AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पती-पत्नीपेक्षाही त्यांचं नातं गहिरं होतं; शहनाजची हालत पाहून राहुल महाजनला धक्का

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाने त्याची मैत्रीण शहनाज गिलवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सिद्धार्थच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी मी शहनाजच्या खांद्यावर हात ठेवला. तिच्याकडे पाहिले अन् पटकन बाजूला झालो. (Siddharth Shukla)

पती-पत्नीपेक्षाही त्यांचं नातं गहिरं होतं; शहनाजची हालत पाहून राहुल महाजनला धक्का
Shehnaaz gill
| Edited By: | Updated on: Sep 05, 2021 | 4:12 PM
Share

मुंबई: अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाने त्याची मैत्रीण शहनाज गिलवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सिद्धार्थच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी मी शहनाजच्या खांद्यावर हात ठेवला. तिच्याकडे पाहिले अन् पटकन बाजूला झालो. तिची अवस्था पाहून मला एकदम धक्काच बसला. सिद्धार्थच्या अकाली मृत्यूने ती पूर्णपणे कोलमडून गेली आहे. पती-पत्नीपेक्षाही त्या दोघांचं नातं गहिरं होतं, अशी प्रतिक्रिया राहुल महाजनने व्यक्त केली आहे. (Rahul mahajan reveal what was shehnaaz gill condition at sidharth shukla last rites)

राहुल महाजन यांनी एबीपीशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. शहनाजला पूर्णपणे कोलमडून गेलेल्या अवस्थेत पाहणे खूप त्रासदायक आणि उदासवानं होतं, असं राहुल महाजन म्हणाला. जेव्हा शहनाज आली तेव्हा ती खूप जोरात किंचाळली. मम्मी जी… मेरा बच्चा… मम्मी जी मेरा बच्चा… शहनाज सिद्धार्थचे पाय चोळत होती. तिला प्रचंड मानसिक धक्का बसलेला आहे. सिद्धार्थचा मृत्यू झाला यावर तिचा विश्वासच बसत नाहीये. सिद्धार्थच्या अंत्यसंस्काराच्यावेळी तिची मानसिक स्थिती पाहून मी स्वत: थरथर कापत होतो, असं राहूल म्हणाला.

अन् मी घाबरून गेलो

शहनाजचं संपूर्ण शरीर फिक्कट पडलं आहे. एखादं वादळ यावं आणि सर्व काही धुऊन काढावं अशी तिची परिस्थिती झाली आहे. जेव्हा मी संवेदना प्रकट करण्यासाठी तिच्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा तिने माझ्याकडे ज्या पद्धतीने पाहिलं ते पाहून मी स्तब्ध झालो होतो. तिची अवस्था पाहून मी घाबरून गेलो होतो. तिचं भान हरपलेलं होतं, असं त्याने सांगितलं.

2 सप्टेंबर रोजी निधन

टीव्ही इंडस्ट्रीचा प्रसिद्ध कलाकार सिद्धार्थ शुक्ला याच 2 सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. मुंबईतील कूपर रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला. वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी सिद्धार्थ शुक्लाने अचानक जगाची एक्झिट घेतल्याने संपूर्ण इंडस्ट्रीसह त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सिद्धार्थ शुक्लाने बिग बॉस- 13 चा विजेताही राहिला आहे. यासोबतच त्याने अनेक प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. सध्याच्या काळातील सर्वोत्कृष्ट टीव्ही कलाकारांमध्ये त्यांची गणना होते होती. गेल्या काही काळापासून तो अनेक म्युझिक व्हिडीओमध्येही दिसत होता. तसेच, अलीकडेच अभिनेत्याने डिजीटल प्लॅटफॉर्मवरही पदार्पण केले. जिथे तो “ब्रोकन बट ब्यूटीफुल” मध्ये दिसून आला. सिद्धार्थला या मालिकेसाठी बरीच प्रशंसा मिळाली.

सिद्धार्थची कारकीर्द

अभिनेता, होस्ट आणि मॉडेल आहे जो हिंदी टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये प्रामुख्यानं काम करत होता. तो ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल 3’, ‘बालिका वधू’ आणि ‘दिल से दिल तक’मधील भूमिकांसाठी ओळखला जातो. तो बिग बॉस 13 आणि फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 7 च्या रिअॅलिटी शोचा विजेता आहे. त्यानं सावधान इंडिया आणि इंडियाज गॉट टॅलेंट हे शो होस्ट केले आहेत. त्याने डिसेंबर 2005 मध्ये आशिया, लॅटिन अमेरिका आणि युरोपमधील इतर 40 स्पर्धकांना हरवून जगातील सर्वोत्कृष्ट मॉडेलचं विजेतेपद पटकावले. 2008 च्या ‘बाबुल का आंगन छुटे ना’ या शोमधील मुख्य भूमिकेतून त्यानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 2014 मध्ये, शुक्लानं ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’मध्ये सहाय्यक भूमिकेतून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (Rahul mahajan reveal what was shehnaaz gill condition at sidharth shukla last rites)

संबंधित बातम्या:

Sidnaaz : सिद्धार्थ शुक्लाच्या अकाली जाण्याचा प्रचंड धक्का; शहनाजला दु:ख आवरेना

Sidharth Shukla Death : ‘आज सनाला पाहिल्यानंतर मन दुखावलं’; अली गोनीने भावनिक ट्विट करत सांगितली शहनाजची परिस्थिती, वाचा पोस्ट

Sidharth Shukla passes away : अभिनेता सिद्धार्थ शुक्ला ब्रह्माकुमारी केंद्राशी संबंधित, अंत्यसंस्कारही याच विधीनुसार होणार

(Rahul mahajan reveal what was shehnaaz gill condition at sidharth shukla last rites)

अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार
अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार.
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला.
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg.
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार.
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत.
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?.
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?.
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा.
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला.