Rakesh Roshan: राकेश रोशन यांच्याकडून बॉलिवूड दिग्दर्शकांची कानउघडणी; सांगितला ‘साऊथ फिल्म्स’चा फंडा

राकेश रोशन यांनी कहो ना प्यार है, कोई मिल गया यांसारख्या हिट चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. बॉलिवूडने पुष्पा आणि RRR यांसारख्या चित्रपटांपासून काहीतरी शिकलं पाहिजे, असं मत त्यांनी मांडलं.

Rakesh Roshan: राकेश रोशन यांच्याकडून बॉलिवूड दिग्दर्शकांची कानउघडणी; सांगितला 'साऊथ फिल्म्स'चा फंडा
Rakesh RoshanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 06, 2022 | 1:17 PM

बॉलिवूडमधील चित्रपट (Bollywood movies) एकानंतर एक फ्लॉप (Flop Movies) का होतायत, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावर इंडस्ट्रीतील कलाकारांकडून विविध मतं मांडली जात आहेत. आता अभिनेते आणि दिग्दर्शक राकेश रोशन (Rakesh Roshan) यांनीसुद्धा बॉलिवूडच्या फ्लॉप मालिकांवर प्रतिक्रिया दिली आहे. निर्माते किंवा दिग्दर्शक ज्या विषयांचे चित्रपट बनवत आहेत त्यांच्याशी प्रेक्षकांचा एक मोठा वर्ग आता कनेक्ट होऊ शकत नाहीये, असं ते म्हणाले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी चित्रपटांच्या विषयावर सविस्तर भाष्य केलं. चित्रपटांमधील गाणी आता कमी महत्त्वाची झाली आहेत, त्यामुळे सुपरस्टार होणं आजच्या काळात खूपच कठीण झालंय, असंही ते म्हणाले.

राकेश रोशन यांनी कहो ना प्यार है, कोई मिल गया यांसारख्या हिट चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. बॉलिवूडने पुष्पा आणि RRR यांसारख्या चित्रपटांपासून काहीतरी शिकलं पाहिजे, असं मत त्यांनी मांडलं. लोकसंख्येच्या फक्त एक टक्का लोकांना समजेल आणि आवडेल अशाच चित्रपटांची बॉलिवूडमध्ये निर्मिती होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “हल्ली लोक असेच चित्रपट बनवत आहेत जे फक्त त्यांना आणि त्यांच्या मित्रांना पहायला आवडेल. प्रेक्षकांच्या छोट्या वर्गाला आवडतील असेच विषय निवडले जात आहेत. अशा चित्रपटांशी प्रेक्षकांचा मोठा वर्ग कनेक्ट होऊ शकत नाही. आणखी एक मोठी समस्या म्हणजे चित्रपटांमधून गाणी खूप कमी होत जात आहेत. आधी एका चित्रपटात सहा गाणी असायची. अशा गाण्यांमुळे अभिनेते हे सुपरस्टार व्हायचे. हल्लीच्या काळात सुपरस्टार होणंच कठीण झालंय. अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना यांची गाणी पाहिली तर चित्रपटांचा ते महत्त्वपूर्ण भाग असायचे. एखाद्या चित्रपटाला सुपर-डुपर हिट करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. पुष्पा आणि RRR चं उदाहरण पाहिलं तर त्यातील प्रत्येक गाणी गाजली आहेत. त्यांच्या यशातून आपण शिकलं पाहिजे.”

हे सुद्धा वाचा

“तेलुगू आणि तमिळ चित्रपट हे त्यांच्या मूळ कथेशी जोडलेले असतात. तिच पारंपरिक कथा ते आधुनिक पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडतात. हे हिंदी चित्रपटांच्या बाबत घडताना दिसत नाही,” असं राकेश रोशन म्हणाले. गेल्या काही महिन्यांत ‘लाल सिंग चड्ढा’, ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘शमशेरा’, ‘बच्चन पांडे’ यांसारखे बॉलिवूड चित्रपट फ्लॉप झाले.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.