Ayushmann Khurrana | पुढे मी ‘या’ चित्रपटांमध्ये काम करणार असल्याचे सांगत आयुष्मान खुराना याने सांगितला प्लॅन बी…
काही दिवसांपूर्वीच आयुष्मानचा डाॅक्टर जी हा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, या चित्रपटाला बाॅक्स आॅफिसवर काही खास धमाका करता आला नाही.

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना सातत्याने हीट चित्रपटांमध्ये काम करतोय. आयुष्मानचा अॅक्शन हिरो हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येतोय. या चित्रपटात नोरा फतेही देखील दिसणार आहे. तसेच अनन्या पांडेसोबतही लवकरच आयुष्मान स्क्रीन शेअर करणार आहे. काही दिवसांपूर्वीच आयुष्मानचा डाॅक्टर जी हा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, या चित्रपटाला बाॅक्स आॅफिसवर काही खास धमाका करता आला नाही. या चित्रपटाची रिलीजच्या अगोदर खूप चर्चा होती.
नुकताच आज तकला एका मुलाखत आयुष्मान खुरानाने दिलीये. या मुलाखतीमध्ये आयुष्मान खुराना याने अनेक विषयांवर हात घातलाय. आयुष्मान म्हणाला की, मला आता हार्ड कोर चित्रपटांवर लक्ष केंद्रित करायचे आहे. पॉपकॉर्न एंटरटेनमेंट चित्रपटांवर काम करायचे आहे. इतकेच नाही तर काही मेसेज वगैरे जाणारे चित्रपट आता कमीत कमी करणार आहे.
सातत्याने बाॅलिवूडचे चित्रपट फ्लाॅप जात असताना अभिनेत्यांच्या फीसवर देखील आयुष्मान खुरानाने मोठे भाष्य केले आहे. आयुष्मान म्हणाला की, बाॅलिवूडचे चित्रपट फ्लाॅप जात आहेत. त्यामुळे जास्त फीसचा विचार करण्याची वेळ आलीये. बऱ्याचवेळा असे होते की, चित्रपटाच्या लेखकापेक्षाही अधिक फीस ही अभिनेत्याची असते, आता यावर आपण विचार करण्याची खरोखरच वेळ आलीये.
चित्रपटांच्या वाढत्या तिकिट दरावर आयुष्मान म्हणाला की, जर खरोखरच एखादा चित्रपट चांगला असेल तर प्रेक्षक महागाची तिकिटे खरेदी करूनही तो चित्रपट पाहतात, यासाठी चित्रपट चांगला असणे आवश्यक आहे. हे सर्व काही चित्रपट निर्मात्यांवर अवलंबून आहे. बाॅलिवूडच्या चित्रपटांपेक्षा साऊथच्या चित्रपटाचे तिकिटांचे दर कमी आहेत. आयुष्मान खुरानाने अत्यंत कमी वेळामध्ये बाॅलिवूडमध्ये स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केलीये.
