इस्रायल-पॅलेस्टाईन मुद्द्यावर भिडले कंगना रनौत आणि इरफान पठाण, एकमेकांवर कुरघोडी करत म्हणाले…

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिचे ट्विटर अकाऊंट नुकतेच निलंबित करण्यात आले होते, असे असूनही ती सोशल मीडियावर सक्रिय राहिली आहे. आता आपले विचार शेअर करण्यासाठी कंगनाने इन्स्टाग्रामचा आधार घेतला आहे.

इस्रायल-पॅलेस्टाईन मुद्द्यावर भिडले कंगना रनौत आणि इरफान पठाण, एकमेकांवर कुरघोडी करत म्हणाले...
कंगना रनौत, इरफान पठाण

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिचे ट्विटर अकाऊंट नुकतेच निलंबित करण्यात आले होते, असे असूनही ती सोशल मीडियावर सक्रिय राहिली आहे. आता आपले विचार शेअर करण्यासाठी कंगनाने इन्स्टाग्रामचा आधार घेतला आहे. इस्त्राईल-पॅलेस्टाईनच्या संघर्षामध्ये (Israel Palestine issue) कंगनाने सोशल मीडियावर इस्रायलचे समर्थन केले. दरम्यान, भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाण (Irfan Pathan ) याने कंगनाला या विषयावर खडे बोल सुनावले आहेत (Irfan Pathan and Kangana Ranaut clashes over Israel Palestine issue).

मंगळवारी सोशल मीडियाचा आधार घेत, इरफानने पॅलेस्टाईनला आपला पाठिंबा दर्शवला. कागिसो रबाडा यांचे ट्विट त्याने पुन्हा रिट्विट केले, ज्यात त्याने ‘#PrayforPalestine’ लिहिले आहे. दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने तिचा मेसेज इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. तिच्या ट्विटर अकाऊंटवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे आणि यामुळे कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीचा आधार घेत आमदार दिनेश चौधरी यांचे ट्विट शेअर केले आहे.

केराकतचे भाजप आमदार दिनेश चौधरी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते की, ‘इरफान पठाण यांना इतर देशाबद्दल इतके प्रेम आहे, पण त्यांना आपल्याच देशातील बंगालवर ट्विट करता आले नाही.’

इरफानने दिले प्रत्युत्तर

36 वर्षीय माजी अष्टपैलू खेळाडू अर्थात इरफानने कंगनाच्या इंस्टास्टोरीला पुन्हा उत्तर दिले आणि लिहिले, ‘माझी सर्व ट्विट माणुसकीसाठी किंवा देशवासियांसाठी आहेत. यात, सर्वसामान्य माणसाचा दृष्टिकोन आहे, ज्यांनी उच्च स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच वेळी दुसरीकडे मला कंगना, जिचे अकाऊंट द्वेष पसरवल्यामुळे निलंबित केले गेले होते आणि काही लोक जे पैसे घेऊन समाजात द्वेष पसरवतात, त्यांच्याकडून ऐकावे लागते आहे.’

अलीकडेच कंगनाने विवादित ट्विट पोस्ट केले होते. यामुळे कंगनाचे ट्विटर अकाउंट निलंबित करण्यात आले होते. नंतर तिने आपले इंस्टाग्राम अकाऊंट वापरण्यास सुरूवात केली. ती बर्‍याचदा सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि वादग्रस्त पोस्ट शेअर करत असते (Irfan Pathan and Kangana Ranaut clashes over Israel Palestine issue).

नेमका वाद काय आहे?

इस्रायलने 1967 साली मध्यपूर्वेतील युद्धानंतर जेरूसलेम ताब्यात घेतले होते. त्यानंतर इस्रायलयने हा परिसर यहुदी लोकांचा देश म्हणून घोषित केल होता. तेव्हापासून पॅलेस्टिनी नागरिक इस्रायलविरोधात संघर्ष करत आहेत. पॅलेस्टाईन स्वतंत्र होईल तेव्हा जेरुसलेम ही आमची राजधानी असेल, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, आता इस्रायलने जेरुसलेममध्ये राहणाऱ्या पॅलेस्टिनी नागरिकांनाच बाहेर काढायला सुरुवात केली आहे.

इस्रायली पोलीस आणि पॅलेस्टिनी नागरिकांमध्ये संघर्ष

जेरूसलेमच्या अक्सा मशिदीबाहेर सोमवारी निदर्शने करण्यात आली. यावेळी इस्रायली पोलीस आणि पॅलेस्टिनी नागरिकांमध्ये हिंसक संघर्ष झाला. यामध्ये शेकडो लोक जखमी झाले आहेत. त्यानंतर हमास संघटनेने इस्रायलला प्रत्युत्तर देण्याची भाषा सुरु केली.

इस्रायलने जेरूसलेममध्ये राहणाऱ्या पॅलेस्टिनी नागरिकांना घरे खाली करण्यास सांगितले आहे. जेणेकरून याठिकाणी यहुदी नागरिकांना राहता येईल. यावरुन पॅलेस्टिनी नागरिक इस्रायलमध्ये सातत्याने निदर्शने करत आहेत.

(Irfan Pathan and Kangana Ranaut clashes over Israel Palestine issue)

हेही वाचा :

आर्यनला घरातही ‘शर्टलेस’ फिरण्यावर बंदी! शाहरुख खानने सांगितले कारण…

Photo : ‘कांटा लगा’ गर्ल शेफाली जरीवालाचा ग्लॅमरस अंदाज, सोशल मीडियावर फोटो शेअर

Published On - 5:25 pm, Thu, 13 May 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI