Video | अल्लू अर्जुनच्या गाण्यावर कार्तिक आर्यनचा धमाल डान्स, व्हिडीओ पाहून बॉलिवूडकरही अवाक्!

कार्तिक आर्यनचा अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) गाण्यावरचा हा डान्स व्हिडीओ तो किती प्रतिभावान कलाकार आहे, याचा उत्तम पुरावा आहे. या व्हिडीओमध्ये कार्तिक आर्यन दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘Buttabomma’ गाण्यावर नाचताना दिसत आहे.

Video | अल्लू अर्जुनच्या गाण्यावर कार्तिक आर्यनचा धमाल डान्स, व्हिडीओ पाहून बॉलिवूडकरही अवाक्!
कार्तिक आर्यन

मुंबई : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) हा सध्या खूप चर्चेत आहे. सलग अनेक चित्रपटातून हद्दपार झाल्यानंतर कार्तिक आर्यनचे चाहते खूप बॉलिवूड इंडस्ट्रीवर प्रचंड संतापले आहेत. बड्या सुपरस्टार्सच्या वर्चस्वामुळे मनोरंजन विश्वात नेपोटीझम वाढतोय आणि बाहेरील व्यक्तीला काम दिले जात नाहीय, असे आरोप चाहते करत आहेत. या सगळ्या दरम्यान, अभिनेत्याचा असा धमाकेदार व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून कदाचित चाहत्यांचा मूड थोडा चांगला होईल (Kartik Aaryan share dance video on allu arjun song Buttabomma goes viral).

कार्तिक आर्यनचा अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) गाण्यावरचा हा डान्स व्हिडीओ तो किती प्रतिभावान कलाकार आहे, याचा उत्तम पुरावा आहे. या व्हिडीओमध्ये कार्तिक आर्यन दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘Buttabomma’ गाण्यावर नाचताना दिसत आहे. कार्तिक आर्यन खूपच स्मूथ डान्स स्टेप्स करत आहे, ज्या खूप छान दिसत आहे. कार्तिकचा हा डान्स पाहून बॉलिवूड स्टार्ससुद्धा त्याचे तोंडभरून कौतुक करताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

बॉलिवूडकरही झाले फिदा

हा डान्स व्हिडीओ शेअर करत कार्तिक आर्यन (कार्तिक आर्यन) याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लिहिले की, “नृत्य असे करा की……………..? (‘कोणीही पहात नाही,’ हे लिहू नका) या पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये अनेक बॉलिवूड स्टार्सनी कार्तिकचे तोंडभरून कौतुक केले आहे. बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने टाळ्यांचे इमोजीद्वारे आपल्या भावना शेअर केल्या आहेत. तर त्याचा मित्र करण ठक्कर यांने कमेंट करत लिहिले की, ‘अमेझिंग!.’

रकुल प्रीतही झाली मोहित

या टिप्पणीनंतर करण ठक्कर याने फायर इमोजीही पोस्ट केल्या आहेत. अभिनेत्री रकुल प्रीतही कार्तिकच्या या नृत्यावर मोहित झाल्याचे दिसून आले. रकुल प्रीत हिने कमेंटमध्ये लिहिले की, ‘अरे, अरे, अरे…’ अरमान मलिक आणि श्रद्धा कपूर यांनीही हार्ट इमोजी पोस्ट करत आपल्या भावना शेअर केल्या आहेत.

‘बुट्टबोम्मा’ गाण्याची धूम

अलीकडेच ‘बुट्टबोम्मा’ गाण्याने यूट्यूबवर 4 मिलिअन लाईक्स पूर्ण केले आहेत. या गाण्यात अल्लू अर्जुन आणि पूजा हेगडे यांचे धमाल नृत्य पाहायला मिळाले. ज्यानंतर आता कार्तिक आर्यनने या गाण्यावर परफॉर्मन्स दिला आहे. परंतु, या गाण्यात त्याला अल्लू अर्जुनला कुठेही पराभूत करता आलेले नाही. त्याचबरोबर त्याचे चाहते कार्तिकच्या या व्हिडीओवर संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. या अभिनेत्याचा हा व्हिडीओ अवघ्या 2 तासांत 14 लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

(Kartik Aaryan share dance video on allu arjun song Buttabomma goes viral)

हेही वाचा :

PHOTO | बाल्कनी आणि रम्य संध्याकाळ, जान्हवी कपूरच्या घरातून सूर्यास्ताचे विलोभनीय दर्शन!

Video | उर्वशी रौतेलाला पडतोय ‘मुक्का’मार, वेदनेने विव्हळत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत!