AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवाळीच्या दिवशी मनोरंजनाचा जबरदस्त तडका, अक्षय कुमार आणि अजय देवगणचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

दिवाळी बाॅलिवूड चित्रपटांसाठी नेहमीच लकी ठरते. दिवाळीमध्ये मोठ्या बजेटचे चित्रपट रिलीज केले जातात.

दिवाळीच्या दिवशी मनोरंजनाचा जबरदस्त तडका, अक्षय कुमार आणि अजय देवगणचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला
| Updated on: Oct 23, 2022 | 7:58 AM
Share

मुंबई : कोरोनानंतरचा काळ बॉलिवूड (Bollywood) क्षेत्रासाठी खास ठरला नाहीये. बाॅलिवूडचे चित्रपट सातत्याने बाॅक्स आॅफिसवर फेल जात आहेत. जणू कोरोनाच्या काळानंतर प्रेक्षकांनी बाॅलिवूड चित्रपटाकडे पाठच फिरवली. प्रेक्षकांना (Audience) आपल्यासोबत परत एकदा जोडण्यासाठी बॉलिवूडकडून जोरदार प्रयत्न सुरू असताना इकडे साऊथचे चित्रपट हीट ठरत जबरदस्त कामगिरी करत आहेत. मात्र, बाॅलिवूडच्या चित्रपटाचे बजेट काढणे देखील अवघड होऊन बसले ही वस्तूस्थिती आहे. चित्रपटाचा टीझर रिलीज (Release) झाला की, लगेचच बाॅलिवूडच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मीडियावर सुरू होते.

दिवाळी बाॅलिवूड चित्रपटांसाठी नेहमीच लकी ठरते. दिवाळीमध्ये मोठ्या बजेटचे चित्रपट रिलीज केले जातात. यंदाही दोन मोठ्या बजेटचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला 25 आॅक्टोबरला येणार आहेत. मात्र, हे दोन्ही चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदरच वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. अजय देवगण आणि अक्षय कुमारचे हे चित्रपट आहेत.

अक्षय आणि अजयच्या चित्रपटांकडून खूप जास्त अपेक्षा बाॅलिवूडला आहेत. कारण दिवाळीत रिलीज झालेले कोणतेच चित्रपट फ्लॉप जात नाहीत. अजय देवगणचा थँक गॉड हा चित्रपट वादात अडकलाय. इतकेच नाही तर या चित्रपटाचे प्रकरण थेट कोर्टात गेले आहे. चित्रपटात चित्रगुप्ताची भूमिका चुकीच्या पध्दतीने दाखवण्यात आलीये, असे कायस्थ समाजाचे म्हणणे आहे. दोन्ही चित्रपटांच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये राम सेतू वरचढ ठरत आहे.

गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमारच्या राम सेतू चित्रपटाची देखील चर्चा आहे. आता अजय आणि अक्षय या दोघांचे चित्रपट एकाच दिवशी रिलीज होणार असल्याने बाॅक्स आॅफिसवर नेमका कोणता चित्रपट धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. दोन्ही चित्रपट मोठ्या बजेटचे आहे. थँक गॉडवर बंदी घालण्याची मागणी सातत्याने सोशल मीडियावर सुरू आहे.

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.