AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Katrina Kaif-Vicky Kaushal Wedding | विकी-कतरिनाच्या संगीत सोहळ्यात रंगला ‘संगीत खुर्ची’चा खेळ, हळदी समारंभही होणार खास!

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) 9 डिसेंबरला सात फेरे घेणार आहेत. 7 डिसेंबर रोजी त्यांचा मेहंदी सोहळा पार पडला, जो राजस्थानमधील सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा येथे आयोजित करण्यात आला होता.

Katrina Kaif-Vicky Kaushal Wedding | विकी-कतरिनाच्या संगीत सोहळ्यात रंगला ‘संगीत खुर्ची’चा खेळ, हळदी समारंभही होणार खास!
Katrina-Vicky
| Edited By: | Updated on: Dec 08, 2021 | 12:18 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) 9 डिसेंबरला सात फेरे घेणार आहेत. 7 डिसेंबर रोजी त्यांचा मेहंदी सोहळा पार पडला, जो राजस्थानमधील सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा येथे आयोजित करण्यात आला होता. लग्नाचे विधी धामधुमीत सुरू आहेत. 8 डिसेंबर रोजी दुपारी हळदी समारंभ असून रात्री संगीत कार्यक्रम होणार आहे. कतरिना कैफला सर्व फंक्शन्समध्ये ‘वहिनी’ म्हणून संबोधले जात आहे आणि घरच्यांना असे म्हणताना पाहून अभिनेत्री देखील लाजताना दिसत आहे.

वृत्तानुसार, विकी आणि कतरिना लग्नानंतर दोन मोठ्या ब्रँडला इंडोर्स केल्यानंतर एकत्र दिसणार आहेत. 2022 मध्ये, दोघेही एक फिटनेस ब्रँड आणि दुसर्‍या लक्झरी ब्रँडला मान्यता देतील. सध्या तरी दोघांनी एकत्र चित्रपट करण्याची ऑफर नाकारली आहे. या जोडप्याला सध्या काही मनोरंजक प्रोजेक्ट करायचे आहेत.

संगीत सोहळ्यात रंगली ‘संगीत खुर्ची’!

7 डिसेंबरच्या रात्री, विकी कौशल आणि कतरिना कैफच्या कुटुंबाने एक ‘म्युझिकल चेअर गेम’ अर्थात ‘संगीत खुर्ची’चा खेळ खेळला, ज्यामध्ये विकी हरला. डीजेवर गाणी वाजत होती आणि खुर्च्या एका वर्तुळात ठेवल्या होत्या. संगीत बंद झाल्यानंतर, गेम खेळणाऱ्या लोकांना खुर्चीवर बसावे लागणार होते, ज्यामध्ये विकी मागेच राहिला.

कुटुंब देखील एकत्र!

याशिवाय कतरिना कैफच्या आईने विकी कौशलच्या पालकांना लंडनला येण्याचे निमंत्रण दिले आहे. विकीचे पालक जानेवारी महिन्यात लंडनला जाऊ शकतात. तसेच, शर्वरी आणि सनी कौशल देखील मेहंदी फंक्शन दरम्यान एकत्र स्पॉट झाले होते. तिथे उपस्थित पाहुणे दोघांना विचारत होते की, आता पुढचा नंबर त्यांचा आहे का? जे ऐकल्यानंतर दोघेही लाजताना दिसले.

कतरिना कैफ आणि विकी कौशलबद्दल बोलायचे झाले, तर दोघांच्या वयात पाच वर्षांचा फरक आहे. तसेच कतरिनाची संपत्ती विकीच्या नेटवर्थपेक्षाही जास्त आहे. लग्नानंतर दोघेही वेगळ्या घरात शिफ्ट होतील. दोघेही हनीमूनसाठी मालदीवला जाऊ शकतात, असेही बोलले जात आहे. तथापि, जोडप्याच्या बाजूने अद्याप कोणतीही पुष्टी आलेली नाही.

सेलिब्रिटींची लगबग!

लग्नात सहभागी होण्यासाठी कैफची आई, बहिणी आणि भाऊ यांच्यासह इतर सदस्य लंडनहून राजस्थानला आले आहेत. तत्पूर्वी, कतरिना आणि विकी आपल्या कुटुंबीयांसह सोमवारी रात्री जयपूरला पोहोचले होते. त्यानंतर ते 15हून अधिक गाड्यांच्या ताफ्यासह सवाई माधोपूर येथील लग्न समारंभाच्या ठिकाणी ते रवाना झाले होते.

जयपूर विमानतळ आणि हॉटेलमधील अंतर सुमारे 120 किमी आहे. चित्रपट निर्माते कबीर खान आणि त्यांची पत्नी मिनी माथूर, ‘धूम 3′ आणि ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’चे दिग्दर्शक विजय कृष्ण आचार्य, ‘बंटी और बबली 2’ अभिनेत्री शर्वरी वाघ, नेहा धुपिया आणि अंगद बेदी हे लग्नसोहळ्याला हजेरी लावण्यासाठी जोधपूरला रवाना झाले आहेत.

हेही वाचा :

This week release | सुष्मिता सेनची ‘आर्या’ ते आयुष्मान खुरानाचा ‘चंडीगड करे आशिकी’, आठवडाभर मिळणार मनोरंजनाची मेजवानी!

Happy Birthday Dharmendra | मनोरंजन विश्वात येण्यापूर्वी धर्मेंद्र करायचे रेल्वेत नोकरी, दुसऱ्या लग्नासाठी बदलले नाव!

Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding : विकी-कतरीनाच्या लग्नात पाहुण्यांना पाळावे लागणार हे नियम

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...