नवाबांच्या शहरात ‘प्रियांका चोप्रा’च्या विरोधात पोस्टरबाजी, वाचा प्रकरण

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा तब्बल तीन वर्षांनंतर भारतामध्ये आलीये. भारतामध्ये आल्याची माहिती देत प्रियांकाने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

नवाबांच्या शहरात 'प्रियांका चोप्रा'च्या विरोधात पोस्टरबाजी, वाचा प्रकरण
Follow us
| Updated on: Nov 08, 2022 | 11:58 AM

मुंबई : जगप्रसिध्द बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा तब्बल तीन वर्षांनंतर भारतामध्ये आलीये. भारतामध्ये आल्याची माहिती देत प्रियांकाने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. प्रियांका काही दिवस मुंबईत राहून तिची कामे उरकून परत जाईल, असा अंदाजा बांधला जात होता. मात्र, प्रियांका मुंबईमधून थेट लखनऊला गेली आहे. विशेष म्हणजे यावेळी ती कोणत्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी वगैरे गेली नसून तिने युनिसेफच्या कार्यालयाला भेट दिलीये. इतकेच नाही तर अनेक अंगणवाड्यांना देखील प्रियांकाने भेट दिली आहे.

प्रियांका चोप्रा लखनऊमध्ये दाखल झाल्यानंतर प्रियांकाला एक विचित्र अनुभव आलाय. लखनऊमध्ये दाखल झालेल्या प्रियांका चोप्राच्या विरोधात काही फ्लेक्स लावण्यात आली होती. मात्र, ही फ्लेक्स कोणी आणि कोणत्या कारणासाठी लावली याचा शोध आता पोलिस घेताना दिसत आहेत.

You Are Not Welcome In City Of Nawabs म्हणजेच नवाबांच्या शहरात तुझे स्वागत नाही, अशा मजकुरांचे हे फ्लेक्स प्रियांका चोप्राच्या विरोधात लावण्यात आली होती. गोमतीनगरमध्ये प्रियांकाच्या बहिष्काराचे फ्लेक्स लावण्यात आले होते. यावरून हे स्पष्ट होते की, काही लोकांना प्रियांका चोप्राचा लखनऊचा दाैरा अजिबात आवडला नाहीये.

प्रियांका चोप्रा आलिया भट्ट आणि कतरिना कैफसोबत ‘जी ली जरा’ या चित्रपटात दिसणार आहे. काही दिवसांमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. अलिया भट्ट काही दिवसांनंतर या चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार असल्याचे कळते आहे. जी ली जरा चे शूटिंग पूर्ण करून प्रियांका परत विदेशात जाणार आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.