AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | उर्वशी रौतेलाला पडतोय ‘मुक्का’मार, वेदनेने विव्हळत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत!

उर्वशीलाच मुक्के मारून तिच्यावर हल्ला करण्यात आला आहे. उर्वशीने स्वत:चा हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती उर्वशीला पोटावर मुक्के मारत आहे.

Video | उर्वशी रौतेलाला पडतोय ‘मुक्का’मार, वेदनेने विव्हळत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत!
उर्वशी रौतेला
| Edited By: | Updated on: Jun 11, 2021 | 11:12 AM
Share

मुंबई : सौंदर्याच्या बाबतीत बड्याबड्या अभिनेत्रींना टक्कर देणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. उर्वशी तिची सुंदर छायाचित्रे आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. आता तिने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे, तो पाहिल्यानंतर तिचे चाहते अस्वस्थ झाले आहेत. तिचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर उर्वशी रौतेलाचे चाहतेही अस्वस्थ झाले. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, उर्वशीला चक्क मुक्के मारले जात आहेत (Urvashi Rautela hard workout training video goes viral on internet).

उर्वशीला मिळतोय ‘मुक्का’मार

आता, तुम्हाला असे वाटेल की कदाचित आम्ही एखाद्या चित्रपटाच्या शूटिंगबद्दल बोलत आहोत. पण हे कोणत्याही चित्रपटाच्या शूटिंगबद्दल बोलत नाहीय, तर प्रत्यक्षात उर्वशीलाच मुक्के मारून तिच्यावर हल्ला करण्यात आला आहे. उर्वशीने स्वत:चा हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये उर्वशीला एक व्यक्ती पोटावर मुक्के मारत आहे. व्हिडीओच्या शेवटी, ती शेवटी कळवळून खाली वाकली आणि किंचाळली.

पाहा व्हिडीओ :

का पडला उर्वशीला मार?

उर्वशीला तिच्या संमतीनेच हा मुक्कामार पडला आहे. ती स्वत:च या वेदना सहन करत ठोस्यांचा मारा झेलत आहे. याचा अंदाज तिच्या व्हिडीओ कॅप्शनवरून घेऊ शकता. तिने आपल्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘वेदना मिळाल्याशिवाय काहीही साध्य होत नाही. तो मला सरळ पोटावर मारत आहे. हे कठीण काम मी माझ्या अ‍ॅक्शन चित्रपटाच्या तयारीसाठी करत आहे. मी त्याचे ठोसे सहन करण्याची सवय लावून घेत आहे.’(Urvashi Rautela hard workout training video goes viral on internet)

उर्वशीची ‘कडक’ दिनचर्या

कॅप्शन वाचल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे की, उर्वशी रौतेला लवकरच एका अ‍ॅक्शन चित्रपटात दिसणार आहे आणि ती यासाठी तयारीत व्यस्त आहे. या चित्रपटाच्या तयारीसाठी तिने खूप कठीण दिनक्रम निवडला आहे. ती या भूमिकेत फिट होण्यासाठी खूप परिश्रम घेत आहे आणि जिममध्ये अशा प्रकारे घाम गाळत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते अस्वस्थ होत आहेत.

चाहते पडले काळजीत

उर्वशी रौतेलाच्या एका चाहत्याने लिहिले की, ‘मला या व्यक्तीचा राग येत आहे.’ एकाने लिहिले की, ‘आपल्या आरोग्याची काळजी घ्या.’ दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले, ‘ही तयारी का सुरु आहे?’ यातून हे सर्व ज्ञात आहे की उर्वशीला खूप वेदना होत आहेत, परंतु तिच्या चाहत्यांसाठी तिला या अवस्थेत पाहणे फार कठीण झाले आहे.

‘या’ सीरीजमध्ये दिसणार

अलीकडेच उर्वशी रौतेला अरब सुपरस्टार मोहम्मद रमझानसोबत ‘वर्सास बेबी’ मध्ये (Versace Baby) दिसली होती. येत्या काळात ती जियो स्टुडिओच्या रणदीप हूडा अभिनित ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या आगामी वेब सीरीजमध्ये दिसणार आहे.

(Urvashi Rautela hard workout training video goes viral on internet)

हेही वाचा :

Photo : खामोशी की तह में छुपा लो सारी उलझने…,श्रुती मराठेचं भुरळ पाडणारं सौंदर्य

The Family Man 2 मुळे ज्यांची सर्वाधिक नेटवर चर्चा आहे ते चेल्लाम सर नेमके कोण आहेत?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.