AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेता अरमान कोहलीच्या घरावर NCB चा छापा, ‘जानी दुश्मन’साठी ऑपरेशन ‘रोलिंग थंडर’

ड्रग्स रॅकेटमध्ये सहभागी असल्याच्या संशयावरुन NCB ने बॉलिवडूचा अभिनेता अरमान कोहली याच्या घरावर छापा टाकला आहे. या छाप्यात एनसीबीला कोहलीच्या घरी ड्रग्स सापडले आहे.

अभिनेता अरमान कोहलीच्या घरावर NCB चा छापा, 'जानी दुश्मन'साठी ऑपरेशन 'रोलिंग थंडर'
ARMAAN KOHLI
| Edited By: | Updated on: Aug 28, 2021 | 9:46 PM
Share

मुंबई : ड्रग्स रॅकेटमध्ये सहभागी असल्याच्या संशयावरुन NCB ने बॉलिवडूचा अभिनेता अरमान कोहली याच्या घरावर छापा टाकला आहे. या छाप्यात एनसीबीला कोहलीच्या घरी ड्रग्स सापडले आहे. शुक्रवारपासून (27 ऑगस्ट) NCB कडून वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले जात आहेत. यामध्ये NCB ने आतापर्यंत एकूण 15 हून अधिक ड्रग्स पेडलर्सना अटक केलेली आहे. याच ड्रग्स तस्करांनी दिलेल्या माहितीच्या आधारे अभिनेता अरमान कोहलीच्या घरावर NCB ने छापा टाकला आहे. विशेष म्हणजे या छापेमारीनंतर NCB अधिकारी अरमान कोहलीला घरातून घेऊन गेले आहेत. (NCB raid on houses of Bollywood actor Armaan Kohli seized drug)

ड्रग्स पेडलर्सकडून मिळाली माहिती

मागील काही दिवसांपासून NCB ने ड्रग्स तस्करीविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत कालपासून मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली जात आहे. या कारवाईमध्ये NCB च्या अधिकाऱ्यांनी 15 पेक्षा अधिक ड्रग्स पेडलर्सना अटक केली आहे. NCB चे अधिकारी या ड्रग्स तस्करांची चौकशी करत आहेत. चौकशीदरम्यान ड्रग्स तस्करीमध्ये अभिनेता अरमान कोहलीचा समावेश असल्याची माहिती NCB ला मिळाली. त्यानंतर याच माहितीच्या आधारे एनसीबीने आज अरमान कोहलीच्या घरावर छापेमारी केली. या कारवाईत एनसीबीला अरमानच्या घरी ड्रग्स सापडले आहे. हे ड्रग्स किती आहे ? त्याची बाजारमूल्यानुसार काय किंमत आहे ? याची माहिती मिळू शकलेली नाही.

छापेमारीसाठी रोलिंग थंडर ऑपरेशन

मागील काही दिवसांपासून NCB कडून ठिकठिकाणी छापेमारी केली जात आहे. NCB ला गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील वेगवेगळ्या औषधांबद्दल बरीच माहिती मिळाली. त्यानंतर NCB ने ऑपरेशन सुरू केलेले आहे. या मोहिमेला इश्का रोलिंग थंडर असे नाव देण्यात आले आहे. याच ऑपरेशन अंतर्गत अरमान कोहलीच्या घरी छापेमारी करण्यात आली. या ड्रग्स तस्करी प्रकरणात बॉलिवूड तसेच इतर क्षेत्रातील मोठी नावे सामील होण्याची शक्यता आहे. अरमानच्या घरात ड्रग्स सापडल्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.

कोण आहे अरमान कोहली?

अरमान कोहली हा ज्येष्ठ दिग्दर्शक राजकुमार कोहली आणि ज्येष्ठ अभिनेत्री निशी यांचा मुलगा आहे. ‘बदले की आग’ आणि ‘राज तिलक’ या सिनेमातून बालकलाकार म्हणून अरमानने सिनेसृष्टीत प्रवेश केला होता. हे दोन्ही सिनेमे त्याच्या वडिलांनी म्हणजे राजकुमार कोहली यांनी दिग्दर्शित केले होते.

विरोधी, दुश्मन जमाना, औलाद के दुश्मन, वीर, कहर, जानी दुश्मन यांसारख्या सिनेमात अरमानने काम केलेले आहे. त्यानंतर मध्ये 12 वर्षांचा ब्रेक घेतल्यानंतर सलमानच्या ‘प्रेम रतन धन पायो’ सिनेमातही तो दिसला होता. 2013 सालच्या बिग बॉसच्या सीझनमध्येही अरमान सहभागी झाला होता. जानी दुश्मन या चित्रपटातही त्याने काम केलेले आहे.

इतर बातम्या :

Bigg Boss OTT : शमिता शेट्टी राकेशला म्हणाली – इथे ये आणि आता मला किस कर, पाहा पुढे काय झालं…

Sushant Video : ‘एमएस धोनी’ चित्रपटाच्या तयारीदरम्यान कॅप्टन कूलला त्रास द्यायचा सुशांत, पाहा व्हिडीओ

Ananya Panday : अनन्या पांडेचा ग्लॅमरस लूक, ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर

(NCB raid on houses of Bollywood actor Armaan Kohli seized drug)

Follow Us
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!
ठाकरे गटाला धक्का देत शिंदेंनी सचिन अहिरांना दिली उपसभापती पदाची...
ठाकरे गटाला धक्का देत शिंदेंनी सचिन अहिरांना दिली उपसभापती पदाची उमेदवारी; बिनविरोध निवड होताच केलं मोठं विधान
राज ठाकरे आले... फक्त 15 मिनिटे बोलले, भाजपला दिला सणसणीत इशारा
राज ठाकरे आले... फक्त 15 मिनिटे बोलले, भाजपला दिला सणसणीत इशारा; म्हणाले, आजचं फोडाफोडीचं...
शिंदे सेनेत प्रवेश...थेट उपसभापती! अहिरांच्या नावावर शिक्कामोर्तब
Vidhanparishad | शिंदे सेनेत प्रवेश... आणि थेट उपसभापती! सचिन अहिरांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका? विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका? विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात मोठी खळबळ
शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
Sachin Ahir | मी गेल्याशिवाय कळणार नाही...शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदे
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदेंसह ओमराजेदेखील... राजकारणातील हालचाली वाढल्या
आजपासून लागू झाले 11 नियम! बँक, ITR, HSRP...अपडेट्स एका क्लिकमध्ये
New Rules | आजपासून लागू झाले 11 मोठे नियम! बँक, ITR, पासपोर्ट, HSRP ते LPG... सर्व अपडेट्स एका क्लिकमध्ये
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा अर्ज दाखल करताच, सरकारने थेट....