ल’ने परदेशात साजरी केली धमाल होळी, पती निकसह सासू-सासऱ्यांना लावला रंग!
प्रियंका चोप्रा होळी सेलिब्रेशन
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Mar 29, 2021 | 10:59 AM
Share

मुंबई : आज अर्थात 29 मार्च रोजी देशभरात होळीचा सण धूम धडाक्यात साजरा केला जात आहे. प्रत्येकजण आपापल्या शैलीत हा रंगांचा हा सण साजरा करत असतो. हा धमाल मजेचा उत्सव देशाच्या प्रत्येक भागात साजरा केला जातो. भारतातच नव्हे तर परदेशातही लोक होळीच्या रंगात रंगताना दिसतो. होळीच्या रंगाच्या सणांत ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) कशी बरं मागे राहील? पिगी चॉप्सने परदेशात तिच्या सासरच्या घरी होळी साजरी केली आहे (Bollywood Actress Priyanka Chopra celebrates holi 2021 with nick Jonas family).

प्रियंका चोप्रा (प्रियंका चोप्रा) लग्नानंतर पती निकसह परदेशात स्थायिक झाली आहे. देशापासून दूर असूनही, अभिनेत्री प्रियंका चोप्रा सण साजरा करण्यास विसरलेली नाही. नुकतीच प्रियंका चोप्राने परदेशातील घरी होळी साजरी केली आहे.

पाहा प्रियंका चोप्राच्या होळी सेलिब्रेशनचे फोटो :

प्रियंका चोप्राने होळीच्या शुभेच्छा देणारा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती सासरच्या लोकांसोबत होळी खेळताना दिसली आहे. फोटोमध्ये चारही लोक रंगात रंगलेले दिसत आहेत. यासह अभिनेत्रीच्या हातात अ‍ॅटॉमायझरसुद्धा दिसतो. या फोटोसह प्रियंकाने आणखी काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात लोक बऱ्याच रंगात रंगलेले पाहायला मिळाले आहेत (Bollywood Actress Priyanka Chopra celebrates holi 2021 with nick Jonas family).

प्रियंका चोप्राने एक फोटो शेअर केला आणि लिहिले की, ‘रंगांचा उत्सव होळी हा माझा आवडता सण आहे, अशी आशा आहे की आपण सर्वजण आपल्या प्रियजनांसोबत हा सण साजरा करू शकू, परंतु आपल्या घरात! # सर्वांना हॅप्पीहोळी….’ प्रियंका चोप्राची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. चाहत्यांना लाडक्या ‘देसी गर्ल’ची ही शैली खूप आवडली आहे.

प्रियंकाकडे नेटकऱ्यांची तक्रार

अलीकडेच प्रियंका चोप्राने ट्विटरवर आपल्या चाहत्यांशी बोलून, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. सोशल मीडियावरील एका वापरकर्त्याने प्रियांकाला विचारलं की, मला तुमच्या लग्नाला आमंत्रित का नाही केले? त्यावेळी मी जोधपूरमध्ये होतो. त्याला उत्तर देताना गमतीत प्रियंका चोप्रा म्हणाली की, ‘मला माहित नव्हतं.’

प्रियांका चोप्राने डिसेंबर 2018 मध्ये जोधपूरमध्ये भव्य दिव्य सोहळ्यात लग्न केले होते. प्रियंकाच्या लग्नाचे फोटो प्रचंड चर्चेत होते. प्रियांकाने अमेरिकन पॉप गायक निक जोनासशी लग्न केले आहे. देसी गर्लने लग्नानंतर ‘द स्काय इज पिंक’मध्ये काम केले. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता फरहान अख्तर देखील दिसला होता. यानंतर प्रियंका नुकतीच अभिनेत्री ‘व्हाईट टायगर’ या चित्रपटामध्ये दिसली आहे.

(Bollywood Actress Priyanka Chopra celebrates holi 2021 with nick Jonas family)

हेही वाचा :

Video | जेव्हा सुशांतने होळीच्या दिवशी जॅकलीन-अंकितासोबत लगावले होते ठुमके, चाहत्यांनी शेअर केल्या आठवणी!

Zee Marathi Awards | स्वीटू-शकू-आसावरीला पुरस्कार, ‘देवमाणूस’ बेस्ट खलनायक, झी मराठी अवॉर्ड विजेत्यांची यादी

Follow Us
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...युद्धाचा मोठा फटका!
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं
कौटुंबिक छळाचा आणखी एक बळी! सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय महिलेने
कौटुंबिक छळाचा आणखी एक बळी! सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय महिलेने उचलले टोकाचे पाऊल
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... संजय
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... बापरे! संजय राऊत हे काय बोलून गेले? थेट सोने तस्करीशी कनेक्शन!
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण अन् तरुणी
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण आणि त्याची मैत्रीण... नेमकं काय घडलं?