चित्रपटाच्या सेटवर झाली होती संजय आणि मान्यता दत्तची पहिली भेट, वाईट काळातही दिली एकमेकांना भक्कम साथ!

बॉलिवूडचा लाडका ‘बाबा’ अर्थात अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) आणि मान्यता दत्त (Maanayata Dutt) बॉलिवूडमधील एक पॉवर कपल आहेत. 2008मध्ये दोघांनीही लग्न गाठ बांधली होती.

चित्रपटाच्या सेटवर झाली होती संजय आणि मान्यता दत्तची पहिली भेट, वाईट काळातही दिली एकमेकांना भक्कम साथ!
संजय-मान्यता दत्त

मुंबई : बॉलिवूडचा लाडका ‘बाबा’ अर्थात अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) आणि मान्यता दत्त (Maanayata Dutt) बॉलिवूडमधील एक पॉवर कपल आहेत. 2008मध्ये दोघांनीही लग्न गाठ बांधली होती. दोघांच्या या नात्याला 13 वर्षांहून अधिक काळ झाला आहेत, पण त्यांचे एकमेकांबद्दलचे प्रेम अजूनही पूर्वीसारखेच आहे. संजय दत्त आणि मान्यता यांच्यात वयातील खूपच अंतर आहे, पण त्याचा त्यांच्या प्रेमावर कधीही परिणाम झाला नाही.

संजय दत्त आणि मान्यता दत्तची प्रेमकथा एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. मान्यताशी लग्न करण्यापूर्वी संजय दत्तच्या आयुष्यात बर्‍याच मुली आल्या. परंतु, कठीण परिस्थितीत केवळ मान्यताच त्याच्याबरोबर उभी होती. आयुष्यात जेव्हा संजय दत्तला त्याच्याबरोबर एखाद्याची गरज होती, तेव्हा मान्यता दत्तने त्याला आधार दिला.

चित्रपटातून झाली प्रेमकथेची सुरूवात

एका चित्रपटातून मान्यता आणि संजयची प्रेमकथा सुरू झाली. मान्यता दत्तचे खरे नाव दिलनवाज शेख होते. जेव्हा तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले, तेव्हा तिने तिचे नाव बदलून सारा खान असे केले. ती केआरकेच्या ‘देशद्रोह’ या चित्रपटात दिसली होती, त्यानंतर तिचे नाव मान्यता असे ठेवले गेले.

संजय आणि मान्यता यांची भेट झाली तेव्हा संजय जेष्ठ अभिनेत्री नादिया दुराणीला डेट करत असल्याची चर्चा सुरु होती. नादिया आणि मान्यता एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या होत्या. संजय दत्तचे पैसे आणि लक्झरी आयुष्य नादिया यांना आवडत असताना, मान्यता केवळ त्याची काळजी घेत होती. मान्यताला संजयसाठी स्वयंपाक करायला आवडत होता. ते म्हणतात ना की माणसाच्या अंत:करणात जाण्याचा मार्ग त्याच्या पोटातून असतो. संजय दत्त आणि मान्यता यांच्या नात्यात ती म्हण योग्य ठरली आहे. मान्यताने नेहमीच संजय दत्तची काळजी घेतली.

संजय दत्तविषयी अतिशय प्रोटेक्टीव्ह होती मान्यता

मान्यता संजय विषयीचा खूपच प्रोटेक्टीव्ह झाली होती. ती स्वतः त्याला सेटवर सोडायला जात असे आणि त्याचे आवडते पदार्थ बनवून त्याच्यासाठी सोबत घेऊन जायची. तिने त्याच्या वैयक्तिक तसेच व्यावसायिक आयुष्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली.

अखेर बांधली लग्नगाठ

2 वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर संजय दत्त आणि मान्यता सतत यांनी लग्नगाठ बांधली. संजय आणि मान्यता यांनी गोव्यात 7  फेब्रुवारी 2008 रोजी हिंदू प्रथांनुसार सात फेरे घेतले. आता त्यांना दोन मुलंही आहेत.

(Love story of Bollywood Actor Sanjay Dutt and Maanayata Dutt)

हेही वाचा :

Raj Kundra Top 10 Memes : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर मीम्सची बरसात, तुम्हालाही येईल हसू

Photo : शिल्पा शेट्टीला रिप्लेस करणार करिश्मा कपूर?, ब्लॅक ड्रेसमध्ये दिसला ग्लॅमरस अवतार

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI