Rannchhod : नसिरुद्दीन शहा बनणार ‘रणछोड’, अभिनेत्याच्या दमदार आवाजात रिलीज झाले नव्या चित्रपटाचे मोशन पोस्टर!

या साहसी-ड्रामा चित्रपटाच्या टीझरमध्ये नसीरुद्दीन शाह यांच्या गूढ आवाजात चित्रपटातील एक आयकॉनिक संवाद ऐकायला मिळतो. अध्‍ययन सुमन आणि शेरनवाज जिजिना अभिनीत, या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे आणि हे मोशन पोस्टर चित्रपट पाहण्यासाठी तुमची उत्सुकता वाढवेल, हे निश्चित आहे.

Rannchhod : नसिरुद्दीन शहा बनणार ‘रणछोड’, अभिनेत्याच्या दमदार आवाजात रिलीज झाले नव्या चित्रपटाचे मोशन पोस्टर!
Ranchhod


मुंबई : या साहसी-ड्रामा चित्रपटाच्या टीझरमध्ये नसीरुद्दीन शाह यांच्या गूढ आवाजात चित्रपटातील एक आयकॉनिक संवाद ऐकायला मिळतो. अध्‍ययन सुमन आणि शेरनवाज जिजिना अभिनीत, या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे आणि हे मोशन पोस्टर चित्रपट पाहण्यासाठी तुमची उत्सुकता वाढवेल, हे निश्चित आहे. ‘रणछोड’ ही एका मोठ्या महत्त्वाकांक्षा असलेल्या तरुण आणि प्रतिभावान माणसाची कथा आहे, जो आपल्या कुटुंबाला कर्जापासून वाचवण्यासाठी भावनिक आणि गोंधळात टाकणारा प्रवास सुरू करतो.

या चित्रपटाबद्दल बोलताना, ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह म्हणतात की, ‘रणछोड ही एक मनोरंजक कथा आहे आणि जेव्हापासून मी त्याच्या स्क्रिप्टचा पहिला सीन वाचला आहे, तेव्हापासून माझी या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट कौटुंबिक कोनातून साहस आणि नाटकावर केंद्रित असलेली कथा आहे, जी तुमची चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढेल.’

बलराज इराणी आणि बुकेलिया एंटरटेनमेंट्ससोबत काम करणे आणि अध्यायन आणि शेरनवाझ सारख्या तरुण आणि नवीन प्रतिभावंतांना कृती करताना पाहणे, हा एक मनोरंजक प्रवास असणार आहे. मी त्याच्या लॉन्चची आतुरतेने वाट पाहत आहे. राहुल देखील अत्यंत गतिमान आहे, आणि तो स्वतःमध्ये एक अनोखा दृष्टिकोन बाळगतो. त्यांनी ज्या लालित्याने भावना व्यक्त केल्या आहेत ते अप्रतिम आहे. हे सर्व प्रेक्षकांना चित्रपटाशी शेवटपर्यंत जोडलेले राहण्यास नक्कीच मदत करेल.

चित्रपटात अध्ययन सुमन महत्त्वपूर्ण भूमिकेत

अध्‍ययन सुमन सांगतात, ‘प्रत्‍येक अभिनेत्‍याच्‍या जीवनात एक चित्रपट असतो, जो करिअर बदलून जातो. रणछोड हा माझ्या आयुष्यातील असाच चित्रपट आहे. माझा नवोदित दिग्दर्शक राहुलने लिहिलेला हा एक उत्तम चित्रपट आहे. नसीर साहेबांसोबत को-स्टार म्हणून काम करणं हे प्रत्येक अभिनेत्याचं स्वप्न असतं. यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. मी नसीर साहेबांसोबत चित्रपट सुरू करण्याची आतुरतेने वाट पाहत आहे.’

हृदयाला भावणारी स्क्रिप्ट

सहकलाकार शेरनवाज जिजिना म्हणते की, ‘आपल्या मनात आणि हृदयाला भावणारी स्क्रिप्ट फार क्वचितच येते. रणछोड ही अशीच एक स्क्रिप्ट आहे. राधाच्या पात्राला अनेक पदर आहेत आणि ते सर्व एकमेकांपासून वेगळे आहेत. हेच या पात्राला वेगळे करते. टीम खूप सर्जनशील आणि उत्साही आहे, अशा संघासोबत राहणे नेहमीच मजेदार असते. यासोबतच नसीर सरांसोबत स्क्रीन स्पेस शेअर करण्याचे प्रत्येक अभिनेत्याचे स्वप्न असते. हे माझ्यासाठी नक्कीच खास असणार आहे. त्याचे शूटिंग सुरू होण्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे.’

निर्माते बलराज इराणी म्हणतात की, ‘रणछोड चित्रपटाची स्क्रिप्ट नसीरुद्दीन जी, अध्ययन आणि शेरनवाज यांसारख्या आदर्श कलाकारांशी अगदी जुळते. उत्साही तरुण दिग्दर्शक राहुल एक अनोखा दृष्टिकोन घेऊन येत आहे. मला खात्री आहे की, हा चित्रपट खरोखरच उत्कंठावर्धक असेल आणि प्रत्येकाच्या हृदयात कोरला जाईल.’ ‘रणछोड’ हे बुकेलिया एंटरटेनमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मॅजेस्टिक एंटरटेनमेंट यांनी कर्जानी क्रिएशन्स आणि नसीरुद्दीन शाह, अध्यायन सुमन आणि शेरनवाज जिजिना यांच्या सहकार्याने सादर केले आहे.

हेही वाचा :

आर्यन खानला जामीन मिळताच गौरी खानला कोसळलं रडू, शाहरुख खानलाही अश्रू अनावर!

Vicky Kaushal : विकी कौशलच्या ‘सॅम बहादूर’चे शूटिंग पुन्हा लांबणीवर, जाणून घ्या चित्रपटाला का होतोय उशीर?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI