Sidharth Shukla Death : ‘आज सनाला पाहिल्यानंतर मन दुखावलं’; अली गोनीने भावनिक ट्विट करत सांगितली शहनाजची परिस्थिती, वाचा पोस्ट

सिद्धार्थ हे जग सोडून गेल्यावर दोन्ही स्टार्स दिवंगत अभिनेत्याच्या घरी पोहोचले होते. सिद्धार्थच्या घरातून परतल्यानंतर अलीने ट्विट करून शहनाज गिलची परिस्थिती कशी आहे ते सांगितलं आहे. (Sidharth Shukla Death: Ali Goni tweeted emotionally about Shahnaz's condition, read the full post)

Sidharth Shukla Death : 'आज सनाला पाहिल्यानंतर मन दुखावलं'; अली गोनीने भावनिक ट्विट करत सांगितली शहनाजची परिस्थिती, वाचा पोस्ट
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: VN

Sep 03, 2021 | 12:35 PM

मुंबई : छोट्या पडद्यावरील अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) वर्षानुवर्षे त्याच्या चाहत्यांच्या हृदयावर राज्य करत होता. त्याने गुरुवारी, 2 सप्टेंबर रोजी या जगाचा निरोप घेतलाय. त्याच्या मृत्यूमागे हृदयविकाराचा झटका असल्याचं सांगितलं जातंय. आता सिद्धार्थच्या मृत्यूमुळे प्रत्येक जण दु:खी आहे. टीव्ही अभिनेता अली गोनीचं नावही या यादीत समाविष्ट आहे.

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूची बातमी समोर आली तेव्हा अली गोनी गर्लफ्रेन्ड जस्मीनसोबत मुंबईच्या बाहेर होता. मात्र दोघांनाही सिद्धार्थच्या जाण्याची माहिती मिळताच ते परत मुंबईला आले. मुंबईत आल्यानंतर अली आणि जस्मीन सिद्धार्थच्या घरी पोहोचले. आता अलीनं खूप भावनिक ट्विट केलं आहे.

अलीने सांगितली शहनाजची स्थिती

अली गोनीची मैत्रीण जस्मीन सिद्धार्थची खूप चांगली मैत्रीण होती. दोघांनी ‘दिल से दिल’ तक या शोमध्ये एकत्र काम केलं होतं. आता सिद्धार्थ हे जग सोडून गेल्यावर दोन्ही स्टार्स दिवंगत अभिनेत्याच्या घरी पोहोचले होते. सिद्धार्थच्या घरातून परतल्यानंतर अलीने ट्विट करून शहनाज गिलची परिस्थिती कशी आहे ते सांगितलं आहे.

त्यानं ट्वीट करून लिहिलं आहे की, ‘एक चेहरा जो नेहमी हसत दिसायचा… आनंदी दिसायचा… पण आज तो चेहरा पाहिल्यानंतर मन दुखावलं आहे… स्टे स्ट्राँग सना…’ यासह अलीनं एक तुटलेले हार्ट इमोजी देखील शेअर केलं आहे… सिद्धार्थच्या जाण्यामुळे शहनाज पूर्णपणे तुटलेली आहे हे या पोस्टवरून स्पष्ट होतंय.

पाहा पोस्ट

सिद्धार्थ आणि शहनाज बिग बॉस 13 च्या घरात चांगले मित्र झाले होते. दोघंही घरात एकमेकांजवळ असायचे. जेव्हा जेव्हा सिद्धार्थ घरात शहनाजशी बोलत नव्हता तेव्हा ती खूप दुःखी असायची. चाहत्यांना शहनाज आणि सिद्धार्थची मैत्री नेहमीच आवडली आहे. सिद्धार्थ आणि शहनाजने कदाचित त्यांचं अफेअर कधीच स्वीकारलं नसेल, पण चाहत्यांना त्यांच्या डोळ्यात त्यांचं प्रेम दिसत होतं. दोघांनी म्युझिक व्हिडीओमध्येही एकत्र काम केलं. आता सिद्धार्थच्या जाण्यानं शहनाज एकटी पडली आहे.

सेलेब्सही शोकमग्न

सिद्धार्थने 2014 मध्ये ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ चित्रपटातही काम केले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत वरूण धवन आणि आलिया भट्ट होते. सिद्धार्थ शुक्ला ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’मध्ये सहाय्यक भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात वरूण धवन आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसले होते. ही बातमी ऐकून वरुण धवन सिद्धार्थ शुक्लाच्या घरी गेला होता. वरुण व्यतिरिक्त राजकुमार राव, असीम रियाज, आरती सिंह, रश्मी देसाई, जयभानुशाली असे सगळे स्टार्स अभिनेत्याच्या घरी पोहोचले होते.

पोलिसांच्या मते, सिद्धार्थ बुधवार संध्याकाळपर्यंत ठीक होता आणि रात्री 3-4 वाजता अभिनेत्याला थोडे अस्वस्थ वाटू लागले. त्याने छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्याने थंड पाणी मागितले आणि झोपी गेला. त्यानंतर पुन्हा सकाळी त्याने छातीत दुखण्याची तक्रार केली आणि पाणी मागितले. पाणी पिताना तो अचानक बेशुद्ध झाला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला कूपर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. जेथे दाखल करण्यापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आले.

संबंधित बातम्या

आमच्यासाठी तो कायम मॉन्टीच होता, मनसे नेत्याने जागवल्या सिद्धार्थसोबतच्या बालपणीच्या आठवणी

सिद्धार्थच्या मृत्युनंतर शहनाज गिलची अवस्था वाईट, राहुल महाजनने सांगितली सद्य परिस्थिती

Siddharth Shukla Death : सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर शहनाज गिल दुःखात, वडिलांनी सांगितली कशी आहे मुलीची परिस्थिती

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें