Hritik Roshan | ऋतिक रोशन हाजीर हो, मुंबई क्राईम ब्रांचचं समन्स, शनिवारी जबाब नोंदवणार; कंगनाप्रकरण भोवणार?

Hritik Roshan | ऋतिक रोशन हाजीर हो, मुंबई क्राईम ब्रांचचं समन्स, शनिवारी जबाब नोंदवणार; कंगनाप्रकरण भोवणार?
Hritik Roshan

बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन कंगना प्रकरणात समन्स बजावण्यात आला आहे (Mumbai Crime Branch Summoned Hritik Roshan).

Nupur Chilkulwar

|

Feb 26, 2021 | 7:24 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशनला कंगना प्रकरणात समन्स बजावण्यात आला आहे (Mumbai Crime Branch CIU Summoned Hritik Roshan). ऋतिक रोशनच्या तक्रारीच्या अनुषंगाने हा समन्स बजावण्यात आला आहे. येत्या शनिवारी ऋतिक रोशनला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. मुंबई क्राईम ब्रांचच्या सीआययु तर्फे हा समन्स बजावण्यात आला आहे (Mumbai Crime Branch CIU Summoned Hritik Roshan).

ऋतिक रोशनने अभिनेत्री कंगना विरोधात तक्रार केली आहे. ऋतिकच्या तक्रारी नुसार मुंबई क्राईम ब्रांच तपास करत आहे.

अभिनेता ऋतिक रोशन आणि अभिनेत्री कंगना रनौत हे चांगले मित्र होते. मात्र , नंतर त्यांच्यात वाद झाल्या नंतर कंगनाने ऋतिक आपल्याला सतत इमेल पाठवून त्रास देत असल्याचा आरोप केला होता. यावेळी आपण कंगनाला कोणतेही इमेल पाठवले नसल्याचा खुलासा ऋतिकने केला होता.

यानंतर ऋतिकने त्याबाबत मुंबई पोलिसांच्या सायबर सेल कडेही तक्रार केली होती. हे सर्व प्रकरण 2016 चं आहे. ही केस आता सायबर सेलकडून सीआययुकडे ट्रान्सफर करण्यात आली आहे. आता ऋतिक रोशन याच्या तक्रारीचा नव्याने तपास सुरु झाला आहे. त्याच अनुषंगाने ऋतिकला त्याचा सविस्तर जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात आहे.

कंगना रनौत आणि ऋतिक रोशन वाद

कंगना रनौत आणि ऋतिक रोशनचा वाद अनेकजण विसरले नसतील, हे प्रकरण किमान ऋतिक-कंगनाच्या चाहत्यांच्या तरी लक्षात असेलच तीन-चार वर्षांपूर्वी प्रत्येक मुलाखतीत कंगना यावर बोलली आहे. केवळ बोललीच नाही तर ऋतिकबद्दल मनात असलेली सगळी भडास तिने बाहेर काढली होती. कंगनाने त्यावेळी अनेकदा ऋतिकवरील आरोपांच्या मर्यादा ओलांडल्या होत्या. कंगनाने माध्यमासमोर ऋतिकला ‘सिली एक्स’ म्हटले होते.

Mumbai Crime Branch CIU Summoned Hritik Roshan

संबंधित बातम्या :

ऋतिक-कंगना प्रकरणातील गुन्ह्याचा तपास सायबर सेलकडून गुन्हे शाखेकडे

Google Search | गूगल इंडियाची यादी जाहिर, ‘कंगना रनौत’ दहाव्या क्रमांकावर फेकली गेली!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें