Prabhas 25 | अखेर प्रतीक्षा संपली! ‘बाहुबली’ प्रभासने जाहीर केला त्याचा 25वा चित्रपट, भूषण कुमार करणार निर्मिती!

अभिनेता प्रभासने (Prabhas) ‘बाहुबली’ या चित्रपटामध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आज (7 ऑक्टोबर) प्रभासने त्याच्या 25 व्या चित्रपटाची घोषणा केली आहे. त्याच्या या चित्रपटाचे नाव ‘स्पिरिट’ (Spirit) आहे.

Prabhas 25 | अखेर प्रतीक्षा संपली! ‘बाहुबली’ प्रभासने जाहीर केला त्याचा 25वा चित्रपट, भूषण कुमार करणार निर्मिती!
Spirit

मुंबई : अभिनेता प्रभासने (Prabhas) ‘बाहुबली’ या चित्रपटामध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आज (7 ऑक्टोबर) प्रभासने त्याच्या 25 व्या चित्रपटाची घोषणा केली आहे. त्याच्या या चित्रपटाचे नाव ‘स्पिरिट’ (Spirit) आहे.

प्रभास ‘अर्जुन रेड्डी’ फेम दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगासोबत त्याचा 25वा चित्रपट बनवणार आहे. या निमित्ताने त्याने ‘स्पिरिट’चे पहिले पोस्टरही शेअर केले आहे. पोस्टर शेअर करताना प्रभासने लिहिले की, मी स्पिरिटने माझा नवीन प्रवास सुरू करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा करत असून, भूषण कुमार निर्मित आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)

‘प्रभास 25’ सोशल मीडियावर ट्रेंड

‘प्रभास 25’ अनेक तास सोशल मीडियावर ट्रेंड करत होता. चाहते प्रभासच्या चित्रपटाच्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत होते. चित्रपटाची कथा आणि प्रभासच्या व्यक्तिरेखेबद्दल अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

25वा चित्रपट असणार आणखी धमाकेदार!

ग्रेपवाइनच्या मतानुसार, चित्रपटात प्रभास आधी कधीही न दिसलेल्या भूमिकेत दिसणार असून एक कल्टचा दर्जा असलेल्या ब्लॉकबस्टर अशा दिग्दर्शकासोबत काम करत आहे. भारतीय चित्रपट उद्योगात सुपरस्टार पदाला पोहोचल्यानंतर साधारणपणे स्टार्स टाइपकास्ट होऊन जातात मात्र, खासकरून तसे जसे चाहत्यांना अपेक्षित असतात मात्र, हे काहीतरी अनोखे आणि नवे असेल, याची आम्हाला खात्री आहे.

भारतीय सुपरस्टार प्रभास एक घराघरांत पोहोचलेले नाव बनले असून, आता तो त्याच्या 25व्या चित्रपटामध्ये  एका वेगळ्या लेव्हलच्या एलेक्टरीफाइंग परफॉर्मेंसमध्ये दिसणार आहे. जगभरातील प्रभासचे चाहते 7 ऑक्टोबर 2021ला त्याच्या 25व्या चित्रपटाची घोषणा ऐकून आनंदित होतील, ज्याची ते खूप आतुरतेने वाट पहात आहेत.

प्रभासकडे चित्रपटांची रांग

प्रभासकडे सध्या चित्रपटांची रांग आहे. तो सध्या त्याच्या आगामी ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचे मुंबईत शूटिंग करत आहे. या चित्रपटात प्रभाससोबत सैफ अली खान, कृती सॅनन आणि सनी सिंह महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसतील. रामायणावर आधारित हा 3 डी चित्रपट असणार आहे. हा चित्रपट 2022 मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.

प्रभास लवकरच पूजा हेगडे सोबत ‘राधे श्याम’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट जानेवारी 2022 मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. हा एक कालावधी रोमँटिक चित्रपट आहे. या व्यतिरिक्त, तो प्रशांत नीलच्या ‘सालार’ या चित्रपटात श्रुती हासनसोबत दिसणार आहे. याशिवाय प्रभास दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबतही काम करणार आहे. नाग अश्विन या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, प्रभास शेवटचा 2019 मध्ये दिग्दर्शक सुजीतचा चित्रपट ‘साहो’मध्ये दिसला होता. या चित्रपटात प्रभाससोबत श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही विशेष जादू दाखवू शकला नाही.

हेही वाचा :

Rajeshwari Kharat : ‘नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा…’; लाडक्या शालूची खास पोस्ट, पाहा राजेश्वरी खरातचा सुंदर अंदाज

Ghor Andhari Re : उत्सव नवरात्रीचा, गायिका ‘योगिता बोराटे’ यांचं नवरात्रोत्सवा निमित्त खास गुजराती गाणं रिलीज

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI