लग्न न करताही तू आई बनू शकतेस, जया बच्चन यांचा नातीला सल्ला, वाचा संदर्भ काय?
नेहमीप्रमाणेच जया बच्चन यांनी असे काही भाष्य केले आहे की, ज्यावर आता जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

मुंबई : जया बच्चन त्यांच्या विधानांमुळे कायमच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच जया बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला होता. नेटकरी व्हिडीओ पाहून जया बच्चन यांच्यावर टीका करत होते. पैपराजी जया बच्चन यांचा फोटो काढताना पडता पडता वाचला. हे पाहून चक्क जया बच्चन म्हणाल्या की, तू एकदा नाही तर अजून चार वेळा पडायला पाहिजे…जया बच्चनचे हे बोलणे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला. या व्हिडीओनंतर जया बच्चन यांना टार्गेट केले जात होते.
नेहमीप्रमाणेच जया बच्चन यांनी असे काही भाष्य केले आहे की, ज्यावर आता जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी त्यांची नात नव्या नवेली नंदा हिच्यावर भाष्य केले. जया बच्चन म्हणाल्या की, कोणतेही नाते चालवण्यासाठी शारीरिक आकर्षण आवश्यक असते. नव्याच्या पॉडकास्ट ‘व्हाट द हेल नव्या’ या शोमध्ये बोलताना अनेक विषयांवर जया बच्चन यांनी हात घातला.
View this post on Instagram
जया बच्चन म्हणाल्या की, आमच्या काळात आम्ही काही गोष्टी करून पाहू शकत नव्हतो. फक्त प्रेम आणि समायोजनावर नाते नक्कीच टिकू शकत नाही. नंदाने लग्नाशिवाय जर बाळाला जन्म दिला तर मला काहीच अडचण नाहीये. लोकांना माझे हे बोलणे कदाचित पटणार देखील नाही. परंतू फिजिकल अट्रक्शन खूप महत्वाचे आहे.
आम्ही ज्याकाळात वाढलो, त्यावेळी हे सर्व आम्ही नाही करू शकलो. परंतू आताची पिढी हे सर्व करते आहे आणि त्यांनी हे काय करू नये? मला असे वाटते की, शारीरिक संबंधाशिवाय नाते फार काळ टिकू शकत नाही. यामुळे जर उद्या नव्याने लग्नाच्या अगोदर बाळाला जन्म दिला तर मला काहीच प्राॅब्लेम नसणार, जया बच्चन यांच्या या विधानाने अनेकांनी आर्श्चय व्यक्त केले आहे.
