केएल राहुल सुनील शेट्टीचा जावई बनणार? अथिया शेट्टीसोबत एंट्री घेतल्याने भुवया उंचावल्या!

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची (suniel shetty) मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर केएल राहुल यांच्यातील सिक्रेट अफेअर आता संपूर्ण जगासमोर आले आहे. या दोन्ही स्टार्सनी त्यांच्या नात्यावर बरेच दिवस मौन पाळले होते, पण आता केएल राहुलचे अथियावरील प्रेम जगासमोर आले आहे.

केएल राहुल सुनील शेट्टीचा जावई बनणार? अथिया शेट्टीसोबत एंट्री घेतल्याने भुवया उंचावल्या!
KL Rahul-Athiya Shetty

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची (suniel shetty) मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर केएल राहुल यांच्यातील सिक्रेट अफेअर आता संपूर्ण जगासमोर आले आहे. या दोन्ही स्टार्सनी त्यांच्या नात्यावर बरेच दिवस मौन पाळले होते, पण आता केएल राहुलचे अथियावरील प्रेम जगासमोर आले आहे. बुधवारी हे दोघेही पहिल्यांदाच ‘तडप’ चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये मीडियासमोर एकत्र दिसले होते. अथिया आणि केएल राहुलला स्टेजवर एकत्र बघून त्यांचे फोटो काढण्याची चढाओढ सुरु होती.

केएल राहुलचा हात धरत अथिया स्टेजवर पोहोचली आणि पापाराझींना हसत हसत पोझ दिली. यादरम्यान, दोन्ही सेलिब्रिटींच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. जणू काही त्यांना कायमचा एकमेकांचा हात धरायचा होता. अथियाचे वडील सुनील शेट्टी आणि आई माना शेट्टी यांनीही प्रीमियरला हजेरी लावली होती. अथियाचे संपूर्ण कुटुंब केएल राहुलसोबत फोटो काढताना दिसलं. अथियाचा भाऊ अहान शेट्टीच्या चित्रपटाच्या प्रीमियरला केएल राहुलची उपस्थिती हीच एक मोठी गोष्ट आहे.

केएल राहुलने ऑफिशियल केले रिलेशन!

अलीकडेच 5 नोव्हेंबरला अथियाच्या वाढदिवसा दिवशी केएल राहुलने त्यांच्या नात्यावर अधिकृत शिक्कामोर्तब केले होते. त्याने अथियासोबतचा एक क्यूट फोटो शेअर केला आणि हार्ट इमोजीसह लिहिले, ‘Happy Birthday Merry @athiyashetty.’  त्यांच्या या पोस्टने सर्व अटकळांना पूर्णविराम दिला होता. केएल राहुलच्या या पोस्टवर लोकांनी अथियाला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आणि कपललाही शुभेच्छाही दिल्या.

इंग्लंडमध्ये एकत्र दिसले अथिया-केएल राहुल!

अथिया आणि केएल राहुल बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. जुलैमध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या कसोटी मालिकेदरम्यान अथिया केएल राहुलसोबतही दिसली होती. बीसीसीआयला सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये केएल राहुलने अथियाला आपला जोडीदार असल्याचे म्हटले होते. त्याचवेळी सुनील शेट्टी यांना दोघांच्या नात्याबाबत विचारण्यात आले. तेव्हा, त्यांनी उत्तर तर दिले नाहीच पण नकारही दिला नाही आणि आता केएल राहुल आणि अथियाचे नाते उघडल्यानंतर, सुनीलने मुलीच्या नात्याला आक्षेप घेतला नाही, फक्त योग्य वेळेची वाट पाहत आहेत.

हेही वाचा :

Happy Birthday Boman Irani | वेटर ते फोटोग्राफर, 42व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत बोमन इराणी बनले सुपरस्टार!

Birth Anniversary | मोलकरीण अभिनेत्री बनली, 450 चित्रपटांमध्ये कामही केलं अन् गळफास घेऊन आयुष्य संपवलं! वाचा सिल्क स्मिताबद्दल…

‘आई माझा घटस्फोट झालाय…’, चार वर्षाच्या लेकीचे बोल ऐकून लारा दत्ताही हादरली! वाचा पुढे काय झालं…


Published On - 10:47 am, Thu, 2 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI