‘आई माझा घटस्फोट झालाय…’, चार वर्षाच्या लेकीचे बोल ऐकून लारा दत्ताही हादरली! वाचा पुढे काय झालं…

बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता (Lara Dutta) सध्या तिच्या आगामी लायन्सगेट सीरीज ‘हिचकी और हुकअप’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, अभिनेत्रीने तिची चार वर्षांची लेक सायराबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे.

‘आई माझा घटस्फोट झालाय...’, चार वर्षाच्या लेकीचे बोल ऐकून लारा दत्ताही हादरली! वाचा पुढे काय झालं...
Lara Dutta with Daughter

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता (Lara Dutta) सध्या तिच्या आगामी लायन्सगेट सीरीज ‘हिकप अँड हुकअप’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, अभिनेत्रीने तिची चार वर्षांची लेक सायराबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. तिच्या एका मुलाखतीदरम्यान लारा दत्ताने सांगितले की, घटस्फोट म्हणजे काय हे तिच्या मुलीला इतक्या लहान वयातच कळले होते.

‘फ्रेंड्स’ हा प्रसिद्ध अमेरिकन टीव्ही शो पाहताना तिचा पती महेश भूपती यानेच सायराला घटस्फोटाचा अर्थ शिकवल्याचा खुलासाही लाराने केला. ‘फ्रेंड्स’ हा शो तिच्या मुलीचा आणि नवऱ्याचा आवडता शो आहे. लारा आणि महेश यांनी 2011 मध्ये लग्नगाठ बांधली होती. 2012 मध्ये दोघांनी मुलगी सायराचे स्वागत केले. आता सायरा 9 वर्षांची झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Lara Dutta Bhupathi (@larabhupathi)

मुलीचे बोल ऐकून लारा हादरली!

ब्रूट इंडियाशी बोलताना लाराने खुलासा केला की, महेशचा आवडता शो ‘फ्रेंड्स’ आहे आणि सायरा फक्त चार वर्षांची असल्यापासून ती तिच्या वडिलांसोबत हा शो पाहत होती. लारा पुढे सांगते की, एक दिवस सायरा माझ्याकडे आली आणि एक गेम खेळत असताना मला म्हणाली की, ‘आई, मी इथे राहते, हे माझे घर आहे. ते तुझे घर आहे आणि माझा घटस्फोट झाला आहे. हे ऐकून मला जवळजवळ हार्ट अटॅकच आला. तिचे बोलणे ऐकून मी अवाक् झाले आणि मी तिला विचारले की, हे काय बोलतेयस? तुला हे कोणी सांगितले? घटस्फोट म्हणजे काय?’ तर ती मला म्हणाला, ‘अगं आई, जेव्हा दोन लोकांचे वैवाहिक जीवन वाईट असते आणि त्यांचे एकमेकांशी पटत नाही, तेव्हा ते वेगळे राहू लागतात, याचा अर्थ त्यांचा घटस्फोट होतो.’

लारा म्हणते, ‘ती पाच वर्षांची होणार होती आणि तिच्या तोंडून या गोष्टी ऐकून मला धक्काच बसला. मी माझ्या मुलीला विचारले की तिला याबद्दल कोणी सांगितले आणि सायरा उत्तर देताना म्हणाली डॅडी ने!’.

थेट महेश केला फोन!

लारा पुढे सांगताना म्हणाली की, तिने महेशला फोन करून मुलीच्या बोलण्याची पुष्टी केली आणि त्याला विचारले की, त्याने इतक्या लहान वयात तिला या गोष्टी का सांगितल्या? यावर महेश हसला आणि म्हणाला, ‘आम्ही ‘फ्रेंड्स’ एकत्र पाहत होतो आणि सायराला जाणून घ्यायचे होते की, त्यातील रॉसने तीन लग्न का केली?’ लारा म्हणाली की, म्हणून तू तिला सांगितलेस घटस्फोटाचा अर्थ काय..आम्ही असे पालक आहोत का?. यावर त्यांची चर्चा देखील झाली. मात्र, त्यावेळी लाराला आपल्या चिमुकलीचे विचार ऐकून चांगलाच धक्का बसला होता.

हेही वाचा :

Happy Birthday Udit Narayan | नेपाळ इंडस्ट्रीतून करिअरची सुरुवात, आमिर खानच्या एका गाण्याने बदललं उदित नारायण यांचं आयुष्य!

Nikita Dutta | कबीर सिंग फेम निकीता दत्ताचा फोन चोरट्यांनी पळवला, अभिनेत्रीने शेअर केला शॉकिंग एक्सपिरिअन्स

Happy Birthday Saurabh Raj Jain | भगवान श्रीकृष्णाच्या भूमिकेने मिळवून दिली ओळख, हॉलिवूड चित्रपटातही झळकलाय सौरभ जैन!


Published On - 2:36 pm, Wed, 1 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI