AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Clarification | प्रियांकाने कोव्हिड नियम तोडले? पाहा काय म्हणतीये प्रियांका…

अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या लंडनमध्ये कुटुंबासोबत आहे. तिथे ती चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेली होती

Clarification | प्रियांकाने कोव्हिड नियम तोडले? पाहा काय म्हणतीये प्रियांका...
| Updated on: Jan 08, 2021 | 4:34 PM
Share

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या लंडनमध्ये कुटुंबासोबत आहे. तिथे ती चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेली होती, परंतु आता युकेमध्ये लॉकडाऊन झाल्यामुळे ती येथीच अडकली आहे. याच दरम्यान प्रियांकाने लंडनमध्ये लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या बातम्या आल्या होत्या. लॉकडाऊन असूनही, प्रियांका तिच्या आईसोबत सलूनमध्ये गेली होते आणि तिथे पोलिसही पोहचले त्यांना लॉकडाऊन नियमांची आठवण करून दिली.आता या सर्व प्रकरणावर प्रियांका चोप्राने स्पष्टीकरण दिले आहे. प्रियांकाचे म्हणणे आहे की, तिने की लॉकडाऊनच्या कुढल्याही नियमाचे उल्लंघन केले नाही. (Priyanka Chopra reveals case of violation of lockdown rules in London)

मीडिया रिपोर्टनुसार प्रियांका चोप्राने चित्रपटासाठी तिचे केस कल्लर केले होते आणि याच चित्रपटाच्या शूटिंगसाठी ती लंडनमध्ये आहे. ज्यावेळी हे सलून सुरू करण्यात आले होते त्यावेळी तिथे लॉकडाऊनच्या नियमांचे सर्व पालन करण्यात आले होते आणि तिथेल सर्वांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या होत्या. ज्यावेळी तिथे पोलीस पोहचले तेव्हा त्यांना संपूर्ण कागदपत्र दाखवण्यात आले.  प्रियांका चोप्रा बुधवारी संध्याकाळी 5.44 वाजता जोश वुडच्या स्टायलिश सलूनमध्ये गेली होती. त्यावेळी तिची आईसुद्धा प्रियांकाच्यासोबत होती.

मिड डेच्या रिपोर्टनुसार प्रियांका चोप्रा नोव्हेंबरपासून तिच्या आगामी ‘टेक्स्ट फॉर यू ’ चित्रपटाची शूटिंग करत आहे. चित्रपटाची टीम सर्वांना अमेरिकेत परत जाण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करीत आहे. चित्रपटाचे शूटिंगही थांबले आहे. यूएसला जाण्यासाठी विशेष परवानगी घेणे आवश्यक आहे. लॉकडाउनचे नियम आणखी कडक करण्यात आल्यामुळे या प्रक्रियेस थोडा वेळ लागू शकेल.

देशामध्ये नवीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरूच आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देखील दिला आहे. काही दिवसांपूर्वी प्रियंका चोप्रानेही शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दिला होता. आता यावरूनच सोशल मीडियावर प्रियंकाला जोरदार ट्रोल करण्यात आले होते.

संबंधित बातम्या :

Mission Lion | अक्षय कुमारसोबत पुन्हा एकदा काम करण्यास दिग्दर्शक जगन शक्ती तयार, घेणार 4 कोटी मानधन!

माझ्यावर अन्याय होतोय म्हणत कंगनाचा ‘नारीचा पाढा’, म्हणते, ‘देशहिताची गोष्ट बोलले की माझ्यावर टीका’

(Priyanka Chopra reveals case of violation of lockdown rules in London)

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.