डान्स पाहिला… दबंगगिरी पाहिली… सलमान दर महिन्याला किती कमावतो? त्याच्या भावांचीही संपत्ती किती माहित्ये का?
अभिनेता सलमान खानप्रमाणेच त्याचे भाऊ अरबाज आणि सोहेल खान प्रचंड कमाई करतात. एका एका सिनेमासाठी एखाद्या बड्या अभिनेत्याच्या तोडीचं मानधन घेतात. त्यांची नेटवर्थ पाहाल तर तुम्हीही चक्रावून जाल.

मुंबई : बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानची क्रेझ अजूनही कायम आहे. त्याच्या क्रेझमध्ये काहीच फरक पडलेला नाही. सलमानच्या सिनेमाची त्याचे चाहते आतूरतेने वाट पाहत असतात. त्यामुळे सलमान आणि हिट हे समीकरण ठरलेलंच आहे. त्यामुळेच इंडस्ट्रितील सर्वात महागडा अभिनेता म्हणूनही त्याच्याकडे पाहिलं जातं. एका एका सिनेमासाठी तो प्रचंड पैसा घेतो. सलमानचे भाऊ अरबाज खान आणि सोहेल खानही कमाईच्या बाबतीत काही कमी नाहीयेत. या दोन्ही कलाकारांची नेटवर्थही सर्वांना तोंडात बोट घालायला लावेल अशीच आहे.
भाईजान सलमान खान वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. सलमानची एकूण प्रॉपर्टी 2800 कोटी आहे. एका रिपोर्टनुसार सलमान खान दर महिन्याला 16 कोटी रुपये कमावतो. सलमानच नव्हे तर त्याचे तिन्ही भाऊही प्रचंड कमाई करतात. त्यांच्या कमाईचा आकडाही आश्चर्य वाटावा असाच आहे. एका रिपोर्टनुसार, अरबाज खान एका सिनेमासाठी 10 ते 15 कोटी रुपये घेतो. त्याची नेटवर्थ 82 मिलियन म्हणजे 8.2 कोटी आहे. सलमान खान प्रमाणेच अरबाजची संपत्तीही कोट्यवधीत आहे. अरबाज खान केवळ अभिनेताच नसून निर्माताही आहे. त्याने आतापर्यंत चार सिनेमांची निर्मिती केली आहे. त्यात दबंग 2, दबंग 3, डॉली की डोली आणि फियरलेस या सिनेमांचा समावेश आहे.
सोहेलही मालामाल
अरबाजप्रमाणे सोहेल खानची कमाईही काही कमी नाही. सोहेल खान बॉलिवूडमध्ये फारसा चमकला नाही. त्याला स्टारडम मिळालं नाही. मात्र, असं असलं तरी त्याच्या संपत्तीचा आकडा ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. 2023च्या एका रिपोर्टनुसार, सोहेल खानची नेटवर्थ 108 कोटी आहे. कोणत्याही सामान्य अभिनेत्यापेक्षा सोहेलची नेटवर्थ कैकपटीने अधिक आहे. 1.3 बिलियन म्हणजे 130 कोटीचा मालक असलेल्या सोहेलने 1981मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. लापरवाह हा त्याचा सिनेमा होता. त्यानंतर त्याने अनेक सिनेमात काम केलं. पण त्याला म्हणावं तसं यश आलं नाही. हल्ली तो सिनेमात फार कमी दिसतो.
सलमानचा जादू कायम
दरम्यान, सलमान खानची त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. सलमानचा कोणताही सिनेमा हाऊसफुल्ल चालतोच चालतो. त्यामुळे सलमानला आपल्या सिनेमात घेण्यासाठी अनेक निर्माते आणि दिग्दर्शकांची रांग लागलेली असते. पण त्यामुळे सलमान खान मिळेल ते सिनेमे स्वीकारत नाही. मोजकेच सिनेमे स्वीकारण्यावर सलमानचा भर असतो.
