Radhe Shyam : प्रभासच्या वाढदिवशी चाहत्यांना निर्मात्यांकडून खास भेट, शेअर केला ‘विक्रमादित्य’चा खास लूक टीझर!

साऊथचा स्टार प्रभास (Prabhas) आज त्याचा 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. चाहते त्याच्या ‘राधे श्याम’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रभासच्या चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी चाहत्यांना एक भेट दिली आहे.

Radhe Shyam : प्रभासच्या वाढदिवशी चाहत्यांना निर्मात्यांकडून खास भेट, शेअर केला ‘विक्रमादित्य’चा खास लूक टीझर!
Prabhas

मुंबई : साऊथचा स्टार प्रभास (Prabhas) आज त्याचा 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. चाहते त्याच्या ‘राधे श्याम’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रभासच्या चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी चाहत्यांना एक भेट दिली आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना एक भेट देण्यात आली आहे. ‘राधे श्याम’ चित्रपटातील त्याच्या ‘विक्रमादित्य’ या व्यक्तिरेखेचा टीझर शेअर करण्यात आला आहे.

रोमँटिक जॉनरमध्ये प्रभासचे बहुप्रतिक्षित पुनरागमन चाहत्यांसाठी खास सरप्राईज ठरले आहे. चित्रपटांशी संबंधित अनेक पोस्टर्स आणि टीझर उघड केल्यानंतर, शेवटी चाहत्यांना त्यातून प्रभास साकारत असलेले पात्र विक्रमादित्यची ओळख होत आहे आणि हे नक्कीच चाहत्यांना आणखी उत्साहित करेल.

पाहा ‘राधे श्याम’च्या ‘विक्रमादित्य’ पात्राचा टीझर

प्रभासने आज (23 ऑक्टोबर) त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या ‘राधे श्याम’ चित्रपटातील पात्राचा टीझर शेअर केला आहे. टीझरमध्ये, प्रभास आपल्याला एका कोड्यामध्ये सांगतो की, तो कोण आणि त्याचे पात्र काय आहे आणि आता हे स्पष्ट झाले आहे की, अभिनेता हस्तरेखातज्ज्ञाच्या भूमिकेसाठी पूर्णपणे सज्ज आहे. अभिनेत प्रभास पहिल्यांदाच अशी भूमिका साकारणार आहे.

प्रभासची भूमिका अतिशय अनोखी आहे यात शंका नाही. मनावर खूप ताण असूनही एवढी मनोरंजक आणि अनोखी भूमिका करणारा एकही अभिनेता आपल्याला आठवणार नाही. ही भूमिका प्रभासच्या चाहत्यांसाठी नक्कीच एक ट्रीट असणार आहे.

अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त पोस्टरचे अनावरण

काही दिवसांपूर्वी प्रभासच्या एका खास पोस्टरचे अनावरण करण्यात आले होते आणि त्याआधी त्याची को-स्टार पूजा हेगडेच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्टरचे अनावरण करण्यात आले होते. या जोडीने चाहत्यांना उत्साहित केले आहे. चाहते ही जोडी ऑनस्क्रीन बघण्यासाठी आणि जादू अनुभवण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाहीयत.

हा चित्रपट 14 जानेवारी 2022 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘राधे श्याम’ हा बहुभाषिक चित्रपट असून त्याचे दिग्दर्शन गुलशन कुमार आणि राधा कृष्ण कुमार यांनी केले आहे. हे यूव्ही क्रिएशन्सने तयार केले आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, वामसी आणि प्रमोद यांनी केली आहे.

प्रभासला पाहायला प्रेक्षक उत्सुक

प्रभासने 2002मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ईश्वर’ या तेलुगु चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते. यानंतर तो ‘राघवेंद्र’, ‘योगी’, ‘डार्लिंग’, ‘निरंजन’, ‘रेबेल’ आणि ‘बाहुबली’ चित्रपटाच्या दोन्ही भागांत झळकला होता. प्रभुदेवा दिग्दर्शित ‘अॅक्शन जॅक्शन या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात तो लहानशा भूमिकेत झळकला होता. प्रभासचा वाढदिवसानिमित्त त्याच्या आगामी ‘राधेश्याम’ चित्रपटातील त्याचा लूक प्रदर्शित करण्यात आला होता. प्रभासच्या वाढदिवसानिमित्ताने या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित केले गेले होते. त्या पोस्टरमध्ये प्रभासचा डॅशिंग आणि स्टाइलिश लूक दिसला होता.

हेही वाचा :

Tina Datta : टॉपशिवाय ओव्हरकोट परिधान करत टीना दत्ताने दाखवला सुपरबोल्ड लूक, पाहा फोटो

Drugs Case | आर्यन-अनन्यानंतर प्रसिद्ध सेलिब्रिटीचा नोकर NCBच्या रडारवर, अभिनेत्रीला ड्रग्ज पुरवल्याचा संशय!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI