Laal Singh Chaddha: आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ पाहावा की पाहू नये?, संभ्रमात असाल तर ही 5 कारणं वाचा!

लाल सिंग चड्ढामध्ये आमिरशिवाय करीना कपूर खान, मोना सिंग आणि नाग चैतन्य यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहावा की पाहू नये, या संभ्रमात असाल तर आम्ही तुम्हाला त्याची 5 सकारात्मक आणि 5 नकारात्मक कारणं सांगतो..

Laal Singh Chaddha: आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा' पाहावा की पाहू नये?, संभ्रमात असाल तर  ही 5 कारणं वाचा!
Laal Singh ChaddhaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 11, 2022 | 2:53 PM

आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ (Laal Singh Chaddha) हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच काही कारणांसाठी सोशल मीडियावर जोरदार चर्चेत होता. एकीकडे लाल सिंह चड्ढा या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी काही लोकांकडून करण्यात आली, तर काहींनी त्याला पाठिंबाही दिला. आमिरचा (Aamir Khan) हा चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’ (Forrest Gump) या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आहे, ज्यामध्ये सुपरस्टार टॉम हँक्सने मुख्य भूमिका साकारली होती. लाल सिंग चड्ढामध्ये आमिरशिवाय करीना कपूर खान, मोना सिंग आणि नाग चैतन्य यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहावा की पाहू नये, या संभ्रमात असाल तर आम्ही तुम्हाला त्याची 5 सकारात्मक आणि 5 नकारात्मक कारणं सांगतो..

लाल सिंग चड्ढा का पहावा?

  1. बर्‍याच दिवसांनी हिंदी चित्रपटसृष्टीत एक चांगला आणि उत्तम कथेचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे, जो मनोरंजनासोबतच काहीतरी चांगलं नक्कीच शिकवतो.
  2. चित्रपटाची कास्टिंग आणि प्रत्येक पात्राचं अभिनय एकदम परफेक्ट आहे.
  3. कथानक खूप छान आहे. भूतकाळ आणि भविष्यात प्रवास करताना चित्रपटाची कथा ही प्रेक्षकाला खुर्चीला खिळवून ठेवते.
  4. चित्रपटाचे संवाद चांगले आहेत. जिंदगी गोलगप्पे जैसी होंदी है, पेट भर जांदा है, पर मन नहीं भरता, हा संवाद मनाचा ठाव घेतो. हा असा एक चित्रपट आहे, जो तुम्हाला तुमच्या आवडत्या चित्रपटांच्या संग्रहात ठेवायला आवडेल.
  5. ज्यांनी फॉरेस्ट गंप पाहिला नसेल किंवा ज्यांनी पाहिला असेल, त्यांच्यासाठीही हा एक ताजंतवानं आणि स्वदेशी कथेचा चित्रपट ठरेल.

‘लाल सिंग चड्ढा’मधील कोणत्या गोष्टी खटकू शकतात?

    1. चित्रपट खूप लांब आहे. हल्ली लोकांना ठराविक वेळेच्या मर्यादेचे चित्रपट पाहायला आवडतात. चित्रपटातील काही दृश्ये खूप ताणली गेली आहेत.
    2. बहुतेक लोकांना एक गोष्ट खटकू शकते ते म्हणजे लाल सिंग यांनी वाचवलेलं पात्र. हा चित्रपटाबाबत स्पॉयलर नाही, परंतु या पात्राचा जीव वाचवण्यासाठी लाल सिंग म्हणजेच आमिर पुन्हा ट्रोल होऊ शकतो.
    3. जर तुम्ही मसाला चित्रपटांचे चाहते असाल तर हा चित्रपट तुमच्यासाठी नाही. यात तुम्हाला मसालेदार असं काहीही मिळणार नाही.
    4. अनेक दृश्यांमध्ये आमिरचं वय स्पष्टपणे त्याच्या चेहऱ्यावर दिसून येतं. जे चित्रपटात दाखवलेल्या त्याच्या वयाच्या विरोधात वाटू शकतं.
    5. चित्रपटात असे अनेक सीन्स आहेत, जे पाहून तुम्ही म्हणाल की ते चित्रपटात नसते तर बरं झालं असतं.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.