AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेता राजपाल यादवच्या पहिल्या पत्नीचं झालं होतं निधन, कारण वाचून डोळ्यात येईल पाणी!

. राजपाल यादवने त्याच्या उत्कृष्ट अभिनयानं प्रेक्षकांना खळखळून हसवत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र तुम्हाला माहित आहे का त्याच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं होतं.

अभिनेता राजपाल यादवच्या पहिल्या पत्नीचं झालं होतं निधन, कारण वाचून डोळ्यात येईल पाणी!
| Updated on: Jun 27, 2023 | 12:16 AM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव हा प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. राजपाल यादव हा कॉमेडी किंग म्हणून ओळखला जातो. राजपाल यादवने त्याच्या उत्कृष्ट अभिनयानं प्रेक्षकांना खळखळून हसवत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसंच राजपाल यादव हा त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतो. कारण राजपालचं वैयक्तिक आयुष्य हे अडचणींनी भरलेलं आहे. राजपालनं करूणा या मुलीशी लग्न केलं होतं, पण पहिल्या मुलीला जन्म देताना करूणाचा मृत्यू झाला. त्यानंतर 10 जून 2023 रोजी राजपालनं कॅनेडियन तरुणी राधासोबत लग्न केलं. तसंच आता राधा आणि राजपालला हर्षिता आणि रेहान ही दोन मुलं आहेत.

राजपालने लल्लनटॉपला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यानं पहिली पत्नी करूणाच्या निधनानंतर त्यानं कशी मात केली आणि दुसरी पत्नी राधानं पुढे संपूर्ण परिवाराची कशी काळजी घेतली याबाबत सांगितलं.

या मुलाखतीत राजपालन सांगितलं की, जेव्हा तो वीस वर्षांचा होता तेव्हा त्याची पहिली पत्नी करूणाचं निधन झालं होतं. त्यावेळी राजपाल एका कपड्याच्या कारखान्यात नोकरी करत होता आणि त्याच्या वडिलांनी त्यावेळी त्याचं लग्न लावून दिलं होतं. तसंच जर तुमचं वय 20 वर्ष असेल आणि तुम्ही नोकरी करत असाल तर लोक तुम्हाला लग्न करण्यास सांगायचे, त्यामुळे माझ्या वडिलांनी माझं लग्न लावून दिलं होतं  त्यानंतर माझ्या पहिली पत्नीने एका मुलीला जन्म दिला आणि तिचा मृत्यू झाला. त्यानंतर माझ्या मुलीला माझ्या आई आणि वहिनीने सांभाळलं त्यामुळे तिला आई नाही असं कधीच वाटलं नाही.

1991 मध्ये राजपालच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले होते. त्यानंतर राजपालने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्याला सिने इंडस्ट्रीज नाव कमवायला तेरा वर्षे लागली. यावेळी त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिक्षण घेतलं. त्यानंतर त्याने अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम केलं. तसंच 2003 मध्ये त्याने राधासोबत लग्न गाठ बांधली. तर आता तो प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे.

माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....