AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना नावात कपूर ना खान, तरीही बॉलीवूडमध्ये दाणादाण, वाचा केजीएफ स्टारची प्रेरणादायी गोष्ट!

कन्नड चित्रपटांचा सुपरस्टार यशचा (Yash) आज आपला 35 वा वाढदिवस साजरा करीत आहे.

ना नावात कपूर ना खान, तरीही बॉलीवूडमध्ये दाणादाण, वाचा केजीएफ स्टारची प्रेरणादायी गोष्ट!
| Updated on: Jan 08, 2021 | 10:18 AM
Share

मुंबई : कन्नड चित्रपटांचा सुपरस्टार यशचा (Yash) आज आपला 35 वा वाढदिवस साजरा करीत आहे. यशचा जन्म 8 जानेवारी 1986 रोजी कर्नाटकच्या हसन जिल्ह्यात झाला आहे. यशचे खरे नाव नवीन कुमार गौडा (naveen kumar gowda) असे आहे. त्याने आपल्या चित्रपट करिअरची सुरुवात मोगीना मनसु या चित्रपटापासून केली आणि याच चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान यशला त्याची जीवनसाथी राधिका देखील मिळाली. बर्‍याच चित्रपटांत उत्कृष्ट अभिनय केल्यानंतर यशला केजीएफ (K.G.F) मधून खरी ओळख मिळाली. आता तो केजीएफ 2 (K.G.F 2) मध्ये धमाका करण्यास तयार आहे. (Kannada film superstar Yash is celebrating his 35th birthday today)

यशचे संपूर्ण बालपण म्हैसूरमध्ये शहरामध्ये गेले आहे. 2008 मध्ये त्याने चित्रपटात पहिले पाऊल ठेवले होते. त्यानंतर पाठोपाठ ते राजाधानी, मिस्टर अॅन्ड मिसेज रामाचारी आणि किराटका या सारख्या सर्वोत्कृष्ट चित्रपटात त्याने काम केले आहे. मात्र, हे तेवढेच खरे आहे की, यशला खरी ओळख केजीएफ या चित्रपटातूनच भेटली. केजीएफने जगभरात 250 कोटींचा व्यवसाय केला.

यशच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे झालेतर यशचे 2016 मध्ये लग्न झाले आहे. या लग्नामध्ये जवळचे नातेवाईक आणि मित्र उपस्थित होते. परंतु यशने आपल्या रिसेप्शनमध्ये संपूर्ण कर्नाटकला आमंत्रित केले होते. आता यशला दोन मुले आहेत. यशच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी मेकर्सने केजीएफ 2 चा टीझर रिलीज केला आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत संजय दत्त, रवीना टंडन यांच्यासह अनेक मोठे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंगही पूर्ण झाले आहे आणि चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पहात आहेत. यशने स्वत: च्या मेहनतीवर 40 कोटींची संपत्ती कमावली आहे.

संबंधित बातम्या : 

Kangana Ranaut | कंगना रनौत कोर्टाच्या आदेशाच आज तरी पालन करणार का?

SSR Case | सुशांत सिंह राजपूतच्या बहिणींची अडचण कायम, कोर्टानं निकाल राखीव ठेवला!

(Kannada film superstar Yash is celebrating his 35th birthday today)

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.