PHOTO | बाल्कनी आणि रम्य संध्याकाळ, जान्हवी कपूरच्या घरातून सूर्यास्ताचे विलोभनीय दर्शन!

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे सुरू झालेलेल्या लॉकडाऊनमुळे प्रत्येकजण आपल्या घरातच कैद झाला आहे. अशा परिस्थितीत सेलेब्रिटीसुद्धा आपल्या कुटुंबियांसमवेत वेळ घालवत आहेत. या यादीमध्ये जान्हवी कपूरचाही (Janvhi Kapoor) समावेश आहे. अलीकडे अभिनेत्रीने तिच्या घराच्या बाल्कनीमधून काही खास फोटो शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.

1/6

2/6
अलीकडे अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर काही खास छायाचित्रे शेअर केली आहेत, या फोटोंमध्ये अभिनेत्री आपल्या बाल्कनीमध्ये बसून सूर्यास्ताचा आनंद लुटताना दिसत आहे. फोटोमध्ये जान्हवी सुंदर फोटो पोझ देताना दिसत आहे.
3/6
काही फोटोंमधून हे स्पष्टपणे दिसून येते की, जान्हवी तिच्या मित्रपरिवारासोबत धमाल करत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
4/6
जान्हवीची ही साधी आणि सुंदर शैली तिच्या चाहत्यांना खूप आवडली आहे. अभिनेत्रीच्या या फोटोंवर चाहते भरभरून कमेंट करत आहेत.
5/6
जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे आणि तिच्या चाहत्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
6/6
जान्हवी काही दिवसांपूर्वीच मालदीव सुट्टीवरून परतली आहे. या दरम्यानचा तिचा बिकिनी लूक चांगलाच चर्चेत आला होता. या ट्रीप दरम्यानचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.