प्रेम म्हणजे प्रेम असतं, सेलिब्रिटींचं आणि आपलं सेम असतं… के. एल. राहुलची अथिया शेट्टीसाठी इन्स्टा पोस्ट, म्हणाला…

क्रिकटपटू के. एल. राहुलने त्याच्या आयुष्यातील खास व्यक्तीसाठी एक खास फोटो शेअर केला आहे. के. एल. राहुलने अथिया शेट्टी सोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत तिला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रेम म्हणजे प्रेम असतं, सेलिब्रिटींचं आणि आपलं सेम असतं... के. एल. राहुलची अथिया शेट्टीसाठी इन्स्टा पोस्ट, म्हणाला...
आथिया शेट्टी आणि के एल राहुल
Image Credit source: social
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

Feb 15, 2022 | 3:09 PM

मुंबई : व्हॅलेंटाईन डे (Valentine’s day) म्हटलं की प्रेमाला बहर येतो. अनेकजण आपल्या प्रिय व्यक्तीसाठी खास गोष्टी करतात. अनेकांनी आपल्या सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपल्या प्रिय व्यक्तीला शुभेच्छा दिल्या. यात सेलिब्रिटीही मागे नाहीत. क्रिकटपटू के. एल. राहुल (K. L. Rahul) यानेही त्याच्या आयुष्यातील खास व्यक्तीसाठी एक खास फोटो शेअर केला आहे. अभिनेता सुनिल शेट्टीची (Suniel Shetty) लेक अथिया शेट्टीसाठी (Athiya Shetty) त्याने इन्स्टाग्रामवर (Instagram) पोस्ट केली आहे. के. एल. राहुलने अथिया शेट्टी सोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत तिला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोला त्याने “हॅपी लव्ह डे” असं कॅपशन दिलं आहे. त्यांच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्या फोटोवर अथियानेही कमेंट केली आहे.

के. एल. राहुलची इन्स्टाग्राम पोस्ट

क्रिकटपटू के. एल. राहुलने त्याच्या आयुष्यातील खास व्यक्तीसाठी एक खास फोटो शेअर केला आहे. अथिया शेट्टीसाठी त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. के. एल. राहुलने अथिया शेट्टी सोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत तिला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोला त्याने “हॅपी लव्ह डे” असं कॅपशन दिलं आहे. त्यांच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by KL Rahul👑 (@rahulkl)

अथियाची कमेंट

के. एल. राहुल या इन्स्टाग्राम पोस्टवर अथियानेही कमेंट केली आहे. तिने हार्ट कमेंट करत या फोटोला आपली संमती दिली आहे.

अथियाची कमेंट

के. एल. राहुल आणि अथिया शेट्टीचं नातं

भारतीय क्रिकेट संघातील बॅट्समन के. एल. राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी या दोघांच्या नात्याबद्दल अनेकदा बोललं जातं. या दोघांनीही आपल्यातल्या नात्याची कबूली दिली आहे. ते नेहमी एकमेकांसोबतचे फोटो शेअर करताना दिसतात. अथिया नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत अखेर ‘मोतीचूर चकनाचूर’ या चित्रपटात दिसली होती.

View this post on Instagram

A post shared by KL Rahul👑 (@rahulkl)

संबंधित बातम्या

धकधक गर्ल माधुरी दीक्षितला पाहून कपिल शर्मा स्वतःला तिच्यासोबत सेल्फी घेण्यापासून रोखू शकला नाही, पाहा खास फोटो!

Manorama :बालकलाकारापासून करिअरची सुरुवात, त्यानंतर खलनायक आणि विनोदी भूमिका करत प्रेक्षकांची मने जिंकली!

कुटुंबाच्या विरोधात जाऊन जिच्याशी लग्न केलं, लेकीच्या जन्मानंतर तिच्यापासून वेगळे राहिले; वाचा, रणधीर कपूर यांची वादळी लव्ह’स्टोरी’

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें