Delete Post | विकी कौशलसोबत कतरिनाचा फोटो व्हायरल, घाबरुन लगेच फोटो केला डिलीट!

Delete Post | विकी कौशलसोबत कतरिनाचा फोटो व्हायरल, घाबरुन लगेच फोटो केला डिलीट!

विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफचे (Katrina Kaif ) नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jan 04, 2021 | 10:11 AM

मुंबई : विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफचे (Katrina Kaif ) नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मात्र, या दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कोणतेही भाष्य केले नाही. दोघेही पार्टी आणि प्रोग्राममध्येसोबत असतात एवढेच नव्हे तर या दोघांनीसोबतच नवीन वर्ष देखील साजरे केले, ज्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. कतरिनाने तिच्या बहिणीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता, पण त्या फोटोमध्ये बहिणीच्या मागे असलेल्या आरशात विकीची झलक दिसत होती. कतरिनाला जेव्हा हे समजले तेव्हा तिने तो फोटो डिलीट केला मात्र, तोपर्यंत तो फोटो व्हायरल झाला.  (Katrina Kaif deleted a photo she shared on social media)

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत जेव्हा विकी कौशलला कतरिनाबरोबरच्या नात्याबद्दल विचारले गेले होते तेव्हा तो म्हणाले होते की, मी माझे वैयक्तिक आयुष्य सीक्रेट ठेवतो म्हणून मी याबद्दल काहीही बोलणार नाही. विकी म्हणाला होता, ‘ माझ्या आयुष्यातील सीक्रेट गोष्टी मला कोणालाही शेअर करायला आवडत नाहीत आणि माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कोणी बोलत असेलतर ते मला मुळीच आवडत नाही. मला काही गोष्टी उघडपणे बोलायला देखील आवडत नाहीत.

विकी कौशल शेवटी करण जोहरच्या भूत चित्रपटात दिसला. मात्र, या चित्रपटाला चाहत्यांचा विशेष प्रतिसाद मिळाला नाही. आता तो ‘सरदार उधम सिंग’ मध्ये दिसणार आहे. याशिवाय तो ‘तख्त’ चित्रपटातही काम करणार आहे. करण जोहर निर्मित या चित्रपटात रणवीर सिंग, आलिया भट्ट, करीना कपूर, जाह्नवी कपूर, अनिल कपूर आणि भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहेत.

संबंधित बातम्या : 

New Entry | नव्या वर्षात धमाका करायला ‘दीपिका पादुकोण’ तयार, या चित्रपटातून येऊ शकते प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई पोलिसांसाठी सेगवेचे अक्षय कुमारच्या उपस्थिती लॉन्चिंग, मात्र चर्चा अक्षयच्या खास ट्राऊझरची!

(Katrina Kaif deleted a photo she shared on social media)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें