Nusrat Jahan Baby’s Father : अभिनेत्री नुसरत जहाँच्या मुलाच्या वडिलांचे नाव उघड, जन्म दाखल्यावर ‘या’ व्यक्तीचे नाव!

टीएमसी खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ (Nusrat Jahan) यांच्या मुलाचे वडील कोण, यावर मागील बऱ्याच काळापासून चर्चा सुरु होती. परंतु, आता कोलकाता महानगरपालिकेने (Kolkata Municipal Corporation) या बाळाचा बर्थ सर्टिफिकेट अर्थात जन्म दाखला (Birth Certificate) जारी केला आहे.

Nusrat Jahan Baby’s Father : अभिनेत्री नुसरत जहाँच्या मुलाच्या वडिलांचे नाव उघड, जन्म दाखल्यावर ‘या’ व्यक्तीचे नाव!
Nusrat jahan
Follow us
| Updated on: Sep 16, 2021 | 12:38 PM

मुंबई : टीएमसी खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ (Nusrat Jahan) यांच्या मुलाचे वडील कोण, यावर मागील बऱ्याच काळापासून चर्चा सुरु होती. परंतु, आता कोलकाता महानगरपालिकेने (Kolkata Municipal Corporation) या बाळाचा बर्थ सर्टिफिकेट अर्थात जन्म दाखला (Birth Certificate) जारी केला आहे. होय, अभिनेत्री नुसरत जहाँच्या मुलाच्या वडिलांच्या नावा जागी देबाशिष दासगुप्ता हे नाव लिहिले गेले आहे, जे अभिनेता यश दासगुप्ताचे (Yash Dasgupta) अधिकृत नाव आहे. तर, मुलाचे नाव यिशान जे दासगुप्ता असे प्रमाणपत्रात लिहिले आहे.

टीएमसी खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँने 26 ऑगस्ट 2021 रोजी एका मुलाला जन्म दिला. अभिनेत्रीची गर्भधारणा खूप चर्चेत आली होती. कारण तिच्या गर्भधारणेच्या दरम्यानच तिने पती निखिल जैनसोबतचे नाते संबंध तोडण्याची घोषणा केली होती. नुसरत जहाँने निखिल जैनसोबत तिचे लग्न वैध नसल्याचे म्हटले होते. ती लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होती. यानंतर निखिल जैन यांनी एक निवेदनही जारी केले होते की, ते या मुलाचे वडील नाहीत.

पाहा बर्थ सर्टिफिकेट

Birth Certificate

Birth Certificate

नुसरत जहाँच्या मुलाच्या जन्माच्या वेळी अभिनेता यश दासगुप्ता नेहमी तिच्यासोबत दिसत होता. यश दासगुप्ता यांनीच नुसरत जहाँला रुग्णालयात नेले आणि यश दासगुप्तानेही मुलाच्या जन्माची पहिली माहिती दिली होती. पण, तेव्हापासून मुलाच्या वडिलांबद्दल अटकळ होती. याबाबत सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केले जात होते. पण आता हे निश्चित झाले आहे की, नुसरत जहाँच्या मुलाचे वडील अभिनेते यश दासगुप्ताच आहेत. नुसरतच्या मुलाच्या जन्म नोंदणीचा ​​तपशील सार्वजनिक डोमेनमध्ये समोर आला आहे. यामध्ये मुलाचे पूर्ण नाव यिशान जे दासगुप्ता असे लिहिले आहे.

यशदास गुप्ताच बाळाचे बाबा!

कोलकाता महानगरपालिकेत दाखल केलेल्या कागदपत्रानुसार वडिलांचे नाव ‘देबाशीस दासगुप्ता’ असे लिहिले आहे. हे नाव अभिनेता यश दासगुप्ताचे अधिकृत नाव आहे. यातून हे स्पष्ट झाले आहे की, यश दासगुप्ता हे नुसरत जहाँच्या मुलाचे वडील आहेत. आतापर्यंत फक्त यश दासगुप्ताच्या नावाने अटकळ बांधली जात होती. यश दासगुप्ताचे नाव दबक्या आवाजात घेतले जात होते. पण आता हे अधिकृत झाले आहे की, यश दासगुप्ता या मुलाचे वडील आहेत. मुलाचे यिशान ठेवल्यानंतर याची चर्चा तीव्र झाली होती, कारण या नावाशी यश हे नाव जोडले गेले होते, जे अभिनेता यश दासगुप्ताचे नाव आहे.

सिंगल पॅरेंट म्हणून करणार लेकाचा सांभाळ

नुसरत जहाँनं वर्ष 2019 मध्ये बिझनेसमन निखिल जैन यांच्याशी मोठ्या थाटामाटात लग्न केलं होतं. हा विवाह तुर्कीमध्ये झाला होता. यानंतर, दोघांनी कोलकात्यात एक भव्य रिसेप्शन दिलं होतं, ज्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह बंगाली चित्रपट उद्योगातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. मात्र, हे लग्न फार काळ टिकलं नाही. या वर्षी जून महिन्यात नुसरत आणि बंगाली अभिनेता यश दासगुप्ताच्या नात्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या, त्यानंतर नुसरतनं 2020 मध्ये निखिल जैनपासून विभक्त झाल्याचा खुलासा केला होता. तुर्कीच्या कायद्यानुसार तिचं आणि निखिलचे लग्न होतं आणि ते भारतात वैध नाही, असं ती म्हणाली होती.

दरम्यान, जेव्हा नुसरत जहाँच्या गरोदरपणाची बातमी समोर आली तेव्हा निखिल जैन यांनी त्याबाबत प्रश्न उपस्थित केले. निखिलनं या गर्भधारणेपासून दूर राहून नुसरतबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या लग्नातील वादादरम्यान, जैन यांनी एका निवेदनात म्हटलं होतं की, तो आणि नुसरत जहाँ नोव्हेंबर 2020 मध्ये विभक्त झाले होते आणि त्यांनी विवाह रद्द करण्यासाठी अर्जही दाखल केला होता. त्यामुळे आता ती सिंगल पॅरेंट म्हणून बाळाचा सांभाळ करणार का?, असा प्रश्न चाहते उपस्थित करत आहे.

हेही वाचा :

Urmila Nimbalkar | ‘उर्मिला आणि एक गोंडस बाळ…’, अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला बाळाचा पहिला फोटो!

Bigg Boss OTT | अंतिम फेरीच्या जवळ पोहचून नेहा भसीन झाली बेघर, ‘या’ पाच स्पर्धकांमध्ये होणार तगडी टक्कर!

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.