Savita Bajaj : ‘नदिया के पार’ फेम अभिनेत्री सविता बजाज आर्थिक संकटात, सचिन पिळगावकर म्हणाले ‘लोक बचत का करत नाहीत?’

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 19, 2021 | 9:25 AM

‘नदिया के पार’ फेम अभिनेत्री सविता बजाज सध्या आजारामुळे चर्चेत आहे. त्यांनी सांगितलं की त्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत.('Nadia Ke Paar' fame actress Savita Bajaj in financial crisis, Sachin Pilgaonkar said, 'Why don't people save money?')

Savita Bajaj : ‘नदिया के पार’ फेम अभिनेत्री सविता बजाज आर्थिक संकटात, सचिन पिळगावकर म्हणाले 'लोक बचत का करत नाहीत?'

मुंबई : ‘नदिया के पार’ (Nadiya Ke Paar) फेम अभिनेत्री सविता बजाज (Savita Bajaj) सध्या आजारामुळे चर्चेत आहे. या अभिनेत्रीला काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की त्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत.

CINTAA व्दारा आर्थिक मदत

सविता यांनी असंही सांगितलं होतं की त्यांना CINTAA कडून पैशांची काही मदत करण्यात आली आहे आणि यातून त्या आपला उदरनिर्वाह करत आहेत. मात्र, वैद्यकीय बिलांसाठी पैसे कमी पडत असल्याचं त्या म्हणाल्या आहेत.

सचिन पिळगावकर यांनी व्यक्त केल्या भावना

आता अभिनेते सचिन पिळगावकर, जे एककाळी सविता यांचे को-स्टार होते, त्यांनी सविताच्या परिस्थितीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. इंडिया टाईम्सशी बोलताना सचिन म्हणाले, ‘मी सविताबद्दल वर्तमानपत्रांत वाचलं. माझी इच्छा आहे संघटनेच्या लोकांनी कलाकार आणि तंत्रज्ञांच्या मदतीसाठी पुढे यावं. तुम्ही CINTAA आणि IMPPA ला मदतीसाठी विचारल्यास ते नक्कीच मदत करतील, यासाठी तुम्हाला त्यांचं सदस्य बनण्याची गरज नाही.

‘लोक त्यांच्याकडे बचत का ठेवत नाहीत?’

जेव्हा CINTAA आणि राइटर्स असोसिएशनकडून कलाकारांना मदत मिळाल्याचे सचिनला सांगण्यात आलं तेव्हा अभिनेते म्हणाले, “पाहा, दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट CINTAA पर्यंत ही गोष्ट आली नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोक त्यांच्याकडे बचत का ठेवत नाहीत? इतरांकडे बोट दाखवणे सोपे आहे, परंतु लोकांना हे समजत नाही की जर आपण दुसर्‍यांकडे बोट दाखविलं तर उर्वरित 4 बोट आपल्याकडे असतात. हा खेळ नाही आणि मी कोणत्याही कलाकाराला दोष देत नाही.

सचिन पुढे म्हणाले, ‘तुम्ही बचत ठेवायला हवी. कधीही काहीही घडू शकतं, आपण त्यासाठी तयार असलं पाहिजे आणि जेव्हा आपण कलाकार असता तेव्हा आपल्याला माहित असते की उद्या आपल्यासोबत काहीही घडू शकतं कारण आपल्या करिअरचा काही भरोसा नाहीये.’

‘तरुणांनी पैसे वाचवावेत महागडे मोबाईल आणि गाड्यांवर पैसा खर्च करू नये..’ 

सचिन यांनी आणखी काही उदाहरणं दिली ज्यात निधी बचतीचं महत्त्व स्पष्ट केलं. त्यांनी भारत भूषण सारख्या दिग्गज कलाकारांची आणि एके हंगलसारख्या कलाकारांची उदाहरणे दिली. ते पुढे तरुणांनी पैशाची बचत करावी आणि महागड्या फोनवर किंवा इतर गोष्टींवर पैसा वाया घालवू नये अशी सूचनाही दिली.

संबंधित बातम्या

Photoshop Magic: ‘या’ अभिनेत्रींना ओळखलंत?, फोटो बघताच शाहरुख सलमान आणि आमिरलाही बसेल धक्का

Binge Watch : रोमँटिक-विनोदी चित्रपट पाहून कंटाळलायत? मग, ओटीटीवर या 5 फॅन्टसी सीरीज नक्की पाहा!

‘अतिशय वाईट पद्धतीने लोक स्पर्श करायचे, बोलायची हिंमतही नव्हती..’, लोकांना हसवणाऱ्या भारतीच्या डोळ्यात आले अश्रू!

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI