कांतारा फेम ऋषभ शेट्टी आणि केजीएफ फेम यश यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट, या विषयावर झाली चर्चा
ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काैतुक केले होते. कांतारा या चित्रपटामुळे ऋषभ शेट्टी याला एक खास ओळख मिळालीये. बाॅक्स आॅफिसवर कांतारा या चित्रपटाने धुमाकूळ घातला होता.

मुंबई : केजीएफ फेम यश याच्यासह कन्नडचे काही महत्वाचे स्टार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना नुकताच भेटले आहेत. या भेटीचे अनेक फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. नरेंद्र मोदी हे एरो इंडिया 2023 चे उद्घाटन करण्यासाठी बेंगळुरू येथे पोहोचले होते. यावेळी राजभवनामध्ये त्यांनी कन्नड इंडस्ट्रीतील (Kannada Industry) स्टार्सची भेट घेतली. रिपोर्टनुसार राजभवनात या सर्वांसाठी डिनरची व्यवस्थाही करण्यात आली होती. यावेळी कन्नड इंडस्ट्रीच्या काही प्रश्नांवर चर्चा करण्यात आलीये. कांतारा हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काैतुक केले होते. कांतारा या चित्रपटामुळे ऋषभ शेट्टी याला एक खास ओळख मिळालीये. बाॅक्स आॅफिसवर कांतारा या चित्रपटाने धुमाकूळ घातला होता.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये यश, ऋषभ शेट्टी आणि दिवंगत पुनीत राजकुमार यांची पत्नी दिसत आहे. नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या या मुलाखतीमध्ये अनेक विषयावर चर्चा झालीये.
राज्यातील थिएटरची कमी संख्या आणि इकोनॉमीबद्दल चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. यावेळी कन्नड चित्रपट इंडस्ट्रीच्या काही समस्यांवर चर्चा झाल्याचे देखील सांगितले जात आहे.
Was a pleasure meeting our Hon’ble PM @narendramodi ji yesterday with my cricketing colleagues at Raj Bhavan , Bengaluru . He discussed a variety of issues including Sports infrastructure , Olympics and sporting culture in India. pic.twitter.com/yZAL0ZHgFC
— Venkatesh Prasad (@venkateshprasad) February 13, 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यश, ऋषभ शेट्टी आणि अश्विनी पुनीत राजकुमार यांना डिनर पार्टीसाठी निमंत्रण दिल्याचे देखील सांगितले जात आहे. केजीएफ चित्रपटाच्या माध्यमातून यश याने देशासह विदेशातही खास फॅन फाॅलोइंग नक्कीच तयार केलीये.
केजीएफ चित्रपटाने फक्त देशामध्येच नाही तर विदेशातही जबरदस्त असे बाॅक्स आॅफिस कलेक्शन केले आहे. कांतारा चित्रपटाला देखील प्रेक्षकांचे मोठे प्रेम मिळाले आहे. या दोन्ही चित्रपटांनी अनेक रेकाॅर्ड आपल्या नावावर केले आहेत.
काही दिवसांपूर्वी अनुराग कश्यप यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले होते की, कांतारा आणि पुष्पा यासारख्या चित्रपटांमुळे बाॅलिवूडचे मोठे नुकसान होत आहे. यानंतर अनेकांनी अनुराग कश्यप यांना खडेबोल सुनावले होते.
